Nagpur | आज दिनांक 9 जुलै रोजी पावसामुळे जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी!!

Nagpur Breaking | आज दिनांक 9 जुलै रोजी पावसामुळे जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी!! जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांचे आदेश

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात जोरदार पावसाचा जोर कायम आहे. सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असून वाहतुकीवरही परिणाम झाला आहे.

या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यांनी आदेश दिले असून आज दिनांक ९ जुलै २०२५ रोजी जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना एक दिवसीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

जिल्हा प्रशासनाने नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. अनावश्यक प्रवास टाळण्याचे, पुराच्या पाण्यापासून सुरक्षित अंतर राखण्याचे तसेच प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सुट्टी लागू होणारी ठिकाणे:

जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा व महाविद्यालये

सुट्टीची तारीख:फक्त ९ जुलै २०२५

पावसाचा अंदाज लक्षात घेता पुढील निर्णय परिस्थितीनुसार घेण्यात येईल, असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More posts