Category: राष्ट्रिय

  • महाराष्ट्र भूषणला उष्माघाताचा झटका ..!भूपेंद्र गणवीर  

    महाराष्ट्र भूषणला उष्माघाताचा झटका ..!भूपेंद्र गणवीर  

    महाराष्ट्र भूषणला उष्माघाताचा झटका ..!भूपेंद्र गणवीर  

    दासबोध व आध्यात्मिक प्रचार करणारे आप्पासाहेब धर्माधिकारी. सत्ताधाऱ्यांच्या वैचारिकतेला मानवणारे व्यक्तिमत्व. त्यांच्या कार्याला समाजसेवेचा मुलामा देण्यात आला. कोकणात त्यांचे प्रस्थ. त्यांचे लाखों अनुयायी श्रीसेवक. त्या मतपेटीवर राजकारण्यांचा डोळा. त्यातून महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली.

    उरलेली कसर पुरस्काराची तिथी व वेळ ठरवून काढली. राजकारणात शहकाटशह चालते. त्याची बाधा या पुरस्कारला झाली. महाविकास आघाडीची 16 एप्रिलला नागपुरात वज्रमूठ सभा होती. तिला शह देण्याचं ठरलं. मग तोच दिवस पुरस्कार वितरणाचा ठरविला. अशी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. वेळ ठरली दुपारची. दीड-दोन वाजेपर्यंत पुरस्कार सोहळा संपेल. वीस लाखाची गर्दी दिसेल. तिच्यापुढे वज्रमूठ सभा फिकी पडेल. खेळी यशस्वी होईल. चर्चा होईल महाराष्ट्र भूषण सोहळ्याची. त्या दिवशी लिड बनेल. ती अनेक दिवस चालेल. त्यानूसार गोट्या सरकल्या.

    हे समयचक्राला मान्य नव्हतं. इथंच घात झाला. त्या दिवशी नेमकं उलटं घडलं. अन् उष्माघातात एकावेळी 13 लोकांचा जीव गेला. अनाधिकृत आकडा आणखी जास्त असेल. या नोंदी कळमपूरी व वाशीतील रूग्णालयांतील आहेत . हे दोन्ही रूग्णालय 15 किलोमीटर परिसरातील. अन्य दवाखान्यात दाखल झालेल्यांचे काय झालं. हे कोणाला कळलंच नाही. ते आकडे पुढे येतील. तेव्हा मृत्यूचा नेमका आकडा पुढे येईल. तयारी 20 लाख लोक येणार म्हणून होती. बहुतेक श्रीसेवक असणार असं सांगण्यात आलं.

    त्या व्यवस्थेसाठी सुमारे 13 कोटी 62 लाख 51 हजार रूपये खर्चाचा बजेट करण्यात आला. तरी व्यवस्था कोलमडली. पिण्याचे पाणी अपुरं पडलं. आरोग्य सेवा मिळाली नाही. अन् लोकांचा बळी गेला. अनेक श्रीसेवक रात्रीच कार्यक्रम स्थळी पोहचले होते. ते उपासीतापाशी होते. तसाच त्यांनी कार्यक्रमात भाग घेतला. कडकडत्या ऊनाचे चटके बसले. तिनशेवर लोकांना दवाखान्यात दाखल करावे लागले.अन् महाराष्ट्र भूषणला गालबोट लागलं.

    धर्माधिकारी कुटुंबीय मुळचे रेवदंडा गावचे . हे कोकणातले. त्यांचे मुळ आडनाव शेन्डे. ज्योतिषी व पौरिहित्य हा त्यांचा मुळ व्यवसाय. पुढे शाडिल्य आडनावाने ओळखले जावू लागले. त्यांची आता ओळख धर्माधिकारी. आप्पासाहेब उर्फ दत्तात्रेय नारायण धर्माधिकारी यांचे वडिल नानासाहेब धर्माधिकारी यांनी सुध्दा प्रारंभी हाच व्यवसाय केला. मग दासबोधावर निरूपन करू लागले. धर्माधिकारी कुटुंबियांनी श्री समर्थ प्रसादित अध्यात्मिक सेवा समिती स्थापन केली .त्या माध्यमातून आध्यात्मिक कार्याला सुरूवात केली. तेव्हापासून त्याचे बस्थान वाढले. श्रीबैठकीत दत्त अधिष्ठान, सत्यदत्तपूजा, अंतरात्मा, पंचमहामृत, उपासना चालते. श्रवण चालते ,सदगुरू संबोधले जाते. असे अनेक नवे शब्द व अर्थ रूढ केले.

    निरूपम करणे म्हणजे वाद्यांशिवाय कीर्तन, गादीवर बसणे म्हणजे मनाचे श्लोक व ओव्याचे वाचन करणे. अशा भारी शब्दांनी अनेकांना भुरळ घातली. या मार्गे सामान्य लोकांना आकृष्ट केलं गेलं. यातून संसारात सुख मिळेल असं मनावर ठासविलं . ट्रस्ट श्रीमंत आहे. वाड्या आहेत. बंगले आहेत. आणखी बरचं काही आहे. श्रीसेवक गरीब आहेत. त्यांना फुकट राबविले जातं. असा हा निरूपनाचा धंदा जोरात आहे. व्यवस्थेची साथ आहे. सोबतीला फुकटचे श्रीसेवक आहेत. याच कारणाने संभाजी ब्रिगेडने आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाला विरोध केला होता.

    धर्माधिकारी धार्मिक गुलामी लादतात. खोटा इतिहास सांगतात.अंधश्रध्देला खतपाणी घालतात.वर्णव्यवस्थेचा पुरस्कार करतात असाआरोप केला होता. त्याकडे कानाडोळा केला. रामदासी परिवाराचे यावरच भर दिला. शिवाय श्रीसेवकांचे संख्याबळ लक्षात घेतले. याच कारणाने आतापर्यंत त्यांना राजकीय पाठबळ मिळत गेले. पुढे नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान बनले. तेव्हापासून धर्माधिकारी कुटुंबियांना सुगीचे दिवस आले. आता प्रतिष्ठानाचे वारसदार म्हणून सचिन धर्माधिकारी यांना घोषित करण्यात आले. भाजपवाले घराणेशाहीवर टिका करतात. पुरस्कार देताना घराणेशाही विसरतात. त्यामुळेच धर्माधिकारी कुटुंबात दुसऱ्यादा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याचा निर्णय वादग्रस्त बनला.

    या प्रतिष्ठानाच्या शाऴा , कॉलेज नाहीत. आरोग्य, रक्तदान व वृक्षारोपनाचे दिखावी शिबीरं चालतात. दर आठवड्याला श्रीबैठकांचा सपाटा असतो. लोकांना अध्यात्माच्या आधारे संमोहित करण्याचा प्रकार चालतो. त्याच्या आहारी गोरगरीब, मध्यमवर्गीय गेले. तेच अशा कार्यक्रमांना हजेरी लावतात. त्यांनाच उष्माघाताचा फटका बसला. आता सावरासावर सुरू आहे. भर ऊन्हात सभा घेण्याचे नियोजन कोणाचे..!त्याचा शोध घ्यावा. त्या विरूध्द सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल व्हावा.13 कोटी रूपये खर्चाचाही हिशेब व्हावा. महाराष्ट्र भूषण कार्यक्रम राजभवन सोडून मैदानात नेणे. त्याला राज्यपाल हजर नसणे .अशा अनेक गोष्टींचा शोध घेण्याची गरज आहे.

    महाराष्ट्रात उष्माघाताने इतकी माणसं एकाचवेळी दगावली. आतापर्यंतच्या इतिहासातील ही पहिली घटना होय. या अगोदरची अशी नोंद नाही. ही घटना घडली. ते स्थळ मुंबईपासून जवळ. नवी मुंबई खारघरात चॅनेलच्या सर्वाधिक पत्रकारांची वस्ती. कार्यक्रमाला झाडून सर्वांनी हजेरी लावली. घटना दुपारी घडली. सायंकाळी सहा वाजेपर्यंत कोणत्याही चॅनेलवर उष्माघाताने मृत्यूची बातमी नव्हती. मुंबईतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रूग्णालयात पोहचले. त्यांनी पहिल्यादा सात-आठ लोक दगावल्याचे चॅनेलवाल्यांसमोर सांगितले. त्यानंतर चॅनेलवर बातम्या झळकल्या. तोपर्यंत एकानेही बातमी दिली नाही. मुख्यमंत्र्यांच्या हवाल्याने आलेल्या बातम्यांनी खळबळ माजली. तोपर्यंत नागपुरातील महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा सुरू झाली होती.

    पुरस्कार सोहळ्यात काय घडलं. कोणाला कानोकान खबर नव्हती. माध्यमांनी सुध्दा आपली भूमिका पार पाडली नाही. उष्माघात बळींच्या बातमीला प्राधान्य दिलं नाही.असं कां व्हावं. हा चिंतेचा विषय आहे. जागृत पत्रकारितेचा अभाव लोकशाहीला घातक असतं असं म्हणतात. त्याची प्रचिती उष्माघात घटनेतील वृत्त संकलन उदासितेने पुन्हा एकदा समोर आली.
    ▪-भूपेंद गणवीर, नागपुर▪

  • ही भीम जयंती…!

    ही भीम जयंती…!

    ही भीम जयंती…!

    डॉ.बाबासाहेब आंबेडकर विश्वपुरूष. त्यांची जयंती . त्याच थाटात होते. जगात त्याला तोड नाही. हा सन्मान. तथागत गौत्तम बुध्दांना मिळाला. त्यानंतर हे दुसरे भारतीय. गरिबांपासून श्रीमंतापर्यंत सारेच साजरी करतात. प्रत्येकाची पध्दती भिन्न असेल. मात्र मनात भाव सारखाच. उध्दारकर्ता. दु:खी माणसाचे अश्रू पुसणे. त्यांचे दु:खहरण करणे. हेच त्यांचे ध्येय होते. त्यासाठी ते शिकले. आयुष्यभर संघर्ष करीत जगले. उपासमार सहन केली. जातीभेदाचे चटके सोसले. तरी डगमगले नाहीत. स्वाभिमान सदैव जपला. स्वार्थासाठी तडजोड केली नाही. अनेक संकटे आली. त्यांना सामोरा गेले.

    समाजहिताला कायम प्राधान्य देत. त्यापुढे स्व:ताची आणि, कुटुंबाची पर्वा केली नाही. त्यागाने ते मोठे झाले. घराघरात पोहचले. पहिल्यादा अस्पृश्यांसाठी सत्ता, संपत्ती व प्रशासनात भागिदारी मागितली.अन् लोकमनावर आरूढ झाले. त्याचे दिवसागणिक चाहते वाढत आहेत.असे ते जगातील एकमेव.

    न्यायासोबत सामाजिक न्याय ही त्यांची देणं. सामाजिक न्यायाची संकल्पना जगाने अंगिकारली. विषमता आहे. तिथे तिथे सामाजिक न्यायाची गरज आहे.ते विषमता संपविण्याचे कडू औषध आहे. हे ज्या-ज्या राष्ट्रांनी वापरले. ते राष्ट्र प्रगतीच्या शिखरावर पोहतले. जात ही शोषणाची जननी . तिच्यावर घाव घातला. आरक्षण आणलं. त्यातून सामाजिक न्याय आलं. अनेकांना जातीच्या नावावर मिळणारे आरक्षण दिसते. जातीच्या नावावर होणारे शोषण ,अत्याचार, बर्बाद झालेल्या पिढ्या, पदोपदी होणारा अपमान दिसत नाही. हे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी अनुभवले. प्रत्यक्षात भोगले. त्यामुळेच पहिला प्रहार जाती व्यवस्थेवर केला. मनुस्मृती जाळली. काळाराम मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह केला. महाड चवदार तळ्याचे पाणी प्याले.

    त्या आंदोलनाचा संबंध समता, बंधुभाव, मुलभूत हक्क व मानवी अधिकारांशी होता. जाती व्यवस्थेचे बळी ठरलेल्या 95 टक्के लोकांची चिंता वाहिली. संविधानाच्या माध्यमातून त्या सर्वांना त्यांचे अधिकार बहाल केले. महिलांच्या शोषणाविरूध्द बोलले. त्यांना न्याय दिला. सर्वासाठी शिक्षणाची दारे खुली केली.शिक्षणाचा अधिकार दिला. त्यात महिलाही आहेत. त्याचे परिणाम आहेत. विविध क्षेत्रात महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करताना दिसतात. महत्त्वाच्या पदावर दिसतात. आंदोलनाचं नेतृत्व करतात. नागपुरातचं बघाना.

    अंबाझरी उद्यानाजवळ डॉ.बाबासाहेबांचे स्मारक होतं. ते भूईसपाट केलं गेलं. ते पुन्हा उभारा. बिल्डरांना दिलेली जागा परत घ्या. या मागण्यांसाठी महिलांनी पुढाकार घेतला. आंदोलन पुकारलं. ते तीन महिन्यापासून सुरू आहे. या महिलांनी उद्या नागपूरलाच ‘मानवी साखळी ‘ वेढा घातला. तर अनेकांची पंचायत होईल. हे लोण वार्डावार्डात. घराघरात पोहचत आहे. ही आंबेडकरी उर्जा आहे. सरकारने तातडीने तोडगा काढावा.अधिक ताणने सत्ताधाऱ्यांना महागात पडेल.

    अमेरिकेने डॉ.बाबासाहेबांचा स्टॅचू उभारला. त्याखाली ‘दं सिम्बॉल ऑफ नॉलेज ” लिहलं. या सन्मानाचे ते मानकरी ठरले. शिक्षणाचे महत्त्व त्यांना कळलं होतं. ते त्यांनी शेवटच्या घटकांपर्यंत पोहचविले. लोकशाही दिली. अर्थकारण शिकविले. प्रशासन, राज्य कारभार शिकविला. धर्मनिरपेक्षतेचे धडे दिले. त्यामागे होता सर्वांना समान न्याय. जे या न्यायाच्या शर्यतीत टिकू शकणार नाहीत. त्या अशिक्षित, गरीब, दलित, आदिवासी, वंचितासाठी दिला सामाजिक न्याय. आता स्थिती थोडी वेगळी आहे. आठवा तो 1919 चा काळ . साऊथबेरो कमेटीसमोर बाजू मांडली. तेव्हा पहिल्यादा बाबासाहेबांनी सवर्ण हिंदु आणि अस्पृश्य हिंदूचा मुद्दा मांडला.अन् चळवळ व्यापक केली. येथून न्यायाची लढाई सुरू झाली. सोबत अस्पृश्य हिंदुंना न्याय हवा. तर देव, जाती, कर्मकांड आणि चुकीच्या धर्मातून स्वत:ची सुटका करा. असा अतदीपचा सल्ला दिला.

    त्या विचाराची आज अधिक गरज आहे. वर्तमानात सुध्दा छत्रपती घराण्याला वेदोक्त प्रकरणात अपमानीत व्हावे लागते. हे ते ओळखून होते. राष्ट्रवाद बळकटीसाठी धर्मनिरपेक्षता अंगिकारा असाही सल्ला दिला. धर्मनिरपेक्षतेशिवाय मजबूत राष्ट्रवाद नाही. या शब्दात सांगून गेले. कोलिफोर्नियाचे प्रांतिक सरकार जातीभेदा विरूध्द बिल आणत आहे. त्या विरोधात सवर्ण हिंदू मोर्चे काढत आहेत. याचा अर्थ विदेशात गेले. तरी मानसिकता बदलली नाही. ही मानसिकता जातीअंतानेच बदलणे शक्य आहे.

    भारतात अलिकडे सत्तेत बुजगावणे बसलेत. त्याचे वर्तन कठपुतळीचे. त्यांना विद्वतेशी देणेघेणे नाही. समतेशी बांधिलकी नाही. त्याचे एकच काम. वर्षभर निवडणूक प्रचार. सत्ता टिकविणे एवढाच ध्यास. बाकी आक्का बसले आहेत ना..! त्यांनी विक्रीचा बाजार मांडला. सरकारी उद्योग बंद. शाळा बंद. सरकारी सेवा बंद.आरोग्य सेवा बंद. सर्वांचे ठोकात खाजगीकरण. हा सामाजिक न्याय संपविण्याचा कुटील डाव . या अगोदर जिल्हा परिषद , नगर परिषदेच्या शाळेत शिकणारे आयएएस, आयपीसी होत. आता ते शोधून सांपडणार नाहीत. दर्जाच घालवला. कॉव्हेन्ट संस्कृती जन्मास घातली. तिचाच सरकारकडून उदोउदो.

    यात गावखेड्यातील मुलांचा टिकाव लागत नाही. सामाजिक न्यायाच्या संकल्पनेला मुठमाती . त्यासाठी नवीन शैक्षणिक धोरण आणलं. हे धोरण दुसरे, तिसरे काही नाही. विशिष्टांच्या स्पर्धेत अन्य टिकणार नाहीत.अशी पिढी तयार करण्याचा डाव. जेणे करून आहे ती व्यवस्था कायम राहील. इंग्रजित प्राथमिक शिक्षण हवे. तर वर्षाला एक लाख हवेत. रेशनच्या धान्यावर जगणारी 80 कोटी जनता एवढी रक्कम कुठून आणणार. त्यात जाती-जमाती आल्या. याचा अर्थ पहिल्याच स्पर्धत त्यांची मुलें बाद. हा उच्चवर्णियांचा अमृत काली डाव. या चाळणीतूनही काही पुढे गेले. इंजिनिअर, डॉक्टर व्हावयाचं तर चांगल्या कॉलेजात प्रवेश हवा. तिथे वर्षाला दोनतीन लाख रूपये हवेत. उच्च शिक्षण तर स्वप्न ठरत आहे. जी थोडीफार सरकारी मदत मिळत होती. त्यात सरकारने कपात केली. सरकारलाच सामाजिक न्यायाचा तिटकारा. गोरगरीबांच्या हुशार मुलांचे हे बौध्दिक खच्चीकरण आहे. हे लबाडांचे सरकार आहे. बौध्दिक क्षेत्रात देशाला मागे नेत आहे. त्यात सामान्य घरातील हुशार मुलें पिसली जातात. त्यांच्या संधी हिरावून घेणारी ही व्यवस्था आहे. हे संकट संपविण्यास आंबेडकरवादाची गरज आहे. हे लोकांना कळू लागले. त्या सर्वांचा भीम जयंतीत सहभाग वाढत आहे.

    जयंती निमित्त वस्त्या सजतील. गावं सजतील. शहरांमध्ये धुम असेल. तरूण-तरूणी डिजेच्या तालावर नाचतील. असंख्ये शब्द सुमने उधळली जातील. गीत, काव्य, लेखांची बरसाद असेल.भाषणांची आतिशबाजी चालेल. रोषणाईने नभ भरेल. निळाची उधळण होईल. निळे ध्वज,पताका फडफडतील. तोरणं लागतील. जयभीमचे नारे गुंजतील. माणसं रस्त्यावर दिसतील. या गोंधळातही संकल्प करणारेही असतील. कोणी उद्यमीचा संकल्प करील. तर कोणी उच्च शिक्षणाचा. काही जण व्यसनमुक्तीचा. ते पुर्ण करण्यास वर्षभर संघर्ष करतील. काम करून शिकणारेही त्यात असतील. त्यांच्या हक्कासाठी लढणारा. अधिकार मिळवून देणारा. त्यांना पदोपदी आठवेल. त्या आठवणीत भीम जयंती साजरी करतील. भारतातातील हे चित्र आता विदेशात पसरले. अनेक देश भीमोत्सव साजरा करतील. त्यात संयुक्त राष्ट्र महासंघासह ब्रिटन, अमेरिका, जपान आघाडीवर असेल.

    बाबासाहेबांमुळे शिक्षणाची गोडी वाढली. त्यातील टक्का- अर्धा टक्के व्यक्ती उच्च पदावर पोहचले. त्यांना व्यवस्था छळत आहे. त्यापैकी एक दिल्लीचे प्रा. रतनलाल . त्यांना 14 एप्रिल निमित्त भाषणासाठी ब्रिटनचे निमंत्रण येतं. तिथं त्यांची अनेक शहरात आंबेडकरांवर भाषणं होती. त्यांचा व्हिसा रोखला गेला. अमृत कालवाल्यांना एवढी विचारांची धास्ती आहे.ते सुध्दा पुष्पमाला घालण्यात आघाडीवर असतील. ही दुटप्पी मानसिकता बदलावी. या दिशेने काम व्हावे.ही खरी आदरांजल्ली….!
    ▪भूपेंद्र गणवीर▪ नागपुर 

  • ‘अभिरूप युवा संसद’ में उत्कृट सासंद का अवार्ड हिस्लोप कॉलेज की छात्र शीतल खवसे के नाम -अभिनेता अभिषेक बच्चन के हातो किया सन्मानित

    ‘अभिरूप युवा संसद’ में उत्कृट सासंद का अवार्ड हिस्लोप कॉलेज की छात्र शीतल खवसे के नाम -अभिनेता अभिषेक बच्चन के हातो किया सन्मानित

    ‘अभिरूप युवा संसद’ में उत्कृट सासंद का अवार्ड हिस्लोप कॉलेज की छात्र शीतल खवसे के नाम
    -अभिनेता अभिषेक बच्चन के हातो किया सन्मानित
    नागपुर WH न्यूज़ – ‘युवक बिरादरी’ आयोजित ‘अभिरूप युवा संसद’
    का 49वां राष्ट्रीय अधिवेशन हालही में मुंबई के मुकेश पटेल ऑडिटोरियम में आयोजित किया गया।’अभिरूप युवा संसद’ में हिस्लोप कॉलेज की शीतल विजय खवसे ने हिस्सा लिया था।उत्कृष्ठ सासंद का सम्मान शीतल खवसे के नाम दर्ज किया गया।
    फ़िल्म अभिनेता अभिषेक अमिताभ बच्चन के हातो शीतल खवसे को सम्मानित किया गया।

    इस मौके पर उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस की पत्नी गायिका अमृता फड़णवीस, पूर्व विधायक आशीष देशमुख़,रोजगार के क्षेत्र में उत्कृष्ट कार्य करने वाले, सामाजिक क्षेत्र में सेवा देने वाली रेखा राठी, कला के क्षेत्र में सेवा देने वाले संदेश जाधव प्रमुखतासे उपस्थित थे।
    इस अवसर पर डॉ. देशमुख ने इस सम्मेलन को अगले वर्ष नागपुर में आयोजित करने तथा पांच हजार युवा कलाकारों को राष्ट्रीय स्तर पर आमंत्रित करने की इच्छा व्यक्त की।


    अमृता फडणवीस ने भारतीय इतिहास पर आधारित कृतियों में कलाकारों को सम्मानित किया। युवा बिरादरी के ट्रस्टी स्वर क्रांति ने संस्था की भावी गतिविधियों की जानकारी दी। कार्यक्रम में युवा बिरादरी के अध्यक्ष पद्मश्री क्रांति शाह, उपाध्यक्ष रवींद्र धारिया, आशुतोष शिर्के, नागेंद्र राय शामिल हुए।

    प्रतिभा, उत्कृष्ट युवा सांसद एवं कला के क्षेत्र में उत्कृष्ट प्रदर्शन करने वाले 30 लोगों को 10 लाख रुपये के पुरस्कार से सम्मानित किया गया।नागपुर की शीतल विजय खवसे, औरंगाबाद की अक्सा हरीम खान, धुले की सृष्टि वाडने, यवतमाल के यश घाटगे को ‘अभिरूप युवा संसद’ पहल में उत्कृष्ट सांसद के रूप में सम्मानित किया गया।नागपुर से अनुष्का नाग,निकेश लिखार,खुशी गुप्ता,प्रज्वल निंबारते,पारस मेश्राम,खुशी बत्रा,समीक्षा अड़े,साहिल रामटके ने भी अभिरुप युवा संसद मे हिस्सा लिया।शीतल ने मिले सम्मान का श्रेय कॉलेज के शिक्षकोंको दिया।

  • भारत मे सिकलसेल पीड़ितों के सदस्य गौतम डोंगरे को ” ह्यूमन जीनोम एडिटिंग ” लंदन में रखी अपनी -14 लाख सिकलसेल पीड़ित भारत में ..!

    भारत मे सिकलसेल पीड़ितों के सदस्य गौतम डोंगरे को ” ह्यूमन जीनोम एडिटिंग ” लंदन में रखी अपनी -14 लाख सिकलसेल पीड़ित भारत में ..!

    भारत मे सिकलसेल पीड़ितों के सदस्य गौतम डोंगरे को ” ह्यूमन जीनोम एडिटिंग ” लंदन में रखी अपनी
    -14 लाख सिकलसेल पीड़ित भारत में ..!

    टिळक पत्रकार भवन नागपुर -(विजय खवसे)
    सिकलसेल पर पढ़ाई करने वाले पीड़ित के सदस्य डोंगरे को हाल ही में 6 व 8 मार्च 2023 को लंदन में होनेवाले अंतर्राष्ट्रीय कार्यक्रम में भारत से सिकलसेल पीड़ितों का प्रतिनिधित्व करने डोंगरे को मौका मिलने की जानकारी मंगलवार 14 मार्च को तिलक पत्रकार भवन में आयोजित डोंगरे ने पत्रकार परिषद में दी।

    गौतम डोंगरे ने कहा कि एक ऐतिहासिक पल है , और हम सभी सिकलसेल पीड़ितों के लिए गर्व की बात है . ” ह्यूमन जीनोम एडिटिंग ” पर तीसरा अंतर्राष्ट्रीय शिखर सम्मेलन , लंदन , यूके मे 6 व 8 मार्च 2023 को मेज़बान : द रॉयल सोसाइटी लंदन , द यूएस नेशनल एकेडमी ऑफ साइंसेज एंड मेडिसिन , द यूके एकेडमी ऑफ मेडिकल साइंसेज एंड द वर्ल्ड एकेडमी ऑफ साइंसेज एंड यूनेस्को में ” जीन एडिटिंग ” इस विषय पर भारत के सिकलसेल पीड़ितों के पहलुओं पर चर्चा करने के लिए एक वक्ता के रूप में आमंत्रित किया गया ।
    आगे कहा कि मैंने पूरे 3 दिनों के शिखर सम्मेलन में हिस्सा लिया और पहले दिन अपना भाषण दिया ।

    लंदन सम्मेलन का डोंगरे का पूरा भाषण :
    नमस्कार ! ह्यूमन जीनोम एडिटिंग पर तीसरे अंतर्राष्ट्रीय शिखर सम्मेलन में मुझे आमंत्रित करने के लिए बहुत – बहुत धन्यवाद । हम रॉयल सोसाइटी , द यूएस नेशनल एकेडमी ऑफ साइंसेज एंड मेडिसिन , यूके एकेडमी ऑफ मेडिकल साइंसेज और द वर्ल्ड एकेडमी ऑफ साइंसेज के बहुत आभारी हैं । मुझे लगता है , यह पहली बार है कि भारत के एक सिकलसेल पीड़ितों के प्रतिनिधि को एक अंतर्राष्ट्रीय कार्यक्रम में व्यक्तिगत रूप से आमंत्रित किया गया है , यह हमारे लिए बहुत खुशी और गर्व का क्षण है ।

    ” ह्यूमन जीनोम एडिटिंग ” एक बहुत बड़ी आशा है । आज , पूरी दुनिया में जानलेवा सिकलसेल रोग से पीड़ित लाखों लोगों को स्थायी इलाज की आवश्यकता है । मेरे भारत में 14 लाख से ज्यादा मरीज अभी भी इस बीमारी से मुक्त होने का इंतजार कर रहे हैं …. जैसा कि आप सभी जानते हैं , भारत विश्व में सिकल सेल रोग वाला दूसरा सबसे बड़ा देश है । बेशक , बोन मैरो ट्रांसप्लांटेशन और जीन एडिटिंग थेरेपी समय की एक बड़ी जरूरत है , लेकिन फिर भी यह आम पीड़ितों के पहुंच के बाहर है , इसीलिए हम कायम इलाज के अभाव में जिंदगी और मौत के बीच संघर्ष कर रहे है . आपको सूचित करते हुए खुशी हो रही है और अधिकांश लोग यह जानते है कि भारत सरकार 2017 से CRISPR Cas9 तकनीक विकसित करने के संबंध में शुरुआत कर चुकी है ।

    डॉ देबोज्योति चक्रवर्ती , जो इंस्टीट्यूट ऑफ जीनोमिक्स एंड इंटीग्रेटिव बायोलॉजी ( IGIB ) , वैज्ञानिक और औद्योगिक अनुसंधान परिषद ( CSIR ) के प्रधान वैज्ञानिक हैं , भारत में इस महत्वपूर्ण शोध का नेतृत्व कर रहे हैं ।

    www.indiascdalliance.org हम सभी जानते हैं कि CRISPR तकनीक एक सफल तकनीक है , लेकिन फिर भी यह बहुत ही महंगी है , मुझे लगता है कि प्रति रोगी का इलाज लगभग 1 मिलियन अमरीकी डालर ( 1 करोड़ रुपए ) है , हम आम भारतीय सिकलसेल पीड़ितों के लिए संभव नहीं है . हमारे भारतीय शोधकर्ता इस बात पर काम कर रहे है कि गुणवत्ता से समझौता किए बिना लागत को कैसे कम किया जाए । मुझे पता चला है कि यह शोध ” प्री क्लिनिकल चरण ” में है और संभवतः प्री क्लिनिकल चरण के पूरा होने के बाद वे भारत में चरण ( फेज़ 1 ) का परीक्षण शुरू कर सकते हैं ।

    मैं व्यक्तिगत रूप से , वैश्विक सिकल सेल रोगी समुदाय की ओर से , आप सभी शोधकर्ताओं और वैज्ञानिकों से इन भारतीय शोधकर्ताओं से जुड़ने का अनुरोध करना चाहता हूं , आपकी विशेषज्ञता निश्चित रूप से इसे तेजी से बनाने में मदद करेगी । पूरे विश्व में हम सिकलसेल पीड़ित कम उम्र में ही मर रहे हैं , फिर भी ” सस्ती जीन थेरेपी ” हमारा सपना है जिससे हम सिकलसेल मुक्त हो सकते है , तब तक जिंदा रहना हमारी पहली आवश्यकता है । हमें अनुभव हुआ है कि हाइड्रॉक्सीयूरिया एकमात्र सस्ती औषधि है जो हमारे जीवन की गुणवत्ता में सुधार कर रही है , इसलिए हमारी प्राथमिकता है कि हम इसे नियमित रूप से नजदीकी अस्पताल से प्राप्त कर सके , यह प्रत्येक जिला अस्पताल और प्राथमिक स्वास्थ्य केंद्र में उपलब्ध होना चाहिए ।

    प्रत्येक चिकित्सा अधिकारी को हाइड्रोक्सीयूरिया की खुराक कैसे देना यह पता होनी चाहिए , उन्हें हाइड्रोक्सीयूरिया निर्धारित करने के प्रोटोकॉल का पता होना चाहिए , अगर ऐसा होता है तो हम कम उम्र में मरने वालों की संख्या को रोक सकते है और साथ ही हम अपने राष्ट्र पर बढ़ रहे आर्थिक बोझ को कम कर सकते हैं । मैं इस अवसर पर आपको बताना चाहता हूं कि , हाल ही में भारत सरकार के वित्त मंत्री ने बजट सत्र 2023-24 में ” मिशन सिकल सेल रोग उन्मूलन 2047 ” की घोषणा की है ।

    भारत सरकार सिकलसेल रोग के उन्मूलन के प्रति बहुत सकारात्मक है और अगले 3 वर्षों में 7 करोड़ लोगों की सिकलसेल जांच के लिए प्रतिबद्ध है । हम सिकलसेल संगठनों के राष्ट्रीय गठबंधन NASCO भारत सरकार के साथ मिलकर काम कर रहे है और भारत में सिकलसेल मिशन की घोषणा के बाद बहुत खुश और गौरवान्वित महसूस कर रहे हैं । अंत में , मैं दो सिकलसेल पीड़ित बच्चों के पिता , नेशनल अलायंस ऑफ सिकलसेल ऑर्गेनाइजेशन NASCO का सचिव , ग्लोबल एलाइंस ऑफ सिकलसेल डिजीज ऑर्गेनाइजेशन GASCDO का बोर्ड मेंबर होने के नाते आप सभी से विनम्र अनुरोध करना चाहता हूं कि इस विश्व से जानलेवा अनुवांशिक सिकलसेल रोग को मिटाने के लिए कृपया हम सभी साथ मिलकर काम करने का आव्हान पत्रकार परिषद में नेस्को मेम्बर के साथ उपस्थित थे।

     

  • पत्रकार प्रशिक मकेश्वर यांच्यावरील हल्ल्यातील आरोपींना अटक करा  – महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची मागणी

    पत्रकार प्रशिक मकेश्वर यांच्यावरील हल्ल्यातील आरोपींना अटक करा – महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची मागणी

    पत्रकार प्रशिक मकेश्वर यांच्यावरील हल्ल्यातील आरोपींना अटक करा

    – महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची मागणी

    अमरावती –  दैनिक सकाळ समूहाचे तालुका प्रतिनिधी प्रशिक मकेश्वर यांच्यावर गावगुंडांनी प्राणघातक हल्ल्या केला. या घटनेचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ (मुंबई) अमरावती च्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला आहे. या घटनेतील आरोपींवर पत्रकार सुरक्षा कायदा २०१९ नुसार
    कडक कारवाई करून अटक करण्यात यावी, या मागणीला घेऊन सोमवारी (दि.१३) रोजी पत्रकार संघाच्या वतीने पोलीस अधीक्षक ग्रामीण यांना निवेदन देण्यात आले. दोन दिवसात आरोपींना अटक करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा संघटनेचे विभागीय अध्यक्ष नयन मोंढे यांनी दिला आहे. घटनेचा नागपुरात ही निषेध व्यक्त केला .

    तिवसा येथील दैनिक सकाळचे प्रतिनिधी प्रशिक मकेश्वर यांच्यावर तिवसा शहरातील काही गावगुंडांच्या कुटुंबियांकडून आज सोमवारी सकाळी राहत्या घरी जीवघेणा हल्ला चढविला. यावेळी घरी कुटुंबासमवेत असलेल्या प्रशिक मकेश्वर यांना मारहाण करण्यात आली. या घटनेमुळे सर्वत्र असंतोषाची लाट उसळली आहे. अनेक पत्रकार बांधव, संघटना निषेध व्यक्त करीत आहे. पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत आरोपींवर तत्काळ अटक करावी, अन्यथा आगामी काळात तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांना निवेदनातून देण्यात आला आहे. यावेळी माननीय पोलीस अधीक्षक यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

    यावेळी विभागीय अध्यक्ष नयन मोंढे, जिल्हाध्यक्ष प्रवीण शेगोकार, कार्याध्यक्ष देविदास सूर्यवंशी, उपाध्यक्ष अली अजगर दवावाला, महासचिव शोहेब खान, शहराध्यक्ष अजय श्रुंगारे, अनिरुद्ध उगले, उपाध्यक्ष दिलीप जवंजाळ, वरिष्ठ पत्रकार संजय शेंडे, सुरेंद्र आकोडे, नितेश राऊत, अमोल देशमुख, प्रणव निर्बाण, अमर घटारे, सुरज दहाट, स्वप्नील उमप, सुधीर भारती, भैय्या आवारे, अशोक जोशी, अमोल खोडे, सुधीर गणवीर, प्रसिद्धी प्रमुख सागर तायडे, राजरत्न मोटघरे, जिल्हा महिला अध्यक्ष मीनाक्षी कोल्हे, महिला शहर सुरुची बनगैय्या, समीर अहमद, शफीक अहमद, सतीश वानखडे, सागर डोंगरे, स्वप्नील सवाळे, वैभव अवटीक, गजानन खोपे, अक्षय पुंडेकर, युवराज उमरीकर आदी उपस्थित होते.

    नागपुरातही घटनेचा निषेध..डिजिटल न्यूज़ पोर्टल संघा तर्फे करण्यात आला.पत्रकार सुरक्षित नाही…पत्रकारांवर हल्ले वाढले, कारण सरकार कड़क कार्रवाई करीत नाही.पत्रकार हल्ले प्रकरण फास्ट कोर्टात चालवून आरोपिस कड़क शिक्षा व्हावी अशी मागणी सचिव विजय खवसे यांनी केली*

     

  • जिल्हाधिकारी सह विभागीय आयुक्त ,सचिव मंत्रालय विरुद्ध बंड.  – दिल्लीत आवाज बुलंद करून कुंसुबीच्या आदिवासी प्रकरणात न्याय मिळवून देणार.  -बाजु मांडन्यासाठी तलाठी विनोद खोब्रागडे दिल्लीला रवाना .

    जिल्हाधिकारी सह विभागीय आयुक्त ,सचिव मंत्रालय विरुद्ध बंड. – दिल्लीत आवाज बुलंद करून कुंसुबीच्या आदिवासी प्रकरणात न्याय मिळवून देणार. -बाजु मांडन्यासाठी तलाठी विनोद खोब्रागडे दिल्लीला रवाना .

    जिल्हाधिकारी सह विभागीय आयुक्त ,सचिव मंत्रालय विरुद्ध बंड.

    – दिल्लीत आवाज बुलंद करून कुंसुबीच्या आदिवासी प्रकरणात न्याय मिळवून देणार.

    बाजु मांडन्यासाठी तलाठी विनोद खोब्रागडे दिल्लीला रवाना .

    दिल्ली /नागपुर ( चक्रधर मेश्राम). २८/२/२०२३:-

    भारताचा इतिहासातील पहीलीच घटना आहे. न्याय व हक्कासाठी भारताची राजधानी दिल्लीत संघर्ष करण्यासाठी विनोद खोब्रागडे आपल्या अन्यायग्रस्त आदिवासी बांधवांना घेऊन निघाले आहेत.
    कोरा कागद निळी शाही.मी कुनाचा बापाला भित नाही.
    संविधान अपने साथ है।
    डरने की क्या बात है। असे ते ठणकावून सांगतात.
    शासन,प्रशासन,
    लोकप्रतिनिधी,आमदार,
    खासदार,मंत्री, हे मागील 42 वर्षांपासून कुंसुबीच्या आदिवासीनां न्याय व हक्क मिळवून देन्यास कंपनी पुढे अपयशी ठरले.
    अखेर जबाबदार नागरिक, कायद्याचे अभ्यासक,विनोद खोब्रागडे यांनी गरिब वंचित,आदिवासीवर करुणा दाखवली,व सन 2013 पासूनच शासनाकडे पाठपुरावा केला.


    तसेच राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाला गंभीर तक्रार केली. व आयोगानी दखल घेऊन जिल्हाधिकारी विनय गौडा यांना नोटीस दिली, दुसऱ्यांदा समन्स काढले ,तिसऱ्यांदा अटक वारंट काढले. आणि आता दिल्लीत 1/3/2023 ला सकाळी 10.00 वाजता सुणावनी आहे.
    राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोग दिल्ली यांनी दिनांक 2/3/2023 ला होणारी सुनावणी एक दिवस आधी दिनांक 1/3/2023 ला सकाळी 10-00 वाजता ठेवली आहे. कुंसुबीच्या आदिवासी प्रकरणात जिल्हाधिकारी विनय गौडा यांना अटक वारंट मुंबईचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ हे अटक वारंट बजावनार आहेत.

    विनोद खोब्रागडे यांनी पुराव्यासह तक्रार केली . 10/9/ 2013 पासूनच पाठपुरावाही केला. मात्र शासन,प्रशासन,
    लोकप्रतिनिधी,चुपचाप पाहत होते.
    जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी बोगस अहवाल,व 2021 मध्ये तलाठी विनोद खोब्रागडे वर कारवाई केली म्हणून त्यांनी आयोगाला तक्रार केली असे बोगस उत्तर कापी राईट करून,अनेक चुका करून 1ते 17 पानांचा अहवाल दिनांक 30/1/2023 ला आयोगाला दिला असल्याचे मत विनोद खोब्रागडे यांनी व्यक्त केले.
    भारतीय संविधानातील अनुच्छेद 338 अ नुसार विशेष अधिकार आहेत. संपूर्ण भारतातील आदिवासी बांधवावर अन्याय,अत्याचार, करना-यांवर फौजदारी कारवाई करण्याचे अधिकार आहेत. आणि भारतात 4,926 IAS जिल्हाधिकारी भारतात आहेत, बाकीचे IAS सोडून. आदिवासीच्या हिताचे रक्षण करणे आणि कारवाई करण्याच अधिकार आयोगाला आहेत.

    तत्कालीन साहाय्यक जिल्हाधिकारी शांतनु गोयल यांनी तर सरकारी रेकॉर्ड खोडतोड करून,मोबदला 1985 ला पेड झाले असे खोटे शपथपत्र मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर रिठ क्रमांक 913/2015 दिनांक 10/3/2016 ला करून दिले आणि न्यायालयाची दिशाभूल केली.त्यात आदिवासीची फसवणूक केली आहे.
    कंपनीने 2/2/2023 मोबदला दिला नाही असे लेखी स्वरूपात दिले.तसेच उपविभागीय अधिकारी राजुरा यांनी 12/12/2022 ला माहिती दिली ,कि कुंसुबीचा आदिवासीनां मोबदला दिला नाही.पुनर्वसन केले नाही,प्रत्यक्ष ताबा 42 वर्षांपासून दिला नाही. तहसीलदार प्रशांत बेडसे यानी सुध्दा 2018 मध्ये कुंसुबीचा आदिवासीनां मोबदला दिला नाही असे लिहून दिले.आणि तोच अधिकारी कुंसुबीचा गावासह 24 आदिवासीचां 63.62 हे.आर.जमीनीचा ताबा दिनांक 3/2/2021 ला कंपनी बेकायदेशीर दिला आहे.
    दिनांक 1/3/2023 चा निकालाकडे देशवासियांचे लक्ष वेधले आहे असे विनोद खोब्रागडे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

  • नागपुरचा  मानस ‘परिक्षा पे चर्चा’ दिल्ली मध्ये चमकला

    नागपुरचा  मानस ‘परिक्षा पे चर्चा’ दिल्ली मध्ये चमकला

    नागपुरचा  मानस ‘परिक्षा पे चर्चा’ दिल्ली मध्ये चमकला

    नागपुर – दिल्लीतील तालकटोरा स्टेडियम मध्ये दिंनाक २७ जानेवारी २०२३ ला आयोजित “ परिक्षा पे चर्चा ” या मालिकेतील सहाव्या कार्यक्रमात नागपूरातील कवी श्री . रमेश ढाकूलकर यांचा नातू चि मानस ढाकूलकर याची सुध्दा संपूर्ण महाराष्ट्रातील विदयार्थ्या मधून निवड झाली होती . मानस हा केदिंय विघालय गिरी नगर , पुणे येथे नवव्या वर्गाचा विदयार्थी आहे .

    दोन तासाच्या या कार्यक्रमात मा . नरेन्द्रजी मोदी यानी संपुर्ण विदयार्थाना यशाचा मंत्र दिला . या कार्यक्रमासाठी मानस ची निवड होणे हि संपुर्ण महाराष्ट्रासाठी गौरवाची बाब आहे . सभागृहात मोदी येताच संपुर्ण विदयार्थ्या मध्ये प्रचंड उत्साह व आत्मविश्वास संचारला असे मानस ने सांगितले . डोक्यावर लाल रंगाची महाराष्ट्रीयन पगडी व पांढरा कुर्ता पयजामा असा पेहराव मानस साठी निवडण्यात आला होता .

    मोदीजी आणि मानस यांच्या सभाषणात मोदीजी मराठीतच बोलले . मानस सोबत एक फोटो सुध्दा काढला . अश्या या अभुतपुर्व कार्यक्रमात मानसची निवड होणे अभिमानाची बाब आहे . तो यशाचे श्रेय वडिल उमेश ढाकूलकर , आई सौ . पल्लवी ढाकूलकर तसेच सपुर्ण शिक्षकाना देतो .

  • राष्ट्रीय राजमार्गों पर अर्जुन के सैकड़ों पेड़ सुरक्षित हैं बोधिसत्व नागार्जुन का जन्म मनसर में हुआ था भदंत नागार्जुन सुरई ससाई द्वारा सूचना – केंद्रीय मंत्री नितिन गडकरी का माना धन्यवाद

    राष्ट्रीय राजमार्गों पर अर्जुन के सैकड़ों पेड़ सुरक्षित हैं बोधिसत्व नागार्जुन का जन्म मनसर में हुआ था भदंत नागार्जुन सुरई ससाई द्वारा सूचना – केंद्रीय मंत्री नितिन गडकरी का माना धन्यवाद

    राष्ट्रीय राजमार्गों पर अर्जुन के सैकड़ों पेड़ सुरक्षित हैं
    बोधिसत्व नागार्जुन का जन्म मनसर में हुआ था
    भदंत नागार्जुन सुरई ससाई द्वारा सूचना
    – केंद्रीय मंत्री नितिन गडकरी का माना धन्यवाद
    नागपुर (विजयकुमार खवसे)
    यह आशंका थी कि आयुर्वेद और रसायन विज्ञान के जनक और महायान (बुद्धिजम) के संस्थापक बोधिसत्व नागार्जुन की जन्मस्थली मानसर में राष्ट्रीय राजमार्ग पर एक सड़क के निर्माण के दौरान अर्जुन के सैकड़ों पेड़ों को काट दिया जाएगा। हालांकि, इंजीनियरों के कौशल और सरलता के कारण अर्जुन के पेड़ पर चोट भी नहीं लगी थी। सैकड़ों पेड़ आज भी सुरक्षित हैं इसका आनन्द है।

    दीक्षाभूमि स्मारक समिति के अध्यक्ष धम्मसेना नायक भदंत आर्य नागार्जुन सुरी ससाई ने हमारे संवाददाता से बातचीत में कहा सड़क किनारे अर्जुन के पेड़ो को चारों ओर एक सुरक्षा कवच बनाया गया है। उनकी देखभाल भी हो रही है।सड़क निर्माण वे पेड़ बच गए।इसके लिए केंद्रीय मंत्री नितिन गडकरी का भन्तेजीने धन्यवाद भी माना।रविवार को इंदौरा बुद्ध विहार स्थित अपने आवास पर बोल रहे थे।

    बोधिसत्व नागार्जुन का जन्म तथागत गौतम बुद्ध के जन्म के 600 साल बाद विदर्भ में हुआ था, कुमारजीव ने नागार्जुन की अपनी जीवनी में इसका उल्लेख किया है। हालाँकि, उनका जन्म कहाँ (स्थान) हुआ था, इसका कोई उल्लेख नहीं है। नागार्जुन के सौ साल बाद पैदा हुए कुमारजीव ने महायान त्रिपिटक का चीनी भाषा में अनुवाद भी किया। बाद में भदंत सासाई ने मानसर में खुदाई और शोध किया और घोषणा की कि मानसर नागार्जुन का जन्मस्थान था। ससाई ने यह भी कहा कि इस क्षेत्र के सैकड़ों अर्जुन वृक्ष नागार्जुन के जन्म की गवाही देते हैं।
    रामटेक-तुमसर राष्ट्रीय राजमार्ग के दोनों किनारों पर लगभग 300 अर्जुन के पेड़ हैं। हाल ही में इस राष्ट्रीय राजमार्ग के निर्माण का कार्य हाथ में लिया गया। आशंका जताई जा रही थी कि इससे सड़क के दोनों ओर 40 से 50 फीट ऊंचे पेड़ गिर जाएंगे। प्रारंभ में, सड़क के निर्माण के दौरान, नागार्जुन हिल के नीचे पांच पेड़ काट दिए गए थे।

    भंते ससाई ने कहा कि इस तरह की बात से काफी सदमा पहुंचा है और दुख पहुंचा है ।
    इस संबंध में राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, रामटेक कार्यालय के अधिकारियों से चर्चा की। उन्होंने रामटेक के पूर्व विधायक मल्लिकार्जुन रेड्डी के साथ केंद्रीय मंत्री नितिन गडकरी से भी मुलाकात की और बयान दिया। इस अवसर पर अर्जुन वृक्ष का महत्व बताया गया। गडकरी ने सासई की भावनाओं को देखते हुए तुरंत अधिकारियों को निर्देश दिया। उन्होंने ध्यान देने को कहा कि सड़क निर्माण के दौरान एक भी पेड़ नहीं काटा जाएगा। सैकड़ों पेड़ों को बचाने के लिए इंजीनियरों और अधिकारियों ने सूझबूझ और कौशल का इस्तेमाल किया है। सुरी ससाई ने सड़क निर्माण के दौरान अर्जुन के पेड़ को सुरक्षित रखने के लिए केंद्रीय मंत्री नितिन गडकरी को धन्यवाद दिया.

    अर्जुन के 700 पौधे
    सुरी ससाई ने आयुर्वेदाचार्य नागार्जुन की जन्मस्थली पर 700 से अधिक अर्जुन के पेड़ लगाए। बोधिसत्व नागार्जुन महाविहार, नालंदा महाविहार, मंजुश्री महाविहार, किसा गौतमी विहार क्षेत्र में बड़े पैमाने पर पौधरोपण किया गया। अब पेड़ बड़ा होता जा रहा है और जो लोग पेड़ को देखते हैं वे खुशी से भर जाते हैं।यदि इस पर भन्तेजी ससाई ध्यान नही देते तो सड़क निर्माण में शकड़ो पेड़ो की कटाई होती।भन्तेजी ने शकड़ो पेड़ो को बचाया इसकी खुशी भी भदंत नागार्जुन सुरई ससाई को होने की बात कही।

  • नवनीत राणा राजस्थान के दौरे पर…करेंगी हनुमान चालीसा का पाठ’….अमरवती में क्यो नही कर रही पाठ? 2024 में राणा का भविष्य अधर..भाजपा का लेना होंगा साथ

    नवनीत राणा राजस्थान के दौरे पर…करेंगी हनुमान चालीसा का पाठ’….अमरवती में क्यो नही कर रही पाठ? 2024 में राणा का भविष्य अधर..भाजपा का लेना होंगा साथ

    नवनीत राणा राजस्थान के दौरे पर…करेंगी हनुमान चालीसा का पाठ’….अमरवती में क्यो नही कर रही पाठ?
    2024 में राणा का भविष्य अधर..भाजपा का लेना होंगा साथ

    जोधपुर –अमरावती की फायर ब्रांड सांसद नवनीत राणा आज जोधपुर पहुंची. जोधपुर एअरपोर्ट पर मीडिया से रूबरू हुईं तो हनुमान चालीसा पाठ, भारत जोड़ो यात्रा समेत तमाम मुद्दों पर खुलकर राय रखी दावा किया कि अबकी बार राजस्थान में उनकी विचारधारा वाली सरकार बनेगी. राणा पांच दिन के दौरे पर राजस्थान आई हैं.राणा आखिर अमरवती जिले में क्यो हनुमान चालीसा पाठ नही कर रहीं।जँहा पर लोगो ने निर्दलीय चूनकर दिया अब 2024 में नवनीत को चुनावी यात्रा आसान नही है।अब तो भाजपा का साथ लेना ही होंगा।इसीलिए हनुमान चालीसा पढ़ने की नवनीत को याद आ रही है।

    जोधपुर मिशन 2023 की तैयारी में बड़ी पार्टियां और बड़े नेता ही नहीं बल्कि इंडिपेंडेंट भी जुट गए हैं. समान विचारधारा की बात फिजाओं में गूंजने लगी है. जोधपुर पहुंची सांसद नवनीत राणा ने ऐसा ही कुछ कहा (MP Navneet Rana in Jodhpur). महाराष्ट्र में उद्धव ठाकरे को आंखें दिखाने वाली राणा ने संकेत दिए हैं कि वो प्रदेश सरकार के सामने अच्छी खासी चुनौती पेश करेंगी. स्पष्ट किया कि वो बार-बार राजस्थान आएंगी.

    समान विचारधारा की बात- निर्दलीय सांसद नवनीत राणा ने कहा कि राजस्थान में भी आने वाले समय में हमारी विचाराधारा से जुड़ी सरकार बनेगी. इसके लिए राजस्थान में भी अब हनुमान चालीसा का पठन जरूरी है. यहां पर भी इसकी बहुत जरूरत है. जल्द ही समय के साथ हम हनुमान चालीसा का यहां पठन करेंगे. हुए सांसद ने कहा कि आने वाले दिनों में मैं कई बार राजस्थान आऊंगी.

    भाजपा हिंदुओं के हित में- उन्होंने भाजपा का नाम लिए बगैर कहा कि हमारी विचाराधारा वाली सरकार यहां बनेगी. सांसद ने कहा कि भाजपा की सरकार ही हिंदुओं के हित का काम करती है. भारत जोड़ो यात्रा पर कहा कि भारत टूटा ही नहीं है, कश्मीर टूटा था धारा 370 हटाकर जोड़ दिया. उल्लेखनीय है कि सांसद नवनीत राणा ने 2022 में महाराष्ट्र के तत्कालीन सीएम उद्धव ठाकरे के घर के बाहर हनुमान चालीसा का पाठ करने की घोषणा की थी. तभी उन्हें और उनके पति को पुलिस ने गिरफ्तार कर लिया था.

    पठान को बायकॉट न करें’- विदेश मामलों संबंधी स्थायी समिति की सदस्य नवनीत राणा एक फिल्मी कलाकार रही हैं. जब उनसे पठान फिल्म के बायकॉट को लेकर सवाल किया गया तो उन्होंने कहा- बायकॉट नहीं करना चाहिए. अगर हमें किसी बात पर आपत्ति है तो वह काम सेंसर बोर्ड करता है. मैं समझती हूं कि बोर्ड अपना काम कर भी रहा है. फिल्म निर्माण से बहुत ज्यादा लोग जुड़े होते हैं. बड़ी अर्थव्यवस्था है. जिससे रोजगार मिलते हैं इसलिए बायकॉट नहीं होना चाहिए.

    पहलवानों के धरने पर भी बोलीं नवनीत- महिला पहलवानों के संघ अध्यक्ष पर लगाए गए यौन उत्पीड़न पर भी सांसद से सवाल पूछा गया. जिस पर उन्होंने कहा कि महिलाओं का अपमान करने वाले को सजा मिलनी चाहिए. वह किसी भी पद पर हो या उसका नाम किससे जुड़ा हो यह नहीं देखा जाना चाहिए. ऐसे लोगों की जांच के बाद सजा तय होनी चाहिए.

    पांच दिन के दौरे पर समिति- पूर्व केंद्रीय राज्यमंत्री एवं पाली सांसद पीपी चौधरी की अध्यक्षता में संसद की विदेश मामलों संबंधी स्थायी समिति शुक्रवार से पांच दिन के दौरे पर राजस्थान आई हैं. समिति पांच दिन के दौरे में पाली और उदयपुर भी जाएगी. इस दौरान जोधपुर, पाली एवं उदयपुर में पांच दिन के प्रवास पर अनेक महत्वपूर्ण विषयों पर विभिन्न मंत्रालयों के अधिकारियों के साथ बैठक कर संसद के पटल पर अपनी रिपोर्ट प्रस्तुत करेगी. समिति में 20 लोकसभा एवं 10 राज्य सभा सदस्य हैं.

  • अ . भा . अंनिसचे आव्हान न स्वीकारताच  दिव्यशक्ती’चा दावा करणाऱ्या  धीरेंद्र कृष्ण महाराजांनी काढला पळ..!

    अ . भा . अंनिसचे आव्हान न स्वीकारताच  दिव्यशक्ती’चा दावा करणाऱ्या  धीरेंद्र कृष्ण महाराजांनी काढला पळ..!

    अ . भा . अंनिसचे आव्हान न स्वीकारताच  दिव्यशक्ती’चा दावा करणाऱ्या  धीरेंद्र कृष्ण महाराजांनी काढला पळ..! तक्रार नोंदवूनही गुन्हा दाखल नाही, विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी अ.भा . अंनिसचा आंदोलनात्मक पवित्रा, आयोजकांवरही कारवाईची मागणी

    नागपूर  प्रतिनिधी WH NEWS ) : ‘ दिव्यशक्ती ‘ असल्याचा दावा करणारा २६ वर्षीय तरुण धीरेंद्र कृष्ण महाराज यांनी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ३० लाख रुपयांचे आव्हान न स्वीकारताच नागपूरच्या रेशीमबाग मैदानातून पळ काढला आहे . जादूटोणा विरोधी कायद्यानुसार या धीरेंद्र कृष्ण महाराजावर तातडिने गुन्हा नोंदवून अटक करावी अशी मागणी महाराष्ट्र सरकारच्या जादूटोणा विरोधी कायदा प्रचार प्रसार , कार्यक्रम अंमलबजावणी समितीचे सहअध्यक्ष आणि अ.भा. अंनिसचे राष्ट्रीय संघटक श्याम मानव यांनी नागपूरच्या पोलीस आयुक्तांकडे केली आहे .

    नागपूरच्या टिळक पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना प्रा . श्याम मानव म्हणाले की , धीरेंद्र कृष्ण , बागेश्वर धाम , जिल्हा छत्तरपुर , मध्य प्रदेश यांनी दिव्य दरबारात केलेल्या ‘ चमत्कारिक दाव्यासंबंधी ‘ ‘ जादूटोणा विरोधी कायदा २०१३ व ड्रग अँड मॅजिक रेमेडिज अॅक्ट १ ९ ५४ या दोन्ही कायद्यानुसार गुन्हा ठरू शकणारे दिव्य दरबार व्हिडिओज ‘ ( युट्युब वर उपलब्ध असलेले ) मधील सारे पुरावे लिखित स्वरूपात व व्हिडिओ स्वरूपात दि . ८ जानेवारी २०२३ ला कार्यवाही करण्याच्या विनंतीसह सहायक पोलीस आयुक्त ( गुन्हे ) श्री . रोशन पंडित यांच्याकडे दिले होते . जादूटोणा विरोधी कायद्यासाठी समन्वयक दक्षता अधिकारी म्हणून शासनाने सहायक पोलीस आयुक्त ( गुन्हे ) यांच्याकडे जबाबदारी सोपविली आहे .

    घडू पाहणारा गुन्हा प्रतिबंधित करण्याचा , थांबवण्याचा आणि झालेल्या गुन्ह्याची तक्रार दाखल करून आवश्यक ती कार्यवाही करण्याची जबाबदारी दक्षता अधिकाऱ्यांकडे ( जादूटोणा विरोधी कायद्यासंबंधी ) असते . – पोलीस आयुक्ताची भेट दि . १० जानेवारी २०२३ ला नागपूरचे पोलीस आयुक्त श्री . अमितेश कुमार यांना प्रत्यक्ष भेटून धीरेंद्र महाराजांच्या चमत्कारिक दाव्यांची कायद्यानुसार तो कसा गुन्हा ठरतो यासंबंधी सविस्तर माहिती जादूटोणाविरोधी कायदा प्रचार प्रसार अंमलबजावणी समितीच्या सहअध्यक्ष या नात्याने श्याम मानव यांनी दिली आणि कठोर कार्यवाहीची अपेक्षा विशद केली आहे .

    नागपूरच्या दिव्य दरबाराची चित्रफीत सादर ! दि . १० जानेवारी २०२३ ला नागपूरच्या रेशीमबाग परिसरात धीरेंद्र कृष्ण यांनी आयोजित केलेल्या दि . ७ व ८ दिव्य दरबाराची चित्रफीत सहायक पोलीस आयुक्त ( गुन्हे ) यांच्याकडे नव्या अर्जासह सादर केली . याही चित्रफीतीत धीरेंद्र कृष्ण यांनी नाव , वडिलांचे नाव आपोआप दिव्यशक्तीने ओळखल्याचा दावा केलेले पुरावे आहेत . ते पुढीलप्रमाणे- ‘ बागेश्वर धाम सरकार का दिव्य दरबार जानेवारी २०२३ सुबह ९ बजे से ‘ ( वेळ : २:५८:३८ ) या मथळ्याखाली व्हिडिओ युट्युब वर प्रसारित झाला आहे , उपलब्ध आहे .

    यात जादूटोणा विरोधी कायदा व ड्रग्स अँड मॅजिक रेमेडीज अॅक्ट चे उल्लंघन करणारे अनेक पुरावे उपलब्ध आहेत . हा व्हिडिओ व त्यातील पुराव्यांकडे पुन्हा सहायक पोलीस आयुक्त ( गुन्हे ) यांचे लक्ष वेधण्यात आले . पुरावे उपलब्ध करून देण्यात आले आहेत . ‘ भूत बाधा की सवारी आती है , उपद्रव किया गया है , गंदी तांत्रिक क्रिया है ‘ ( १.१०.४० से १.११.२८ ) . ” तबियत ठीक नहीं रहती , तात्काळ मृत्यू , अभी तक घर मे ५ मृत्यू हुई है , पितृदोष के कारण …. ( ५५ मिनीटसे ) . ‘ आपके पिता का नाम शंकर लाल है । माईक से बोले या सब नही तो हम तुम्हारे सारे कांड खोल देंगे ‘ ( १.४० ते १.५६ ) . असे कितीतरी पुरावे उपलब्ध आहेत . अ.भा. अंनिसचे दिव्यशक्ती सिद्ध करण्याचे आव्हान • अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे धीरेंद्र कृष्ण यांना केले.

    आपोआप नाव , वय , मोबाईल नंबर ओळखून दाखवा , शेजारच्या रूम मधील दहा वस्तू ओळखून दाखवा व चित्रफित केलेल्या दाव्यानुसार दिव्यशक्ती असल्याचे सिद्ध करून ३० लाख रुपयांचे पारितोषिक जिंका , असे आव्हान दिनांक ९ जानेवारी २०२३ ला टिळक पत्रकार भवनात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेद्वारे करण्यात आले होते . सहायक पोलीस आयुक्त ( गुन्हे ) या प्रकरणाचा अभ्यास करून तयारी करत आहेत असे त्यांचे म्हणणे आहे . धीरेंद्र कृष्ण यांचा कार्यक्रम दि . ५ ते १३ जानेवारीचा प्रसिद्ध झालेला आहे . तसे पोस्टर्स , फलक लागले , पत्रिका ही वाटण्यात आल्या आहेत .

    दोन दिवस आधीच पळ काढला ! धीरेंद्र कृष्ण काहीतरी निमित्त करून दि . ११ जानेवारीला संध्याकाळी २ दिवसांचा कार्य क्रम अर्धवट टाकून , नागपूर सोडून निघून जाणार असे कळले होते . तशी कल्पना सहायक पोलीस आयुक्त ( गुन्हे ) यांना दि . १० जानेवारीला रात्री ९ वाजता दिली होती . पळून जाण्याच्या आधी कार्यवाही करा , अशी विनंती करण्यात आली होती . धीरेंद्र कृष्ण नागपूर सोडून जाण्याच्या आधी दि . ११ ला संध्याकाळी पुन्हा सहायक पोलीस आयुक्त ( गुन्हे ) यांना फोन करून आणि पोलीस आयुक्त नागपूर यांना एसएमएस व व्हाट्सअप मॅसेजद्वारा कल्पना दिली व कार्यवाही करण्याविषयी सुचवले होते .

    पण शेवटी धीरेंद्र कृष्ण नागपूर सोडून गेले . पोलिसांची कार्यवाही होण्याआधीच आणि अ . भा . अंनिसचे ३० लाखांचे ‘ दिव्यशक्ती ‘ सिद्ध करण्याचे आव्हान न स्वीकारताच दोन दिवसांचा कार्यक्रम अर्धवट टाकून त्यांनी पोलीस कार्यवाहीच्या भीतीने पळ काढला की , अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ३० लाखांच्या दिव्यशक्ती सिद्ध करण्याचे आव्हानामुळे पळ काढला की कुणीतरी पळवले अशी चर्चा जनता करत राहील . सोबतच अशा भोंदू बाबांचे कार्यक्रम आयोजित करून सामान्य नागरीकांना अंधश्रद्धेत ढकलणाऱ्या आयोजकांवर कारवाई करण्याची मागणी , अ.भा. अंनिस करीत आहे . 2 नागपूर पोलखोल शहर ! दिव्यशक्ती स्वत : असल्याचा दावा जाहीररीत्या करणारा धीरेंद्र कृष्णांनी पळ काढला असल्यामुळे ते भोंदू आहेत , हे सर्व जनतेने ओळखावे व स्वत : ला फसवणुकीपासून वाचवावे . दिव्यशक्तीच्या दाव्यांना फसू नये , असे आवाहन अ . भा . अंनिस करते आहे . पुन्हा एकदा नागपूरने ‘ पोलखोल शहर ‘ ही ओळख सिद्ध केली आहे . माध्यमांनी दिलेल्या सहकार्याबद्दल अ . भा . अंनिस आणि जागृत जनता आभार व्यक्त करते आहे .

    19 जनवरी का भांडाफोड़ सभा –अंधश्रद्धा फैलवणाऱ्या भोंदू बाबा यांचा भंडाफोड़ करण्या करिता अनीस ने 19 जानेवारीला संध्याकाळी 6 वाजता गुरुदेव सेवाश्रम रमन साइंस जवळ शुक्रवारी तालाब येथे भांडा फोड़ सभेचे आयोजन केले आहे.कसा होईल भांडाफोड़ बघण्यास यावे .