Category: मनोरंजन न्यूज़

  • आजपासून रामटेक येथे 23 जानेवारीपर्यंत राज्यातील पहिला ‘महासंस्कृती महोत्सव’*l   मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री, सांस्कृतिक मंत्र्यांच्याहस्ते होणार उद्घाटन  गीत, संगीत, नाट्यकलेचा अनुभवता येणार आविष्कार

    आजपासून रामटेक येथे 23 जानेवारीपर्यंत राज्यातील पहिला ‘महासंस्कृती महोत्सव’*l  मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री, सांस्कृतिक मंत्र्यांच्याहस्ते होणार उद्घाटन  गीत, संगीत, नाट्यकलेचा अनुभवता येणार आविष्कार

     

    आजपासून रामटेक येथे 23 जानेवारीपर्यंत राज्यातील पहिला ‘महासंस्कृती महोत्सव’*l

     मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री, सांस्कृतिक मंत्र्यांच्याहस्ते होणार उद्घाटन
     गीत, संगीत, नाट्यकलेचा अनुभवता येणार आविष्कार

    नागपूर,दि. 18 : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने व जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये प्रथमच ‘महासंस्कृती महोत्सव’ आयोजित करण्यात येत आहे. या महासंस्कृती महोत्सवाचा प्रारंभ कालिदासाची भूमी रामटेक येथून होत असून शुक्रवार, 19 जानेवारी रोजी नेहरू मैदान, रामटेक येथे सायंकाळी 7 वाजता या पाच दिवसीय सांस्कृतिक सोहळ्याचे उद्घाटन होणार आहे.

    स्थानिक प्रेस क्लॅब येथे राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभाग व जिल्हा प्रशासनाच्यावतीने आमदार अॅड. आशिष जायस्वाल यांनी आज सायंकाळी पाच दिवसांच्या महासंस्कृती महोत्सवाची माहिती दिली.

    या कार्यक्रमाला मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री.अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार,जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. मुक्ता विष्णू कोकड्डे, यांच्यासह खा. कृपाल तुमाने, सर्व आमदार श्री. प्रवीण दटके, श्री. अभिजित वंजारी, श्री. चंद्रशेखर बावनकुळे, श्री. सुधारक अडबाले, श्री. अनिल देशमुख, डॉ. नितीन राऊत, श्री. कृष्णा खोपडे, श्री. विकास कुंभारे, श्री. मोहन मते, श्री. विकास ठाकरे, श्री. समीर मेघे, श्री. आशिष जायस्वाल, श्री.राजू पारवे, श्री. टेकचंद सावरकर, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव श्री. विकास खरगे, विभागीय आयुक्त श्रीमती विजयलक्ष्मी बिदरी, नागपूर मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

    पाच दिवस होणाऱ्या या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

    राज्यातील विविध प्रांतातील संस्कृतीचे आदान प्रदान, स्थानिक कलाकारांसाठी व्यासपीठ, लुप्त होत चाललेल्या कला व संस्कृतीचे जतन व संवर्धन, तसेच स्वातंत्र्य लढ्यातील ज्ञात अज्ञात लढवय्यांची माहिती जनसामान्यापर्यंत पोहोचविण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचा प्रारंभ ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या कवी कालिदासाची भूमी रामटेक येथून होत आहे.

    19 ते 23 जानेवारी दरम्यान रामटेक येथील नेहरू मैदानावर होणाऱ्या या पाच दिवसीय महोत्सवात गीत, संगीत, नाट्यकलेची रसिकांना अनुभूती मिळणार असून आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कलाकारांच्या सहभाग राहणार आहे.

    पाच दिवस दोन सत्रात हे कार्यक्रम होतील. सकाळच्या सत्रात कवि कालिदासांवरील प्रबोधन चर्चासत्र, प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांचे महाखिचडीचे प्रात्यक्षिक, लेझर शो, फायर शो, नौका स्पर्धा, फोटोग्राफी व पेंटिंग स्पर्धा, स्केटिंग स्पर्धा, एयरोमॉडलिंग शो, फुड फेस्टिवल आदींचे आयोजन करण्यात येणार आहे.

    सायंकाळच्या सत्रातले मुख्य कार्यक्रम सायंकाळी 7 वाजता सुरू होतील. यात उद्घाटनाच्या दिवशी 19 जानेवारीला पद्मश्री हेमा मालिनी यांची रामायण नृत्य नाटिका सादर होणार आहे. 20 जानेवारीला सुरांचे बादशाह पद्मश्री सुरेश वाडकर यांचे गीतगायन होणार असून 21 जानेवारीला विख्यात गायक, हंसराज रघुवंशी यांचा भक्तीगीत कार्यक्रम, 22 जानेवारीला रामटेकवरील सिंधुरागीरी महानाट्य होणार 23 जानेवारीला विख्यात गायक पद्मश्री कैलाश खेर यांची स्वरसंध्या असा भरगच्च कार्यक्रम होणार आहे.

    *कार्यक्रम सर्वांसाठी खुला*

    पाचही दिवसाचा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असणार आहे. प्रथम येणाऱ्याला प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. फक्त मान्यवर आणि वृत्ताकन करणारे माध्यम प्रतिनिधी वगळता अन्य कोणालाही प्रवेशिकेची गरज नाही. उपलब्ध आसनक्षमता पूर्ण झाल्यानंतर नेहरू मैदानचे गेट बंद करण्यात येईल.नंतर येणाऱ्या प्रेक्षकांना बाहेरून स्क्रीनवर कार्यक्रमाचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे या ठिकाणाचा प्रवेश प्रथम येणाऱ्याला प्रथम प्राधान्य आहे त्यासाठी लवकरात लवकर आपल्या आसन ग्रहण करावे, असे आवाहन आयोजन समितीने केले आहे.

    *असे आहेत मुख्य कार्यक्रम*

    19 जानेवारी – पद्मश्री हेमामालिनी यांची रामायण नृत्यनाटिका
    20 जानेवारी – सुरांचे बादशाह पद्मश्री सुरेश वाडेकर यांचे गीतगायन
    21 जानेवारी – विख्यात गायक, हंसराज रघुवंशी यांचा भक्तिगीत कार्यक्रम
    22 जानेवारी – रामटेकवर आधारित ‘सिंधुरागीरी’ महानाट्य
    23 जानेवारी – विख्यात गायक पद्मश्री कैलाश खेर यांची ‘स्वरसंध्या’

  • -नागपुरात १३, १४ व १५ जानेवारीला तीन दिवस ‘जाणता राजा’ महानाट्याचा प्रयोग  -यशवंत स्टेडियमवर २०० कलाकार साकरणार महानाट्य

    -नागपुरात १३, १४ व १५ जानेवारीला तीन दिवस ‘जाणता राजा’ महानाट्याचा प्रयोग -यशवंत स्टेडियमवर २०० कलाकार साकरणार महानाट्य

    -नागपुरात १३, १४ व १५ जानेवारीला तीन दिवस ‘जाणता राजा’ महानाट्याचा प्रयोग

    -यशवंत स्टेडियमवर २०० कलाकार साकरणार महानाट्य

    नागपूर दि. 10: नागपूर महानगरात प्रशासनामार्फत १३, १४ व १५ जानेवारीला जाणता राजा महानाटयाचा प्रयोग होणार आहे. प्रवेश मोफत असेल मात्र त्यासाठी प्रवेशिका आवश्यक आहे. नागरिकांनी मोठया संख्येने याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

    स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात आणि 350 व्या राज्य शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त प्रत्येक जिल्ह्यात महानाट्याचे सादरीकरण करण्याचे राज्य शासनाने ठरवले आहे. या उपक्रमातील पहिला राज्यव्यापी प्रयोग नागपूर येथे होत आहे.

    शिवछत्रपतींच्या जन्मापासून राज्याभिषेकापर्यंतच्या रोमांचकारी प्रसंगांना साकारणारे आशिया खंडातील सर्वात मोठे महानाट्य ‘जाणता राजा ‘ नागपूरकरांच्या भेटीला येत आहे. राज्याचा सांस्कृतिक विभाग, जिल्हा व महानगरपालिका प्रशासनामार्फत या महानाट्याचे आयोजन करण्यात आले असून 13, 14, व 15 जानेवारी रोजी यशवंत स्टेडियमवर प्रयोग होणार आहेत.

    राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 350 व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त राज्यभर होणाऱ्या महानाट्याची सुरुवात नागपुरातून व्हावी, अशी सूचना जिल्हा प्रशासनाला केली आहे. त्यानंतर प्रशासन तयारीला लागले आहे.

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार इतिहासकार शिवशाहिर पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांनी लिखित व दिग्दर्शित केलेला हा प्रयोग यशवंत स्टेडियमवर 30 हजारापेक्षा जास्त प्रेक्षकांच्या साक्षीने फिरत्या रंगमंचावर रंगणार आहे.यासाठी प्रवेशिका असेल, मात्र प्रवेश मोफत ठेवण्यात आला आहे.

    दररोज सायंकाळी साडेपाच वाजता नंतर या प्रयोगाला सुरुवात होईल. उंट ,घोडे यांचा वापर आणि शिवरायांच्या काळातील सर्व रोमांचक घटनाक्रमाचे जिवंत चित्रण 200 च्या वर कलाकार करणार आहेत.

  • सत्यशोधक’ चित्रपटाला करसवलत देण्याबाबत सकारात्मक  – उपमुख्यमंत्री अजित पवार

    सत्यशोधक’ चित्रपटाला करसवलत देण्याबाबत सकारात्मक – उपमुख्यमंत्री अजित पवार

    सत्यशोधक’ चित्रपटाला करसवलत देण्याबाबत सकारात्मक

    – उपमुख्यमंत्री अजित पवार

     

    मुंबईदि. 8 :- देशात स्त्री शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवणारेबहुजनांसाठी शिक्षणाची दारे खुले करणारेसत्यशोधक विचारांचे महामानव क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित सत्यशोधक’ चित्रपटाला कर सवलत देण्याबाबत सकारात्मक भूमिका घेत यासंदर्भातील प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात आयोजित बैठकीत दिल्या.

                चित्रपटांवर आकारण्यात येणाऱ्या 18 टक्के जीएसटीपैकी प्रत्येकी 9 टक्के रक्कम केंद्र आणि राज्य शासनाला मिळत असते. राज्याच्या वाट्याला येणाऱ्या रकमेची कर सवलत देण्याबाबतचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात येणार आहे. महात्मा फुले आणि सावित्रीबाईंचे कार्य अलौकिक असून ते भावी पिढीपर्यंत पोहचवण्यासाठी हा चित्रपट सहाय्यभूत ठरणार असल्याने चित्रपटाला करसवलत दिली पाहिजेअसे मत उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी व्यक्त केले. राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळवित्तमहसूल व सांस्कृतिक कार्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

  • शी इज इंडिया” साजरा करत आहे नागपूरच्या मिसेस युनिव्हर्स इंडिया माधुरी पटले यांचा मिसेस युनिव्हशीर्स एम्पॉवर 2023 चा विजय

    शी इज इंडिया” साजरा करत आहे नागपूरच्या मिसेस युनिव्हर्स इंडिया माधुरी पटले यांचा मिसेस युनिव्हशीर्स एम्पॉवर 2023 चा विजय

    शी इज इंडिया” साजरा करत आहे नागपूरच्या मिसेस युनिव्हर्स इंडिया माधुरी पटले यांचा मिसेस युनिव्हशीर्स एम्पॉवर 2023 चा विजय

    नागपूर– सामाजिक लेबलांच्या पलीकडे महिलांचे उल्लेखनीय सार साजरे करण्यासाठी समर्पित प्रीमियर प्लॅटफॉर्म- “शी इज इंडिया,” माधुरी पटले यांच्या विलक्षण कामगिरीची अभिमानाने घोषणा करते, ज्यांना मिसेस युनिव्हर्स एम्पॉवर 2023 आणि मिसेस युनिव्हर्स फेस 2023 हा पुरस्कार मिळाला आहे. फिलीपिन्समधील मनिला येथे झालेल्या मिसेस युनिव्हर्स स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या माधुरी पटलेसाठी या प्रतिष्ठित विजेतेपदाचा प्रवास अविश्वसनीय ठरला आहे.

    रिचा सिंग यांनी 2016 मध्ये स्थापन केलेली, “शी इज इंडिया” ही भारतातील मिसेस युनिव्हर्सची स्थापना झाल्यापासून अधिकृत फ्रेंचायझी आहे. “ब्रेव्ह बोल्ड ब्यूटीफुल” या टॅगलाइनने प्लॅटफॉर्मचे चित्र उत्तम प्रकारे टिपले आहेत आणि ते स्त्रियांना त्यांच्या खऱ्या क्षमतेचा स्वीकार करण्यास सक्षम बनवत आहे. स्त्रीच्या भावविश्वाची बेलगाम शक्ती तिच्या सर्व वैभवात प्रदर्शित करण्याचे कार्य या माध्यमातून केले जात आहे. कौटुंबिक हिंसाचाराच्या विरोधात महिला सक्षमीकरण, शी इज इंडिया या थीमला स्पर्श करते, म्हणूनच, भारतीय महिलांना त्यांचे मत मांडण्यासाठी आणि निषिद्ध, रूढी आणि जुनाट विचारांच्या वेड्या तोडण्यासाठी एक व्यासपीठ सक्षम करून स्वतः ला सर्वोत्कृष्ट रित्या बाहेर आणण्याची संधी प्रदान करते.

    जागतिक मंचावर भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नामवंत विजेत्यांच्या पावलावर पाऊल ठेवून माधुरी पटलेंनी यश संपादित केले आहे. या आजवरच्या विजेत्यांमध्ये यांचा समावेश आहे.

    लक्ष्मी शेषाद्री (मिसेस युनिव्हर्स इंडिया 2016)

    श्वेता अठवाल (मिसेस युनिव्हर्स इंडिया 2017)

    डॉ. नेहा त्यागी (मिसेस युनिव्हर्स इंडिया 2018)

    . दिव्या बरंगे (मिसेस युनिव्हर्स इंडिया 2019)

    श्रुती कावेरी अस्पर (मिसेस युनिव्हर्स इंडिया 2021)

    डॉ. स्वप्रा मिश्रा (क्लासिक युनिव्हर्स 2021) अदिती शर्मा (मिसेस युनिव्हर्स इंडिया 2022)

    माधुरी पटले (मिसेस युनिव्हर्स इंडिया 2023)

    फिलिपाइन्सच्या मनिला येथे झालेल्या मिसेस युनिव्हर्सच्या 46व्या एडिशन मध्ये मिसेस युनिव्हर्स इंडिया 2023 माधुरी पटले यांनी “मिसेस युनिव्हर्स – एम्पॉवर 2023” आणि “मिसेस युनिव्हर्स – फेस 2023” या 2 प्रतिष्ठित पुरस्कार चटकाविले आहे.

    शी इज इंडियाच्या संस्थापक आणि संचालक ऋचा सिंग म्हणतात, “शी इज इंडिया” माधुरी पटलेचे तिच्या अतुलनीय यशाबद्दल अभिनंदन करते आणि आशा करते की ती परिवर्तनासाठी शक्तीचा आवाज बनून ती भारताचा वारसा सदैव जिवंत ठेवेल.

    हे व्यासपीठ महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी आणि त्यांच्या अमर्याद क्षमतांचे प्रदर्शन करण्यासाठी त्यांना एक मंच प्रदान करण्यासाठी समर्पित आहे. माधुरी पटलेची यशोगाथा ही आपल्या प्रवासातील एक मैलाचा दगड आहे.

    आपल्या विजयाबद्दल बोलताना माधुरी पटले म्हणाल्या, “शी इस इंडिया हे एक असे व्यासपीठ आहे ज्याने माझ्या आयुष्याला कलाटणी दिली आहे. जेव्हा मी मिसेस युनिव्हर्स इंडिया 2023 शी इज इंडिया द्वारे मुकुट पटकावला तेव्हा मला केवळ प्रसिद्धी मिळाली नाही तर सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची आयुष्यभराची संधी देखील मिळाली. शी इज इंडिया ब्रेव्ह, बोल्ड अँड ब्युटीफुल या थीमने मला समाजाप्रती असलेली माझी बांधिलकी दाखवण्यास सक्षम केले आणि माझ्या आयुष्यातील सर्वात मोठ्या ड्रीम प्रोजेक्टला मी आबाधा फाऊंडेशन असे नाव दिले. ”

    पुढे पाहताना, “शी इज इंडिया” 2024 च्या आवृत्तीसाठी तयारी करत आहे, जे भारतातील सर्वात धाडसी आणि सुंदर महिलांचा अतुलनीय उत्सव असल्याचे वचन देते. वर्षाच्या पहिल्या सहामाहीत नियोजित होणारा हा आगामी कार्यक्रम “नेव्हर लाईक बिफोर ” असा अनुभव आहे जो जागतिक स्तरावर भारतीय महिलांच्या अविश्वसनीय क्षमतेवर प्रकाश टाकत राहील.

    शी इज इंडिया ऑर्गनायझेशनबद्दल

    रिचा सिंगने स्थापन केलेले, शी इज इंडिया हे अश्या प्रत्येक भारतीय स्त्रीसाठी एक व्यासपीठ आहे. जी जगाला सामाजिक टॅग्जच्या पलीकडे पाहू देण्याचा प्रयत्न करते किंवा त्यांचे ध्येय ठेवते. महिला हा आपल्या मानव जातीचा पाया आहे. हजारो वर्षांपासून, शेकडो संस्कृतींमध्ये आणि असंख्य विश्वासांमध्ये, पुरुषांनी स्त्रियांचा आदर केला आहे आणि त्यांची पूजा केली आहे. हिंदू पौराणिक कथांमधील मातृ निसर्ग, दुर्गा, काली किंवा शक्तीच्या रूपात किंवा अथेनाच्या रूपात, ग्रीक पौराणिक कथांमधील युद्धाची देवी किंवा पराक्रमी अमेझोनियन योद्धा ह्या महिलाच होत्या. जवळपास सर्वच प्रमुख संस्कृतींनी स्त्रियांभोवती कथा विणल्या आहेत आणि कवींनी त्यांच्या स्तुतीसाठी पाने रंगविली आहेत. झाशीची योद्धा राणी लक्ष्मीबाई यांच्या श्रद्धेपोटी प्रत्येक भारतीय खूब लडी मर्दानी वह तो झाशी बाली राणी थी म्हणत मोठा झाला आहे.

    मात्र समाजाला अशा शक्तीशाली स्त्रियांचा विसर पडत आहे, आणि त्यांच्या कर्तृत्वाच्या रेषा पुसण्याचा प्रयत्न केला जात आहे. दैनंदिन जीवनात स्त्रियांचा समान आदर करणे काही लोकं विसरत चालले आहेत. शतकानुशतके सामान्य स्त्रीला त्यांच्या मूलभूत हक्कांसाठी झगडावे लागले आहे; मग तो त्यांचा शिक्षणाचा हक्क असो किंवा मतदानाचा हक्क असो किंवा जिवंत राहण्याचा मूलभूत हक्क का असेना. कौटुंबिक हिंसाचार हे आणखी एक रणांगण आहे जे खिया दररोज शांतपणे, अदृश्यपणे लढत आहेत आणि अजूनही त्यांची ही लढत सुरूच आहे.

    कौटुंबिक हिंसाचाराच्या विरोधात महिला सक्षमीकरण, शी इज इंडिया या थीमला स्पर्श करते, म्हणूनच, भारतीय महिलांना त्यांचे मत मांडण्यासाठी आणि निषिद्ध, रूढी आणि जुनाट विचारांच्या बेड्या तोडण्यासाठी एक व्यासपीठ सक्षम करून स्वतः ला सर्वोत्कृष्ट रित्या बाहेर आणण्याची संधी प्रदान करते. महिलांचे प्रतिनिधित्व महत्त्वाचे असल्याने, प्लॅटफॉर्मचे ब्रीदवाक्य “शी इनदिड इज इंडिया” आहे. आणि प्रत्येक भारतीय खीला त्यांना जगामध्ये पहायचे असलेले बदल करण्याची संधी देण्यासाठी धाडसी पावले उचलली जातात.

     

  • दुर्मिळ आजार असलेल्या 70 वर्षीय महिलेवर वोक्हार्ट हॉस्पिटल्स द्वारा यशस्वी उपचार

    दुर्मिळ आजार असलेल्या 70 वर्षीय महिलेवर वोक्हार्ट हॉस्पिटल्स द्वारा यशस्वी उपचार

    दुर्मिळ आजार असलेल्या 70 वर्षीय महिलेवर वोक्हार्ट हॉस्पिटल्स द्वारा यशस्वी उपचार

    नागपूर : वोक्हार्ट हॉस्पिटल्स नागपूर ही काळजी आणि नावीन्यपूर्ण परंपरा असलेली एक आघाडीची आरोग्य सेवा प्रदाता आहे ज्यामुळे हे हॉस्पिटल मध्य भारतातील रुग्णांसाठी वरदान ठरले आहे. गंभीर रुग्ण हाताळणारे वोक्हार्ट हॉस्पिटल्स नागपूर, मध्ये आता एक स्वतंत्र कॅन्सर सेंटर आहे ज्याचे प्रमुख वरिष्ठ ऑन्कोसर्जन, डॉ. रमाकांत तायडे आहेत ज्यांनी आणखी एक गंभीर आणि निदानदृष्ट्या आव्हानात्मक केस, एक 70 वर्षांची महिला रुग्ण जी पोटदुखी, आतड्याची हालचाल बदलणे, भूक न लागणे आणि अशक्तपणा या सारख्या लक्षणांसह वोक्हार्ट हॉस्पिटल्स नागपूर मध्ये आली तिच्यावर यशस्वीरीत्या उपचार केले आणि रुग्णाला बरे केले.

    वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये 70 वर्षीय महिला रुग्ण गंभीर अशक्त अवस्थेत आली होती. गेल्या दोन महिन्यांपासून तिची इतरत्र तपासणी झाली होती आणि ॲनिमियासाठी उपचार केले जात होते आणि तिचे अनेकदा रक्त संक्रमण झाले होते. पण असे असूनही तिचे हिमोग्लोबिनचे प्रमाण योग्य नव्हते. तिचे आउटसाइड सीटी स्कॅन केले गेले ज्याने लहान आतड्याचे वस्तुमान सूचित केले? दाहक. त्यामुळे तिला हैदराबाद येथे खर्चिक एन्टरोस्कोपी तपासणीचा सल्ला देण्यात आला होता. मात्र एवढ्या महागड्या उपचारासाठी पैसे खर्च करण्याची रुग्णाची स्थिती नसल्याने त्यांनी डॉ. रमाकांत तायडे यांच्याकडे संपर्क साधल्याचे डॉ. तायडे यांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी डॉ. तायडे यांच्याशी या समस्येवर चर्चा ली आणि डॉ. तायडे यांनी त्यांना तपासणीसाठी नागपूरला येण्यास सांगितले. तिला याआधी मऊ टिश्यू ट्यूमरचा एक घातक प्रकार झाला होता, उजव्या हाताचे लियोमायोसार्कोमासाठी तिने उपचार घेतले होते.

    नागपूरच्या वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये डॉ. तायडे यांच्या नेतृत्वाखाली, हेमॅटोलॉजिस्ट, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट आणि फिजिशियन यांच्या टीमने ॲनिमियासाठी तिची कसून तपासणी करण्यात आली. सखोल तपासाअंती डॉ. तायडे या निष्कर्षाप्रत आले की, तिच्या अशक्तपणाचे कारण म्हणजे रुग्णाच्या लहान आतड्यांमधून रक्ताची हानी होत आहे. रुग्ण गरीब असल्याने आणि एंटरोस्कोपी सारखी खर्चिक तपासणी परवडत नसल्यामुळे, डॉ. तायडे यांनी निदान लॅपरोस्कोपी केली आणि त्यांना आढळले की लहान आतड्यात वस्तुमान आहे ज्यामुळे आतड्यांसंबंधी अडथळा येत आहे आणि ते अशक्तपणाचे संभाव्य कारण आहे. शस्त्रक्रिया करून लहान आतड्याचा तो भाग काढून टाकण्यात आला. रुग्ण शस्त्रक्रियेतून बरा झाला आणि त्याला स्थिर स्थितीत डिस्चार्ज देण्यात आला.

    हे प्रकरण या अर्थाने देखील अनोखे प्रकरण होते की ते सिटस इनव्हर्ससचे प्रकरण होते, ही एक दुर्मिळ स्थिती आहे जिथे शरीराचे सर्व अवयव त्यांच्या स्थानांची जागा बदलतात आणि रिसेक्ट नमुन्याचा हिस्टोपॅथ ही देखील अत्यंत दुर्मिळ घटना आहे. आम्ही वोक्हार्ट येथे, खूप जास्त धोका असलेल्या या शस्त्रक्रियेसाठी रुग्णाला अतिशय स्वस्त दरात निदान आणि उपचार प्रदान केले जो आम्हा सर्वांसाठी सर्वात आनंदाचा क्षण होता.
    डॉ. रमाकांत तायडे हे एमबीबीएस, एमएस (जनरल सर्जरी), फेलो ऑन्को सर्जरी, एफ. एम. ए. एस. फिआयएजीईएस आहेत. त्यांना सर्जिकल ऑन्कोलॉजीचा 20 वर्षांचा विशेष अनुभव आहे. त्यांनी हैदराबाद आणि मुंबई येथील अनेक प्रख्यात सर्जिकल ऑन्कोलॉजिस्टसोबत काम केले आहे. त्यांच्याकडे खुल्या शस्त्रक्रिया तसेच लॅपरोस्कोपिक अप्पर जीआय कोलोरेक्टल आणि स्त्रीरोग ऑन्को शस्त्रक्रिया, ब्रेस्ट, थायरॉईड आणि सॉफ्ट टिश्यू ट्यूमर यांचा व्यावहारिक अनुभव आहे. गेल्या 13 वर्षांपासून ते नागपुरात सर्जिकल ऑन्कोलॉजी ची प्रॅक्टिस करीत आहेत.

  • वाड़ी नप की भव्य इमारत,कर्मचारियों की कमी..! 18 कर्मचारी संभाल रहें लाखों जनसंख्या वाले वाड़ी नप की जिम्मेदारी..!

    वाड़ी नप की भव्य इमारत,कर्मचारियों की कमी..! 18 कर्मचारी संभाल रहें लाखों जनसंख्या वाले वाड़ी नप की जिम्मेदारी..!

    वाड़ी नप की भव्य इमारत,कर्मचारियों की कमी..!
    18 कर्मचारी संभाल रहें लाखों जनसंख्या वाले वाड़ी नप की जिम्मेदारी..!
    कर्मचारियों पर कामों का बोझ…हर कोई चाहता जल्द हो मेरा काम
    नागपुर -( विजय खवसे )कार्यालय कोई भी हो बिना कर्मचारियों के नही चल सकता।चलेगा तो जनता के काम समय पर नही होंगे।राज्य सरकार ने कर्मचारियों के पद नही भरने से जो कार्यरत है उनको ही कामो का बोझ उठाना पड़ रहा है।

    नागपुर जिले में सबसे बड़ी नगर परिषद में वाड़ी का नाम आता है।करीब डेढ़ लाख से ज्यादा आबादी का जिम्मा नगर परिषद पर है।स्वास्थ्य,शिक्षा,पाणी, शहर के स्ट्रीट लाइट के साथ अन्य जिम्मेदारी नगर परिषद पर है।लेकिन यहां पर यदि कर्मचारियों की कमी होंगी तो नागरिकों के काम कैसे जल्द होंगे यह सवाल उठ रहा है।7 दिन में होने वाले काम को महीने लगते है।जिसके कारण कर्मचारियों के साथ साथ नागरिक भी परेशान है।भव्य इमारत तो बनी लेकिन कर्मचारी नही है यह हाल वाड़ी नप का है।

    एक कर्मचारी को दो दो नगर परिषद का जिम्मा सरकार ने दे दिया तो भला काम जल्द कैसे होंगा इसकी और नागरिकोने भी देखना जरूरी है।
    सूत्र से प्राप्त जानकारी के अनुसार वाड़ी नगर परिषद में 53 पोस्ट है।एक मुख्यधिकारी, एक उपमुख्यधिकारी के साथ कैडर 28 पोस्ट मंजूर है जिसमे केवल 7 कार्यरत है तो 21 पद आज भी रिक्त है।
    वर्ग 3 में 17 पोस्ट है जिसमें 7 कार्यरत है व 10 रिक्त है।वही वर्ग चार में 8 पोस्ट मंजूर है 4 कार्यरत है तो 4 रिक्त है।वाड़ी नगर परिषद को केवल 18 कर्मचारी ही संभाल रहें है।32 पद आज भी रिक्त है।लाखो लोगो को केवल 18 कर्मचारी ही संभाल रहें है। सफाई कामगार नप के खुद के नही वह भी 40 सफाई कामगार ठेकेदारी पर है।

    प्राप्त जनकारी के अनुसार कर्मचारियों को नियुक्त करने जिलाधिकारी ने शासन को पत्र देकर पोस्ट भरने मांग की है।लेकिन सरकार ने अबतक इस पर विचार नही करने से वाड़ी नप को कर्मचारी कब मिलेंगे ?यह सवाल जनता पूछ रही है।

    आम जनता के कामो को जल्द से जल्द करने के लिए सरकार कर्मचारियों को नियुक्त करने की मांग भी स्थानिक नागरिकों ने की।बीते 3 साल से यहां पर चुनाव नही होने से अध्यक्ष ,नगरसेवक नही है।प्रशासक है।जब प्रशासक है तो जनता के काम समय होना प्रशासन की जिम्मेदारी है।

  • ‘अभिरूप युवा संसद’ में उत्कृट सासंद का अवार्ड हिस्लोप कॉलेज की छात्र शीतल खवसे के नाम -अभिनेता अभिषेक बच्चन के हातो किया सन्मानित

    ‘अभिरूप युवा संसद’ में उत्कृट सासंद का अवार्ड हिस्लोप कॉलेज की छात्र शीतल खवसे के नाम -अभिनेता अभिषेक बच्चन के हातो किया सन्मानित

    ‘अभिरूप युवा संसद’ में उत्कृट सासंद का अवार्ड हिस्लोप कॉलेज की छात्र शीतल खवसे के नाम
    -अभिनेता अभिषेक बच्चन के हातो किया सन्मानित
    नागपुर WH न्यूज़ – ‘युवक बिरादरी’ आयोजित ‘अभिरूप युवा संसद’
    का 49वां राष्ट्रीय अधिवेशन हालही में मुंबई के मुकेश पटेल ऑडिटोरियम में आयोजित किया गया।’अभिरूप युवा संसद’ में हिस्लोप कॉलेज की शीतल विजय खवसे ने हिस्सा लिया था।उत्कृष्ठ सासंद का सम्मान शीतल खवसे के नाम दर्ज किया गया।
    फ़िल्म अभिनेता अभिषेक अमिताभ बच्चन के हातो शीतल खवसे को सम्मानित किया गया।

    इस मौके पर उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस की पत्नी गायिका अमृता फड़णवीस, पूर्व विधायक आशीष देशमुख़,रोजगार के क्षेत्र में उत्कृष्ट कार्य करने वाले, सामाजिक क्षेत्र में सेवा देने वाली रेखा राठी, कला के क्षेत्र में सेवा देने वाले संदेश जाधव प्रमुखतासे उपस्थित थे।
    इस अवसर पर डॉ. देशमुख ने इस सम्मेलन को अगले वर्ष नागपुर में आयोजित करने तथा पांच हजार युवा कलाकारों को राष्ट्रीय स्तर पर आमंत्रित करने की इच्छा व्यक्त की।


    अमृता फडणवीस ने भारतीय इतिहास पर आधारित कृतियों में कलाकारों को सम्मानित किया। युवा बिरादरी के ट्रस्टी स्वर क्रांति ने संस्था की भावी गतिविधियों की जानकारी दी। कार्यक्रम में युवा बिरादरी के अध्यक्ष पद्मश्री क्रांति शाह, उपाध्यक्ष रवींद्र धारिया, आशुतोष शिर्के, नागेंद्र राय शामिल हुए।

    प्रतिभा, उत्कृष्ट युवा सांसद एवं कला के क्षेत्र में उत्कृष्ट प्रदर्शन करने वाले 30 लोगों को 10 लाख रुपये के पुरस्कार से सम्मानित किया गया।नागपुर की शीतल विजय खवसे, औरंगाबाद की अक्सा हरीम खान, धुले की सृष्टि वाडने, यवतमाल के यश घाटगे को ‘अभिरूप युवा संसद’ पहल में उत्कृष्ट सांसद के रूप में सम्मानित किया गया।नागपुर से अनुष्का नाग,निकेश लिखार,खुशी गुप्ता,प्रज्वल निंबारते,पारस मेश्राम,खुशी बत्रा,समीक्षा अड़े,साहिल रामटके ने भी अभिरुप युवा संसद मे हिस्सा लिया।शीतल ने मिले सम्मान का श्रेय कॉलेज के शिक्षकोंको दिया।

  • प्रशिक आनंद यांच्या लेखणीतून…!काँग्रेस हे जळते घर आहे’ या अलंकारिक विधानाचा अर्थ..वाचा संपूर्ण लेख..!

    प्रशिक आनंद यांच्या लेखणीतून…!काँग्रेस हे जळते घर आहे’ या अलंकारिक विधानाचा अर्थ..वाचा संपूर्ण लेख..!

    काँग्रेस हे जळते घर आहे’ या अलंकारिक विधानाचा अर्थ हा तत्कालीन राजकीय परिस्थितीचे अवलोकन करून ‘काँग्रेस पक्ष हा लवकरच संपुष्टात येणार आहे’ या अर्थाने बाबासाहेब जनतेला तेव्हा सूचित करत होते, हा होय.
    ********************************************भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत काँग्रेसमध्ये (INC) बरेच समाजवादी विचारसरणीचे (सोशालिस्ट) लोकही सामील होते. काँग्रेसअंतर्गत कार्यरत राहून डाव्या विचारसरणी कडे झुकलेला जो गट होता तो आचार्य नरेंद्र देव यांच्या नेतृत्वाखाली ‘काँग्रेस सोशालिस्ट पार्टी’ (CSP) या नावाने कार्यरत होता. जवाहरलाल नेहरू यांच्या बोलावण्यावरून जयप्रकाश नारायण हे 1929 साली काँग्रेसमध्ये (Indian National Congress) सामील झाले. त्यानंतर त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात हिरीरीने भाग घेतला. ब्रिटिश सरकार विरुद्ध काँग्रेसने पुकारलेल्या असहकार आंदोलनात सक्रिय सहभाग घेतल्यामुळे 1932 साली नाशिक येथे त्यांना तुरुंगवास झाला.

    तुरुंगवासातच त्यांचा संपर्क राम मनोहर लोहिया, अशोक मेहता, मिनू मसानी, अच्युत पटवर्धन, सी के नारायण स्वामी आणि इतरही कार्यकर्त्यांशी आला. ही तत्कालीन नेतेमंडळी समाजवादी होती आणि ‘काँग्रेस सोशालिस्ट पार्टी’ (CSP) या नावाने काँग्रेस (INC) अंतर्गत कार्यरत होती. 1939 साली जयप्रकाश नारायण हे ‘काँग्रेस सोशालिस्ट पार्टीचे’ जनरल सेक्रेटरी होते. काँग्रेसने इंग्रजांविरुद्ध पुकारलेल्या ‘ऑगस्ट 1942’ च्या ‘चले जाओ’ च्या आंदोलनात जेव्हा ज्येष्ठ काँग्रेसी नेत्यांना ब्रिटिश सरकारने अटक केली तेव्हा चळवळीची धुरा जयप्रकाश नारायण, राम मनोहर लोहिया, अरुणा आसफ अली यांनी हाती घेतली होती. मात्र लवकरच ब्रिटिश सरकारने त्यांनाही अटक करून तुरुंगात टाकले.

    पुढे ते मोठ्या शिताफिने योजना आखून तुरुंगातून बाहेर (Escaped) पडले. आणि भूमिगत होऊन ‘आझाद दस्ता’ (Freedom brigade) बनवून ब्रिटिश सरकार विरुद्ध कार्यरत राहिले. काही महिन्यांनी, सप्टेंबर 1943 ला पंजाबमधून ट्रेनमध्ये प्रवास करताना त्यांना इंग्रज सरकारने अटक केली. जानेवारी 1945 ला लाहोरच्या फोर्टहून आग्र्याच्या तुरुंगात त्यांची रवानगी करण्यात आली. एप्रिल 1946 ला जयप्रकाश नारायण आणि राम मनोहर लोहिया यांची आग्र्याच्या तुरुंगातून सुटका झाली. पुढे 18-20 मे 1946 रोजी मुंबईत एक परिषद घेण्यात आली. या परिषदेत ‘चलेजाव’ च्या आंदोलनात सहभागी झालेल्या भारतभरातील नेतेमंडळींनी हजेरी लावली.

    आणि समाजवादी विचारसरणीस पुढे ठेऊन पक्ष संघटनेची पुनर्बांधणी करण्याची जबाबदारी जयप्रकाश नारायण, नरेंद्र देव, राम मनोहर लोहिया, अच्युत पटवर्धन, अरुणा आसिफ अली यांच्यावर सोपवण्यात आली. दरम्यानच्या काळात 1946 ला जवाहरलाल नेहरू हे काँग्रेसचे अध्यक्ष होते. त्यांनी जयप्रकाश नारायण आणि राम मनोहर लोहिया यांना काँग्रेसच्या वर्किंग कमिटीचे सदस्यत्व देऊ केले. त्यावर समाजवाद्यांनी तीन अटी ठेवल्या. मात्र त्या अटींना अमान्य केल्यामुळे जयप्रकाश नारायण आणि राम मनोहर लोहिया यांनी काँग्रेसच्या वर्किंग कमिटीचे सदस्यत्व घेण्याचे नाकारले. पुढे दोन महिन्यानंतर नेहरूंनी केलेल्या विनंतीला अनुसरून जयप्रकाश नारायण यांनी सदस्यत्व स्वीकारले आणि आपल्या या बदललेल्या भूमिकेबाबत स्पष्टीकरणही दिले. नोव्हेंबर 1946 साली काँग्रेसचे नवीन अध्यक्ष जे बी कृपलानी यांच्या नेतृत्वात मीरत (Meerut) येथे परिषद भरली. त्यात समाजवाद्यांच्या प्रतिनिधीस काँग्रेसचे जनरल सेक्रेटरीपद देण्यात यावे अशी त्यांची मागणी होती. मात्र झाले उलटेच ! मृदुलाबेन आणि राम मनोहर लोहिया यांना काँग्रेस पक्षाच्या वर्किंग कमिटीतून वगळण्यात आल्याने जयप्रकाश नारायण हे वर्किंग कमिटीतून, राजीनामा देऊन बाहेर पडले. दरम्यान भारताची स्वातंत्र्याकडे वेगाने वाटचाल सुरू झाली होती.

    पुढे 28 फेब्रुवारी 1947 ला ‘काँग्रेस’ (INC) अंतर्गत कार्यरत असणाऱ्या ‘काँग्रेस सोशॅलिस्ट पार्टीने’ (CSP) असे ठरवले की, यापुढे काँग्रेस सोशॅलिस्ट पार्टीने, आपल्या नावातील ‘काँग्रेस’ (Congress) हा शब्द वगळून फक्त ‘सोशालिस्ट पार्टी’ म्हणूनच कार्यरत राहायचे आणि बिगर-काँग्रेसीजणांसाठी तिच्या सदस्यत्वाचे दार उघडे करायचे. ही घटना भारतीय समाजवाद्यांच्या चळवळीसंदर्भात तसेच काँग्रेसच्या वाटचाली संबंधात वळणदायी ठरली. आता जयप्रकाश नारायण यांचे असे मत पक्के झाले होते की ‘भारतीय राष्ट्रीय काँग्रेस’ (INC) ला बरखास्त करून सामाजिक-आर्थिक कार्यक्रमांच्या आधारावर नवा राजकीय पक्ष खरे तर उदयास आणला पाहिजे. आणि अशा प्रकारे ‘काँग्रेस सोशालिस्ट पार्टीने’ (CSP) स्वतःला ‘सोशालिस्ट पार्टी’ (SP) जाहीर करून आणि काँग्रेस सोबत फारकत घेणारे एक मोठेच पाऊल पुढे टाकले होते. सरदार पटेल यांनी समाजवाद्यांना आवाहन केले की वर्षभर तरी त्यांनी साथ सोडता कामा नये जेणेकरून पुढे काहीतरी योग्य करता येईल. दुसरीकडे त्यांनी समाजवाद्यांवर, कांग्रेसच्या कारभारात अडथळा आणण्याचा आणि काँग्रेसवर सत्ता संपादनाच्या अनुषंगाने त्यांचा भरोसा नसल्याचाही ठपका ठेवला. त्यामुळे जयप्रकाश नारायण आणि सरदार पटेल यांच्यातील वाद अधिकाधिक गडद होत गेला.

    समाजवाद्यांना असे वाटत होते की ‘अंतरिम सरकार’ (Interim Government) स्थापन झाल्यानंतर काँग्रेस ही पूर्णतः सरकार चालवण्याकडेच (सत्ता मिळविण्यासाठीच धडपडत राहील) केंद्रीभूत होत जाईल. त्यामुळे आजवर सामायिकपणे एकत्रित होऊन लढण्याचे काँग्रेसचे चरित्र खिळखिळे होत जाईल आणि केवळ ‘तीव्र सत्ता संघर्षाचे’ चित्र काँग्रेसअंतर्गत उभे होत जाईल. अशा परिस्थितीत जयप्रकाश नारायण म्हणतात की,
    “The Party shall endeavour to push the Congress towards socialism and to prevent its capture by the vested interests. If this endeavour succeeds, the Congress will rise to greater heights of influence, effectiveness and service. If it fails, the Congress must split.”

    (Jayaprakash Narayan, ‘The Party and the Congress’, Janata, New Delhi, 30 March 1947, N.M.L., New Delhi.)

    खरे तर, काँग्रेसची वाटचाल ही ‘नॅशनल काँग्रेस’ कडून ‘सोशालिस्ट काँग्रेसकडे’ व्हावी असे समाजवाद्यांना वाटे पण तसे घडत नव्हते. आणि यातूनच पुढे काँग्रेसला घरघर लागणे सुरू झाले होते. आणि समाजवाद्यांचा गट काँग्रेसमधून बाहेर पडला.

    “काँग्रेस हे जळते घर आहे” या बाबासाहेबांच्या अलंकारिक विधानाचे आकलन होण्यासाठी ही तत्कालीन काँग्रेसची राजकीय पार्श्वभूमी आपण लक्षात घेतली पाहिजे.

    बाबासाहेबांनी केलेले काँग्रेसबाबतचे सदर अलंकारिक विधान हे प्रथमतः, संयुक्त प्रांत शेड्युल कास्ट फेडरेशन चे पाचवे अधिवेशन लखनऊ येथे 24 व 25 एप्रिल 1948 रोजी आयोजित करण्यात आले होते, त्या अधिवेशनात रविवार दिनांक 25 एप्रिल 1948 रोजीच्या भाषणात आढळते. आपल्या भाषणात बाबासाहेब म्हणाले की,

    “काँग्रेसमध्ये सामील होण्याने आपले काही हित साधेल असे मला मुळीच वाटत नाही. दिवसेंदिवस काँग्रेस दुर्बल होत असून समाजवादी (Socialist) बाहेर पडल्यामुळे ती अधिकच दुर्बल झाली आहे. अशावेळी या दोन्ही पक्षातील चुरशीचा लाभ घेऊन आपल्या पक्षाच्या स्वतंत्र अस्तित्वाने जो पक्ष आपल्या अटी मान्य करील त्याच्याशी सहकार्य करून आपल्याला सत्ता हस्तगत करता येईल. सत्ता ही सामाजिक प्रगतीची गुरुकिल्ली आहे.

    काँग्रेसमध्ये जाऊन मागासलेल्या जातींना सत्ता हस्तगत करणे अशक्य आहे. ती एक मोठी संस्था आहे. आपण त्यात प्रवेश करणे म्हणजे महासागरात पाण्याचा थेंब टाकण्यासारखे होणार आहे. त्या संस्थेत सामील होण्याने आपली उन्नती होणार नाही. जर काँग्रेस निरनिराळ्या गटात विभागली तरच आपल्याला आपला उद्धार करता येईल. काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याने आपल्या शत्रूचे सामर्थ्य मात्र वाढेल. काँग्रेसची स्थिती आज आग लागलेल्या घरासारखी झाली आहे. (Congress is a burning house and we cannot be prosperous by entering in it. I shall not be surprised if it is ruined in a couple of years. Socialists have come out of the Congress. That will certainly weaken the Congress.) त्यात प्रवेश करण्याने आपणच भस्मसात होऊ. येत्या दोन वर्षात काँग्रेसचा नाश झाला तर त्यात मला मुळीच आश्चर्य वाटणार नाही.

    समाजवादी आज काँग्रेस मधून बाहेर पडले आहेत त्यामुळे काँग्रेसचे बळ निश्चितपणे कमी होणार आहे. अशावेळी आपण तिसरा पक्ष या नात्याने आपली स्वतंत्र संघटना केली पाहिजे. जर काँग्रेस किंवा समाजवादी यापैकी कोणालाही हुकमी बहुमत प्राप्त झाले नाही तर ते आपल्या मतांची भीक मागण्यासाठी येतील. अशावेळी आपला पाठिंबा देण्यासाठी आपण आपल्या अटी पुढे करून सत्तेतील समतोलपणा राखू शकतो.” (संदर्भ : DBAWS खंड 18 भाग 3, पान क्रमांक 91 & English Vol.17/3/389)

    यावरून हे स्पष्ट होते की समाजवाद्यांचा गट काँग्रेस मधून बाहेर पडून काँग्रेसची अवस्था ही दिवसेंदिवस खिळखिळी होत चालली होती. जणू काही काँग्रेसरुपी घराला आग लागून हे घर आता लवकरच नष्ट होईल असे बाबासाहेबांनी काँग्रेसच्या तेव्हाच्या स्थितीचे वर्णन केले होते. तेव्हा या जळत्या घरात प्रवेश करून आपण स्वतःलाही (आपल्या पक्षास) भस्मसात करणे हे शहाणपणाचे होणार नाही असे त्यांचे तत्कालीन मत होते. उलट समाजवादी बाहेर पडल्याने काँग्रेसमध्ये होऊ घातलेल्या दुफळीपैकी एकाला (काँग्रेस किंवा समाजवादी), आपल्या तिसऱ्या पक्षाचा, तात्विक अटींवर पाठिंबा देता येऊ शकतो हे ओळखूनच केलेले बाबासाहेबांचे ते मुत्सद्दी विधान होय.

    या विधानास अनुसरून केलेले बाबासाहेबांचे पुढील वक्तव्य हे दि. 25 एप्रिल 1954 रोजी पुलगाव, जिल्हा वर्धा येथे भंडारा जिल्ह्यात निवडणुकीच्या दौऱ्यावर ते आले असता जाहीर सभेत केलेले आढळते. बाबासाहेब आपल्या भाषणात म्हणतात,

    “दोन वर्षांपूर्वी लखनौला भाषण देताना ‘काँग्रेस हे जळते घर आहे’ असे मी सांगितले होते. याचे तुम्हाला प्रत्यंतर आलेच असेल. आता या घराचे फक्त आढे जे नेहरू तेच उरले आहे, तेही थोड्याच दिवसात जळून जाईल. आपल्याजवळ आर्थिक बल नाही. फक्त राजकीय सामर्थ्य आहे. शरण जाणे माणसाला शोभत नाही. प्रसंगात माणूस शरण जातो पण पुन्हा तलवार हाती घेतो. आपली स्थिती यापुढे 1952 च्या निवडणुका प्रमाणे होणार नाही. मनुष्य किती दीर्घायुषी असला तरी त्याला उतरती कळा लागणारच. पण आपला मग उत्कर्षच होणार आहे. म्हणून संघटना मजबूत करा हेच माझे नेहमीचे निक्षून सांगणे आहे.” (संदर्भ : DBAWS खंड 18 भाग 3, पान क्रमांक 386)

    बाबासाहेबांनी वरीलप्रमाणे स्वतःच आपल्या गत अलंकारिक वक्तव्याचा पुनरुच्चार करत त्यांना तेव्हा काँग्रेस संदर्भात काय सांगावयाचे होते हे स्पष्ट केले आणि भस्मसात होऊन मोडकळीस येणाऱ्या काँग्रेसरुपी घरामध्ये केवळ नेहरू तेवढे आता आढे म्हणून शिल्लक असल्याचेही ते याप्रसंगी सांगतात. आणि ते आढेही लवकरच संपुष्टात येईल असेही वर्तवितात. तेव्हा ‘काँगेस हे जळते घर आहे’ याचा अर्थ हा तत्कालीन राजकीय परिस्थितीचे अवलोकन करून ‘काँग्रेस पक्ष हा लवकरच संपुष्टात येणार आहे’ या अर्थाने बाबासाहेब जनतेला सूचित करत होते, हा होय. आणि अशा या राजकिय परिस्थितीत आपण आपली संघटना इमाने इतबारे सशक्त करण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे असे आपल्या अनुयायांना ते सदर भाषणातच निक्षून सांगतात की जेणेकरून “एखाद्या दीपमालेतील सर्व दिवे विझले, पण एकच पणती मिणमिणत राहिली तरी पण तीच साऱ्यांना मार्गदर्शन करते. त्याचप्रमाणे आमचा पक्ष लहान असूनही इतर पक्षांना मार्गदर्शन करील” असा त्यांना आपल्या पक्षाबाबत आशावाद वाटतो.

    तत्कालीन परिस्थितीत आपला पक्ष हा ‘शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशन’ होता ज्यास पुढे बरखास्त करून, या देशात संसदीय लोकशाहीत सत्ताधारी पक्षाला वेसण घालण्यासाठी, प्रबळ विरोधी पक्षनिर्मितीची नितांत गरज लक्षात घेऊन, बाबासाहेबांनी रिपब्लिकन पक्षास जन्मास घालून दिले आणि महापरिनिर्वाणोपरांत आपल्या अनुयायांना ‘रिपब्लिकन पक्षचळवळ’ हस्तांतरित केली. तेव्हा ‘प्रबळ विरोधी पक्ष’ निर्मितीचा संकल्प घेऊन बाबासाहेबांच्या अनुयायांनी रिपब्लिकन पक्षबांधणी करणे हे लोकशाही हितार्थ आहे, हे समाज हितार्थ आहे, हेच देशहितार्थ आहे. तेव्हा ही बाब आपण सदोदित लक्षात ठेऊन कार्यप्रवण झाले पाहिजे. एवढंच !

    लेखक – प्रशीक आनंद, नागपुर 
    8626047057

    $$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$

  • नागपुरच्या फुटाळा फाउंटनचे 16 ते 21 सप्टेंबर दरम्यान ‘ ट्रायल शो नागरिकांनी लाभ घ्यावा ..!

    नागपुरच्या फुटाळा फाउंटनचे 16 ते 21 सप्टेंबर दरम्यान ‘ ट्रायल शो नागरिकांनी लाभ घ्यावा ..!

    नागपुरच्या फुटाळा फाउंटनचे 16 ते 21 सप्टेंबर दरम्यान ‘ ट्रायल शो नागरिकांनी लाभ घ्यावा ..!

    नागपूर , १२ सप्टेंबर – फुटाळा तलावातील पाण्यात सुमधूर गीतांच्या तालावर थुईथुई नाचणारा , उचंच उच फवारे उडवणारा , इंद्रधनुषी रंगाची उधळण करणारा , पाण्याच्या अप्रतिम ‘ स्क्रीन ‘ वर नागपूरच्या इतिहास झलक दाखवणारा , अंगावर रोमांच उभे करणारा फाउंटन आणि लाईट शो आता प्रत्येकाला बघायला मिळणार आहे . खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्यावतीने येत्या 16 ते 21 सप्टेंबर दरम्यान शहराच्या सौंदर्यात घालणा या फुटाळा तलावावरील या अतिशय देखणा , अप्रतिम , अवर्णनीय असा म्युझिकल फाउंटन आणि लाइंट शोचे दरदिवशी रात्री 7 व 9 वाजता असे दोन ‘ ट्रायल शो आयोजित करण्यात आला आहे .

    या ऐतिहासिक शोचे नागपूरकरांना परत एकदा साक्षीदार होता येणार आहे . केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूर शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी महत्वपूर्ण तसेच महत्वाकांक्षी अनेक प्रकल्प हाती घेण्यात आलेले आहेत . त्यापैकीच एक सुप्रकल्प म्हणजे प्रसिध्द फुटाळा तलावाच्या निसर्ग सौंदर्यात अलौकिक भर घालणारा हा म्युझिकल फाउंटन आणि लाईट शो आहे . त्याअंतर्गत फुटाळा येथे पाण्यावर तरंगणारा जगातील सर्वात मोठा संगीतमय कारंजा तयार करण्यात आला असून त्याला अप्रतिम लाईट व म्युझिक शोची जोड देण्यात आलेली आहे .

    संगीताच्या तलावर नाचणा – या या फाउंटनमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात आले असून ते पाहिल्यावर डोळे दिपून जातात . मुझिकल फाउंटनबरोबर वाजणा – या संगीताला दिग्गज संगीतकार ए . आर . रेहमान यांनी संगीत दिले असून ऑस्कर पुरस्कार विजेते रेसुल पुकुट्टी यांनी म्युझिक डिझाइन केले आहे . नागपूरच्या इतिहासाच्या इंग्रजी कॉमेंट्रीला बीग बी अमिताभ बच्चन यांचा आवाज लाभला असून हिंदी भाषेतील कॉमेंट्री प्रख्यात गीतकार- दिग्दर्शक गुलजार यांनी तर मराठीतील कॉमेंट्री नाना पाटेकर यांच्या भारदस्त आवाजात ऐकायला मिळते . 24 व 25 ऑगस्ट दरम्यान या शोचे काही ठराविक लोकांसाठी ट्रायल शो आयोजित करण्यात आले होते . पण आता नागपुरातील प्रत्येक नागरिकाला या अवर्णनीय शोचा मनसोक्त आनंद घेता येणार आहे . गर्दी , गोंधळ , गैरसोय टाळण्यासाठी खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीने पासेसची व्यवस्था केली असून या पासेस ट्रायल शो च्या दिवशी सकाळी ११ वाजता , मा . केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांचे जनसंपर्क कार्यालय , सावरकर नगर , ऑरेंज सिटी हॉस्पिटल जवळ , खामला , नागपूर येथून प्राप्त करता येतील . तेव्हा प्रत्येकाने या नेत्रदीपक फाउंटन आणि म्युझिकल शोचा अनुभव घ्यावा , असे आवाहन खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीचे अध्यक्ष प्रा . अनिल सोले यांनी केले आहे .

  • गुमशुदा…!लाकर देने वाले को दिया जाएगा उचित इनाम..!

    गुमशुदा…!लाकर देने वाले को दिया जाएगा उचित इनाम..!

    गुमशुदा…!लाकर देने वाले को दिया जाएगा उचित इनाम
    दाभा निवासी ज्योति राजवेणु यादव उर्फ शाहिदा तौफीक अली अपने घर से बिना बताए 17 अगस्त 2022 को निकल गई।अबतक वह वापस नही आई।जिसके मिसिंग की शिकायत गिट्टीखदान थाने में 21अगस्त को दर्ज की गई।
    महिला मानसिक रुग्ण बताई गई।
    वर्णन
    1)रंग- साँवला
    2)ऊंचाई- 5 फिट 4 इंच
    3)चेहरा -लांबट
    4)बाल -काले लंबे
    5)बांधा – मध्यम
    6) भाषा -हिंदी
    7)स्काय ब्ल्यू बादल कलर का पंजाबी सूट
    इस वर्णन की महिला किसी को भी मिलेंगी तो नीचे दिए पत्ते पर मोबाइल पर संपर्क करें, लाकर देने वाले मानभावुओ को उचित इनाम दिया जाएगा।

    तौफीक अली,19 श्रीपुर्णा लेआउट ,विमल एचलवार के यहां किरायपर दाभा नागपुर
    मोबाइल -9823872681/8766865664
    ■■■■■■■■■■■■■■■■■■■■