उसतोड मजुरांच्या पालांवर राबविणार ‘बालसंजीवनी’ अभियान -स्थलांतरित मजुरांच्या बालकांची विशेष आरोग्य तपासणी व लसीकरण; -आरोग्य यंत्रणेला राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचे निर्देश

Follow Us on :

उसतोड मजुरांच्या पालांवर राबविणार ‘बालसंजीवनी’ अभियान

-स्थलांतरित मजुरांच्या बालकांची विशेष आरोग्य तपासणी व लसीकरण;

-आरोग्य यंत्रणेला राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचे निर्देश

मुंबई, दि. १० : राज्यातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर उसतोड मजुरांसोबत स्थलांतरित होणाऱ्या बालकांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्यासाठी त्यांच्या तात्पुरत्या वस्त्यांवर ‘बालसंजीवनी’ अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत कारखाना परिसर तसेच उसाच्या शेतांमध्ये जाऊन बालकांची आरोग्य तपासणी, आवश्यक उपचार आणि लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी पत्रकाद्वारे दिली.

राज्यातील विविध साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू झाल्याने उसतोड मजूर कामासाठी आपल्या कुटुंबासह घराबाहेर पडले आहेत. कारखाना परिसरात आणि शेतांमध्ये त्यांच्या तात्पुरत्या वस्त्या तयार झाल्या आहेत. या मजुरांसोबत मोठ्या संख्येने लहान मुलेही स्थलांतरित होत आहेत. मात्र, स्थलांतराच्या काळात या बालकांना नियमित आरोग्य सेवा, तपासणी आणि लसीकरणाच्या सुविधा मिळण्यात अडचणी येतात. ही बाब लक्षात घेऊन आरोग्य विभागामार्फत विशेष अभियान राबविण्यात येणार आहे.

News By

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

यह भी पढ़िए