रमाईच्या सहकार्यामुळे बाबासाहेब यशस्वी झाले – ना.नितीन गडकरी
नागपूर– बाबासाहेब आंबेडकरांना सावली सारखी साथ दिली. त्यांच्या कार्यात त्या खंबिरपणे पाठिशी राहिल्यात यामुळंच बाबासाहेब यशस्वी होऊ शकले असे प्रतिपादन केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
यावेळी माजी खासदार प्रा. जोंगेंद्र कवाडे, बानाईचे अध्यक्ष अरविंद गेडाम व आषुतोष शेवाळकर प्रामुख्याने उपस्थित होते. राजाराम सीताराम दीक्षित वाचनालयाच्या वतीने आयोजित व राम शेवाळकर प्रतिष्ठान द्वारा निर्मीत रमाई या एकपात्री नाटकाच्या रौप्य महोत्सवी प्रयोग सायंटिफिक सभागृहात सादर झाला. यावेळी ते बोलत होते.
ज्येष्ठ नाटककार प्रभाकर दुपारे लिखीत आणि शंकर शंखपाळे दिग्दर्शित या नाटकाचे सादरीकरण प्राची दाणी यांनी केले. तासभर प्रेक्षकांना खिळवून ठेवणाऱ्या या नाटकाचा प्रयोग ना. गडकरी यांनी बघितल्या नंतर त्यांच्या हस्ते कलवंतांचा सत्कार करण्यात आला. यावेळी या प्रयोगावर भाष्य करतांना गडकरी म्हणाले की, मोठ्या आणि कर्तुत्ववान माणसांच्या यशस्वी वाटचालीसाठी घरांतील महिलेची साथ अतिशय महत्वाची असते. ही साथ आणि सहकार्य मिळाले तर सहज यश गाठू शकतो.
प्रभावी शब्दांकन
यावेळी बोलतांना गडकरी यांनी प्रभाकर दुपारे यांनी या नाटकात जे शब्दांकन केले ते अतिशय प्रभावी असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी गडकरी यांच्या हस्ते लेखक प्रभाकर दुपारे, दिग्दर्शक शंकर शंखपाळे, रमाई सादर करणाऱ्या प्राची दाणी, मंजुश्री डोंगरे, चंद्रकांत सोरटे, कमल वाघधरे, प्रकाश योजना अजय कारंडे, संगीत मिलिंद रहाटगावकर, भूषण दाणी, राजू अलोणे, हेमंत डिके, यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन मंजुश्री डोंगरे यांनी केले. व प्रास्ताविक वाचनालयाचे कार्यवाह अनील चनाखेकर यांनी केले. यावेळी मोठ्या संख्खेने प्रेक्षक उपस्थित होते. या नाटकाचे महाराष्ट्रभर ठिकठिकाणी प्रयोग झाले.
Leave a Reply