देशात 22 लाख प्रशिक्ष‍ित चालकांची कमतरता – नितीन गडकरी -एम. वझलवार चालक प्रशिक्षण केंद्र व स्‍वयंचलित परिक्षण केंद्राचे थाटात उद्घाटन

0
3

देशात 22 लाख प्रशिक्ष‍ित चालकांची कमतरता – नितीन गडकरी
-एम. वझलवार चालक प्रशिक्षण केंद्र व स्‍वयंचलित परिक्षण केंद्राचे थाटात उद्घाटन
नागपूर, – देशात सध्‍या 22 लाख प्रशिक्षित चालकांची कमतरता असून केंद्र सरकारच्‍यावतीने 15 हजार चालक पशिक्षण केंद्र सुरू करण्‍यात येणार आहे. त्‍यातीलच एका प्रशिक्षण केंद्राचे आज उद्घाटन झाले आहे. त्‍याकरिता एम. ड्रायव्हिंग सेंटरचे मनीष वझलवार व आशिष वांदिले यांचे अभिनंदन करतो, अशा शब्‍दात केंद्रीय रस्‍ते परिवहन व महामार्ग मंत्री मा. श्री नितीन गडकरी यांनी शुभेच्‍छा दिल्‍या.


केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त चालक प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन आणि स्वयंचलित तपासणी केंद्राचे भूमिपूजन मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते शनिवार एम वझलवार ड्रायव्हिंग स्कूल प्रायव्हेट लिमिटेड सावरमेंढा तालुका सावनेर जिल्हा नागपूर येथे पार पडले. या कार्यक्रमाला राज्‍यमंत्री मा. डॉ. पंकज भोयर, मा. आ. श्री. आशिष देशमुख, मा. आ. श्री. विनोद अग्रवाल, मा. आ. श्री. विजय रहांगडाले, माजी आमदार मा. श्री अनिल सोले, महाराष्‍ट्र राज्‍याचे परिवहन आयुक्‍त विवेक भिमनवार, अमृतलाल मदान, उपकेंद्र कोठेकर, राजीव पोद्दार, एम. वझलवार ड्रायव्हिंग स्‍कूलचे संचालक मनीष वझलवार, आशिष वांदिले, अर्चना आशिष वांदिले यांची मंचावर प्रमुख उपस्‍थ‍िती होती.


डॉ. पंकज भोयर म्‍हणाले, दरवर्षी मोठ्या प्रमाणात देशात अपघात होत असून मागील दहा वर्षात राष्‍ट्रीय महामार्गाची निर्मिती, समृद्धी महामार्गांसारखे अनेक महामार्ग तयार झाले आहेत. प्रगतीचे एक पाऊल टाकत असताना त्‍यावर प्रशिक्षण चालकांची देशाला मोठ्या प्रमाणात गरज आहे. या केंद्रासाठी आशिष वांदिले व मनीष वझलवार यांनी पुढाकार घेतला असून या प्रकल्‍पातून युवकांना रोजगार मिळेल व चांगले ड्रायव्‍हर उपलब्‍ध होतील.

आशिष देशमुख यांनी हा देशातील पहिली प्रशिक्षण केंद्र सावनेर विधानसभा केंद्रात तयार झाल्‍याबद्दल आनंद व्‍यक्‍त केला. आता लायसेन्‍स मिळवण्‍यासाठी नागपुरात जाण्‍याची गरज नाही, असे ते म्‍हणाले. विवेक भीमनवार यांनी भारतातील या पहिल्‍या सेंटरमाधून निश्चितपणे चांगले ड्रायव्‍हर तयार होतील, असा विश्‍वास व्‍यक्‍त केला.
प्रास्‍ताविकातून मनीष वझलवार यांनी नितीन गडकरी यांच्‍या प्रेरणेतून चालक प्रशिक्षण केंद्र सुरू केल्‍याचे सांगितले. यावेळी ‘हसत खेळत सोप्‍या भाषेत ड्रायव्हिंग शिका’ या पुस्‍तकाचे प्रकाशन नितीन गडकरी यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. आभार आशिष वांदिले यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here