-नागपुर हिंसा मामले में एक्शन, भारी पुलिस बल तैनात
नागपुर.-
नागपुर हिंसा के मुख्य आरोपी फहीम खान के खिलाफ बड़ी कार्रवाई की गई है। नागपुर महानगर पालिका ने सोमवार सुबह फहीम के घर पर बुलडोजर चलाकर अवैध निर्माण को ध्वस्त कर दिया। नागपुर हिंसा के कथित मास्टरमाइंड फहीम खान का घर प्रभाग 3 में संजय बाग नागसेनवन इलाके में है। अधिकारियों ने बताया कि अवैध अतिक्रमण के खिलाफ यह कार्रवाई की गई है। 38 वर्षीय फहीम अभी पुलिस की हिरासत में है। प्रशासन की आज की कार्रवाई नागपुर हिंसा के अन्य आरोपियों के लिए कड़ी चेतावनी मानी जा रही है।
पहले नोटिस भेजा
जानकारी के मुताबिक, महानगर पालिका ने 21 मार्च को फहीम खान के परिवार को अवैध निर्माण हटाने की नोटिस भेजा था। इसके बाद सोमवार सुबह 10 बजे बुलडोजर कार्रवाई शुरू की गई। बताया जा रहा है यह मकान फहीम खान की मां के नाम पर था और बिना वैध मंजूरी के बनाया गया था। बुलडोजर एक्शन से पहले ही रात में फहीम के परिवार ने घर खाली कर दिया था।
इलाके में भारी पुलिस बल तैनात
कार्रवाई के दौरान यशोधरा नगर, नागसेनवन संजयबाग इलाके में भारी पुलिस बंदोबस्त तैनात किया गया। सुरक्षा के लिए स्थानीय पुलिस के साथ एसआरपीएफ की दो टुकड़ियां भी मौके पर मौजूद है। इससे पहले नागपुर पुलिस ने फहीम खान की पार्टी एमडीपी से जुड़े हिंसा आरोपियों की दो दुकानों को सील कर दिया था। अब बुलडोजर एक्शन शुरू कर सरकार ने दंगाइयों को कड़ा संदेश दिया है।
अधिकारी ने कहा- अवैध है फहीम का घर
महानगर पालिका के अधिकारियों ने 20 मार्च को निरीक्षण के बाद पाया था कि फहीम खान का घर महाराष्ट्र क्षेत्रीय और नगर नियोजन अधिनियम, 1966 का उल्लंघन कर बनाया गया है। घर का कोई आधिकारिक निर्माण प्लान मंजूर नहीं था, इसलिए इसे अवैध निर्माण घोषित कर कार्रवाई शुरू की गई।
सीएम ने दिए थे बुलडोजर एक्शन के संकेत
नागपुर हिंसा पर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा, “यह घटना जिस दिन घटी उस दिन सुबह औरंगजेब की प्रतीकात्मक कब्र जलाई गई थी और उसे जलाने के बाद कुछ लोगों ने पुलिस में शिकायत की। पुलिस ने कार्रवाई भी की लेकिन बाद में कुछ लोगों ने सोशल मीडिया पर अफवाहें फैलाईं कि जो चादर जलाया गया, उस पर कुरान की आयतें लिखी थीं, लेकिन यह पूरी तरह झूठ था। सीएम फडणवीस ने कहा, महाराष्ट्र में हम अपने तरीके से कार्रवाई करते हैं। जहां बुलडोजर की जरूरत होगी, वहां उसका इस्तेमाल किया जाएगा। गलत कामों को रौंदा जाएगा। किसी को भी बख्शा नहीं जाएगा। नुकसान की भरपाई दंगाईयों से करवाई जाएगी और अंतिम आरोपी की गिरफ्तारी तक कार्रवाई जारी रहेगी।
Category: विदर्भ
-
गरजा बुलडोजर, फहीम का घर जमींदोज
-
श्री चैतन्य अकॅडमीने सुरु केले नागपुरात पहिले टेस्ट प्रिपरेशन सेंटर • पश्चिम भारतात आपली उपस्थिती केली आणखी मजबूत • नागपूरमधील विद्यार्थ्यांना जेईई आणि नीट परीक्षेकरिता मिळणार दर्जेदार शिकवणी • भारतभरात 50वे केंद्र सुरू करत गाठले मैलाचे शिखर
श्री चैतन्य अकॅडमीने सुरु केले नागपुरात पहिले टेस्ट प्रिपरेशन सेंटर
• पश्चिम भारतात आपली उपस्थिती केली आणखी मजबूत
• नागपूरमधील विद्यार्थ्यांना जेईई आणि नीट परीक्षेकरिता मिळणार दर्जेदार शिकवणी
• भारतभरात 50वे केंद्र सुरू करत गाठले मैलाचे शिखरनागपूर, 23 मार्च : परिणामपूर्वक गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या संधी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यावर भर देणाऱ्या इनफिनिटी लर्नचा महत्वाचा उपक्रम असलेल्या श्री चैतन्य अकॅडमीने महाराष्ट्रातील दुसरे आणि नागपूरमधील पहिले टेस्ट प्रिपरेशन सेंटर सुरू केले आहे. या शिकवणी केंद्राचे उद्घाटन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री श्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. हे नवीन केंद्र नागपूरमधील विद्यार्थ्यांना जेईई मेन्स, जेईइ अॅडव्हान्स आणि नीट परीक्षांसाठी अत्याधुनिक सुविधा आणि अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन पुरविणार असून या परीक्षांसाठी त्यांना दर्जेदार शिकवणी मिळणार आहे. या उपक्रमामुळे आता विद्यार्थ्यांना उत्कृष्ट प्रशिक्षणासाठी इतर ठिकाणी जावे लागणार नाही.
योग्य आणि प्रभावी शैक्षणिक सुविधांची मागणी लक्षात घेता विद्यार्थ्यांना आपल्या गावातच राहून स्पर्धात्मक परीक्षांसाठी दर्जेदार शिक्षण घेता यावे या उद्देशाने श्री चैतन्य अकॅडमीने नागपुरातील हे केंद्र सुरू केले आहे. या उपक्रमामुळे श्री चैतन्य अकॅडमीची पश्चिम भारतातील उपस्थिती अधिक बळकट झाली आहे. नागपूरमधील विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिकवणी, अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन आणि उत्तम संसाधने मिळावी, त्यांना आपल्या शहरातून बाहेर जावे लागू नये आणि जागतिक दर्जाचे शिक्षण त्यांच्यापर्यंत पोहोचावे, या हेतूने हे केंद्र सुरू करण्यात आले आहे.
श्री चैतन्य ग्रुपच्या सीईओ आणि संचालक सुश्री सुषमा बोप्पाना, “श्री चैतन्य गेल्या 40 वर्षांपासून महत्वाकांक्षी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक स्वप्नांना मूर्त स्वरूप देण्याचे काम करत आहे. 2023 मध्ये आम्ही जेईई मेन्स, जेईइ अॅडव्हान्स आणि नीट परीक्षांमध्ये देशातून पहिला क्रमांक मिळवण्याचा इतिहास रचला आहे. आमचे नागपूर केंद्र याच यशाची पुनरावृत्ती करेल तसेच जेईई आणि नीट परीक्षांमध्ये यश मिळविण्यासाठी इच्छुक असणाऱ्या शहरातील प्रत्येक विद्यार्थ्याला त्याची पार्श्वभूमी न बघता दर्जेदार मार्गदर्शन मिळेल. आम्ही गणित आणि विज्ञान विषयांवर विशेष भर देतो जेणेकरून कठीण स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांची शालेय वयातच मजबूत पायाभरणी होते. त्यामुळे पुढील टप्प्यावर जाताना त्यांना अवघड विषय शिकताना अडचणी येत नाहीत. या केंद्र विस्तारासह आम्ही एक गतिशील शिक्षण वातावरण निर्माण करण्याची आणि नागपूरच्या शैक्षणिक क्षेत्रात सकारात्मक बदल घडवण्याची आमची बांधिलकी स्पष्ट करत आहोत.”
इनफिनिटी लर्नचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री उज्ज्वल सिंग म्हणाले, “श्री चैतन्यची सिद्ध असलेली शिक्षण पद्धती आम्ही नागपूरच्या विद्यार्थ्यांसाठी आणत आहोत. वैयक्तिक मार्गदर्शन, आधुनिक तंत्रज्ञान आणि संकल्पनांची सखोल समज हा आमच्या शिक्षण पद्धतीचा गाभा आहे जो आमच्या बच्चा सिखा कि नही या ब्रिदवाक्यातून स्पष्ट दिसून येतो. आपले स्वप्न साकार करण्यासाठी, देशाच्या सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी आणि आपल्यासह आपल्या कुटुंबाचे उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी आम्ही या केंद्राद्वारे नागपूर आणि आजूबाजूच्या परिसरातील विद्यार्थ्यांना सर्वोत्कृष्ट मार्गदर्शन देणार आहोत. या केंद्राची सुरुवात म्हणजे शिक्षणाचे लोकशाहीकरण आणि प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांच्या मूळ गावी, त्यांच्या सोयीनुसार, भौगोलिक परिस्थितीची पर्वा न करता उच्च दर्जाची संसाधने उपलब्ध करून देण्याच्या आमच्या वचनबद्धतेचा पुरावा आहे.
श्री चैतन्य अकॅडमी – इनफिनिटी लर्न उपक्रमाचे ध्येय नागपूरमध्ये जेईई मेन, जेईई अॅडव्हान्स आणि नीट परीक्षांमध्ये देशातून पहिला क्रमांक मिळविण्याच्या मिळवण्याच्या ऐतिहासिक यशाची पुनरावृत्ती करणे आहे. श्री चैतन्य हा आशियातील सर्वात मोठ्या शैक्षणिक गटांपैकी एक असून, 2023 मध्ये त्यांनी जेईई आणि नीट परीक्षेमध्ये टॉप रँकर्स घडवले आहेत. नागपूरमधील हे टेस्ट प्रिपरेशन सेंटर जेईई आणि नीट परीक्षांसाठी विशेष कोचिंग प्रदान करेल तसेच येथे इयत्ता 8वी, 9वी आणि 10वीसाठी फाउंडेशन कोर्सेस उपलब्ध असतील. या केंद्रामध्ये विद्यार्थ्यांना संकल्पनांची मजबूत पकड मिळावी आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी आवश्यक कौशल्ये आणि ज्ञान विकसित करता यावे यावर भर दिला जाणार आहे.
हे अत्याधुनिक केंद्र एआय-आधारित वैयक्तिक शैक्षणिक साधने, सुसज्ज ग्रंथालय, प्रॅक्टिस लॅब्स, संपूर्ण टेस्ट सिरीज आणि अनुभवी प्राध्यापकांसह उत्तम पायाभूत सुविधा प्रदान करेल. श्री चैतन्य अकॅडमीचा तंत्रज्ञान आणि पारंपरिक शिक्षण पद्धती यांचा समतोल साधून, एक अद्वितीय हायब्रिड शैक्षणिक अनुभव देण्यावर विश्वास आहे. सुलभता, गुणवत्ता आणि परवडणारे शिकवणी शुल्क या गोष्टींना प्राधान्य देत सुरु करण्यात आलेल्या नागपूर आणि नांदेडमधील या नव्या टेस्ट प्रिपरेशन सेंटर्समुळे महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रात मोठा बदल घडेल.या केंद्र विस्तारासह श्री चैतन्य अकॅडमी आता भारतभरात एकूण 50 केंद्रे चालवत असून जेईई आणि नीट परीक्षांच्या शिकवणीमध्ये अग्रणी म्हणून आपले स्थान बळकट करत आहे. या केंद्र विस्तारामुळे आता विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे कोचिंग घेण्यासाठी आणि यश संपादन करण्यासाठी मोठ्या शहरांत जाण्याची गरज पडणार नसून आपल्या गावात राहूनच ते दर्जेदार शिक्षण घेऊ शकतील.
हा धोरणात्मक विस्तार इन्फिनिटी लर्नला भारतातील अग्रगण्य अभियांत्रिकी आणि वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून देणाऱ्या आघाडीच्या संस्थांपैकी एक म्हणून स्वतःला सिद्ध करण्याच्या दिशेने महत्वाचे पाऊल आहे.श्री चैतन्य अकॅडमी बद्दल:
श्री चैतन्य अकॅडमी हा इनफिनिटी लर्नचा एक उपक्रम असून आयआयटी-जेईई आणि नीट प्रवेश परीक्षांसाठी तसेच शालेय/बोर्ड परीक्षा, ऑलिम्पियाड आणि अन्य फाउंडेशन स्तरावरील परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना तयार करणारे एक संपूर्ण टेस्ट प्रिपरेशन सेंटर आहे. आशियातील सर्वात मोठ्या शैक्षणिक संस्थांच्या समूहाचा समृद्ध वारसा आणि सिद्ध झालेले अध्यापन तंत्र वापरून श्री चैतन्य अकॅडमीने वैद्यकीय आणि अभियांत्रिकी परीक्षांमध्ये सातत्याने अव्वल रँक धारक तयार केले आहेत. ऑफलाइन आणि ऑनलाइन शिक्षण पद्धती आणि उच्च पात्र, अनुभवी शिक्षकांच्या समूहासह श्री चैतन्य अकॅडमी विद्यार्थ्यांची पार्श्वभूमी न पाहता त्यांना सर्वोत्तम शिक्षण प्रदान करण्यासाठी समर्पित आहे. .इनफिनिटी लर्न बद्दल:
श्री चैतन्यचे इनफिनिटी लर्न हे भारतातील एकमेव हायब्रिड शिक्षण प्लॅटफॉर्म आहे, जे मोठ्या प्रमाणावर परिणाम-आधारित शिक्षण पुरवते. प्रीमियम शिक्षण सामग्रीसाठी 70 लाखांहून अधिक सक्रिय सदस्य आणि 7.5 लाखांहून अधिक नोंदणीकृत वापरकर्ते असलेल्या या प्लॅटफॉर्मचे उद्दिष्ट प्रत्येक विद्यार्थ्याची क्षमता ओळखून त्याला उन्नतीकडे नेणे हे आहे. आमचा प्लॅटफॉर्म विविध अभ्यास संसाधनांनी समृद्ध आहे, ज्यात आधुनिक शैक्षणिक गरजांसाठी तयार केलेल्या प्रश्नांचा विस्तृत संग्रह आणि सुलभ आणि समजण्यास सहज असणाऱ्या शिक्षण साधनांचा समावेश आहे.
इनफिनिटी लर्नच्या केंद्रस्थानी विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि परवडणाऱ्या शिक्षणसामग्रीसह त्यांच्या शैक्षणिक आणि वैयक्तिक विकासात मदत करणे आहे. आमचे ध्येय शिक्षण सोपे आणि प्रभावी बनवणे आहे जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याला उत्कृष्ट शिक्षण मिळू शकेल. -
‘कब्र’ पर सियासत, नागपुर में नफरत की आग
-गंगा-जमुनी तहजीब हुई तार-तार
-सड़कों पर पड़े पत्थर दे रहे गवाही
नागपुर.
मुगल शासक औरंगजेब की कब्र को लेकर उठीं नफरत की लपटों में सोमवार रात सेंट्रल नागपुर झुलस गया। एक अफवाह से फैली हिंसा में दंगाइयों ने जमकर उत्पात मचाया। अफवाह थी कि कुछ लोगों ने एक धार्मिक किताब को जला दिया है। यह अफवाह उस प्रदर्शन के दौरान फैली, जो दक्षिणपंथी समूहों ने किया था। वे औरंगजेब के मकबरे को हटाने की मांग कर रहे थे। अचानक दो समुदायों के लोग आपस में भिड़ गए। दर्जनों गाड़ियां स्वाहा कर दी गईं। हाथों में पत्थर लिए भीड़ ने पुलिस को भी नहीं बख्शा। उपद्रवी घर के अंदर तक घुसे और तोड़फोड़ की।
इसके बाद पथराव और तोड़फोड़
बताया जा रहा है कि विश्व हिंदू परिषद ने गोबर के कंडों से भरा एक हरे रंग का कपड़ा जला दिया। उनके मुताबिक, ये औरंगजेब की प्रतीकात्मक कब्र थी। इस घटना का वीडियो वायरल होते ही देर शाम 7:30 बजे महाल इलाके में हिंसा भड़क गई। इसके बाद पथराव और तोड़फोड़ शुरू हो गई। उपद्रवियों ने घरों पर पथराव किया और सड़क पर खड़े दर्जनों वाहनों में तोड़फोड़-आगजनी की। पुलिस पर भी हमला किया गया। डीसीपी निकेतन कदम कुल्हाड़ी के हमले से घायल हो गए। कानून-व्यवस्था को नियंत्रित करने के लिए बल प्रयोग करने के साथ ही आंसू गैस के गोले छोड़ने पड़े। पुलिस ने आंसू गैस के गोले छोड़े। रात 10.30 बजे से 11.30 बजे के बीच ओल्ड भंडारा रोड के पास हंसपुरी इलाके में एक और झड़प हुई।
सोची समझी साजिश को आरोप
अब चर्चा तेज है कि क्या यह एक सोची समझी साजिश थी? ये सवाल इसलिए उठ रहा है, क्योंकि वहां पत्थरों का ढेर मिला है। सियासत गर्म है, शिवसेना और बीजेपी नेता इसे सुनियोजित साजिश बता रहे हैं। सीएम देवेंद्र फडणवीस ने विधानसभा में बताया कि नागपुर हिंसा को लेकर 5 एफआईआर दर्ज की गई है। घटना में 31 पुलिसकर्मी और 7 नागरिक घायल हुए हैं। सीएम देवेंद्र फडणवीस नागपुर हिंसा को लेकर बेहद सख्त हैं। वहीं, डिप्टी सीएम एकनाथ शिंदे को इसमें साजिश की बू आ रही है।
उपद्रवियों को बख्शा नहीं जाएगा : शिंदे
उप-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने कहा है कि औरंगजेब का समर्थन करने वाले देशद्रोही हैं, उपद्रवियों को बख्शा नहीं जाएगा। उन्होंने कहा कि यह घटना पूरी प्लानिंग के तहत हुई है। पेट्रोल बॉम्ब का इस्तेमाल हुआ है। 4 डीसीपी और कई पुलिस वाले घायल हैं। आरोपियों के खिलाफ कड़ी कार्रवाई होगी। नागपुर पुलिस ने अबतक हिंसा में शामिल 50 से ज्यादा लोगों को अरेस्ट कर लिया है। इलाके में कर्फ्यू लगा हुआ है। उधर, दूसरे पक्ष की शिकायत के आधार पर पुलिस ने विश्व हिन्दू परिषद के कार्यकर्ताओं के खिलाफ भी एफआईआर दर्ज कर ली है।
जो प्रत्यक्षदर्शियों ने देखा
परिसर को लोगों का कहना है कि भीड़ ने योजना बनाकर हमला किया था। वे हमारे इलाके में आए और पत्थर फेंके। 8 गाड़ियों में तोड़फोड़ की गई। दो गाड़ियों को आग लगा दी गई। इस भीड़ में लोग मुखौटे पहने हुए थे। स्थानीय लोगों ने यह भी दावा किया है कि उनके पास पेट्रोल बम भी थे। सुबह जब विरोध प्रदर्शन हुआ तो पुलिस ने हस्तक्षेप किया। रात में महाराज की मूर्ति वाले स्थान और अन्य क्षेत्रों पर पत्थर फेंके गए और गाड़ियों में आग लगा दी गई। अग्निशमन कर्मियों और कर्मचारियों के साथ मारपीट की गई।
पुलिस ने बताया क्या हुआ
पुलिस कमिश्नर रवींद्र सिंगल के अनुसार, शहर के 11 इलाकों कोतवाली, गणेशपेठ, तहसील, लकड़गंज, पचपावली, शांतिनगर, सक्करदरा, नंदनवन, इमामवाड़ा, यशोधरानगर और कपिलनगर में में कर्फ्यू लगाया गया है। वहीं, मंत्री योगेश कदम ने मंगलवार को बताया कि 47 लोगों को हिरासत में लिया गया है। 12 से 14 पुलिस कर्मियों को चोटें आई हैं, 2-3 नागरिक भी घायल हैं। हिंसा के कारणों की जांच की जा रही है। अब मुंबई के मुस्लिम बहुल इलाकों में भी सुरक्षा बढ़ा दी गई है।
::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::: -
विधानपरिषद इतर कामकाज : उशिरा जन्म-मृत्यू नोंदणी प्रक्रियेची स्थगिती उठविण्याचा निर्णय – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
विधानपरिषद इतर कामकाज :
उशिरा जन्म-मृत्यू नोंदणी प्रक्रियेची स्थगिती उठविण्याचा निर्णय
– महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
मुंबई, : महसूल व वन विभागाने राज्यातील जन्म-मृत्यू नोंदणी प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी उशिरा जन्म व मृत्यू प्रमाणपत्र देण्यावर लावलेली स्थगिती उठविण्यात आल्याचे महसूलमंत्री चंद्रशेखकर बावनकुळे यांनी विधानपरिषदेत निवेदनाद्वारे जाहीर केले.
विलंबित नोंदणीबाबत सुधारणा आणि पारदर्शक प्रक्रिया
जन्म-मृत्यू नोंदणी अधिनियम, 1969 आणि सुधारित अधिनियम, 2023 नुसार, जन्म-मृत्यूच्या विलंबित नोंदणी प्रक्रियेत काही महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या होत्या. पूर्वी, जन्म किंवा मृत्यूची नोंद एक वर्षाच्या आत न झाल्यास प्रथम वर्ग दंडाधिकारी किंवा इलाखा शहर दंडाधिकाऱ्यांच्या आदेशावरून नोंदणी केली जात असे. मात्र, 11 ऑगस्ट 2023 रोजी केंद्र सरकारने सुधारणा करत जिल्हा दंडाधिकारी, उपविभागीय दंडाधिकारी किंवा कार्यकारी दंडाधिकारी यांना अधिकृत केले.
बनावट प्रमाणपत्र वाटपावर कारवाईसाठी विशेष तपास समिती
महाराष्ट्र शासनाकडे परदेशी नागरिकांना बनावट जन्म प्रमाणपत्रे वितरित केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर, 8 जानेवारी 2025 रोजी गृह विभागाने विशेष तपास समिती (SIT) स्थापन केली. विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र यांच्या अध्यक्षतेखाली काम करणाऱ्या या समितीने अनेक तक्रारींची चौकशी केली. या पार्श्वभूमीवर, महसूल विभागाने 21 जानेवारी 2025 रोजी आदेश काढून विलंबित जन्म-मृत्यू प्रमाणपत्र वितरण प्रक्रिया तात्पुरती स्थगित केली होती.
नागरिकांना दिलासा – स्थगिती हटविण्याचा निर्णय
नागरिकांना शाळा प्रवेश, पासपोर्ट, सातबारा उतारा, शैक्षणिक आणि इतर महत्त्वाच्या कामांसाठी जन्म व मृत्यू प्रमाणपत्रांची आवश्यकता असते. मात्र, विलंबित प्रमाणपत्र न मिळाल्याने अनेकांना अडचणी येत होत्या. त्यामुळे, महसूल विभागाने 21 जानेवारी 2025 रोजी स्थगिती हटवण्याचा निर्णय घेतला आहे.
सुधारित कार्यपद्धती आणि पारदर्शकता सुनिश्चित
सार्वजनिक आरोग्य विभागाने 12 मार्च 2025 रोजी नवीन कार्यपद्धती निश्चित करत, विलंबित नोंदणी प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणि सुटसुटीतपणा आणण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रक्रियेत बनावट प्रमाणपत्रे वाटप टाळण्यासाठी विशेष खबरदारी घेण्यात येणार आहे.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानपरिषदेत हे निवेदन करताना नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले. या निर्णयामुळे हजारो नागरिकांना दिलासा मिळणार असून, विलंबित जन्म-मृत्यू प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होणार असल्याचे सांगितले.
-
पीओपी’ मूर्तीसंदर्भात समिती स्थापन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पीओपी’ मूर्तीसंदर्भात समिती स्थापन
– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुबई, : गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील मोठा सण असून, हा पारंपरिकपणे साजरा करण्यावर कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी प्रयत्नशील असून गणेश मूर्तिकार बेरोजगार होऊ नयेत आणि पारंपरिक मूर्ती निर्मितीवर परिणाम होऊ नये, यासाठी सरकार उपाययोजना करत आहे. यासाठी डॉ.अनिल काकोडकर यांच्या नेतृत्वाखालील एक तज्ज्ञ समिती स्थापन करण्यात आली आहे, जी वैज्ञानिक आणि तांत्रिक दृष्टिकोनातून पीओपी मूर्तींना पर्यावरणपूरक पर्याय उपलब्ध करून देण्यासंदर्भातील अभ्यास करत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत सांगितले.
पीओपी (प्लॅस्टर ऑफ पॅरिस) गणेश मूर्तींवर बंदी घातल्याने गणेश मूर्तिकारांवर बेरोजगारीचे संकट कोसळणार असल्याचा मुद्दा विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, पीओपी मूर्तींवर बंदी घालण्याचा निर्णय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (Pollution Control Board) निर्देशांनुसार आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार लागू करण्यात आला. मागील काही वर्षांपासून हा मुद्दा न्यायालयात होता आणि न्यायालयाने यापूर्वीही राज्य सरकारला वेळोवेळी मुदत दिली होती. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयाने अंतिम निर्णय देऊन पीओपी मूर्तींवर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. जोपर्यंत काकोडकर समितीचा अहवाल येत नाही, तोपर्यंत मुदत द्यावी.” अशी विनंती न्यायालयाकडे करणार आहोत. सरकार प्रदूषण टाळण्याच्या बाजूनेच आहे, पण मूर्तिकार आणि गणेशोत्सव मंडळांच्या अडचणीही समजून घेतल्या जात आहेत. गणेश भक्तीची परंपरा टिकवून ठेवण्यासाठी आणि पर्यावरणपूरक पर्याय शोधण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे श्री. फडणवीस यांनी सांगितले.
-
विधानसभा इतर कामकाज :उद्योगांमधील प्रदूषण कमी करण्यासाठी तज्ञांची समिती स्थापन करणार – पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे -चंद्रपूर जिल्ह्यातील प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न
विधानसभा इतर कामकाज :उद्योगांमधील प्रदूषण कमी करण्यासाठी तज्ञांची समिती स्थापन करणार
– पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे
–चंद्रपूर जिल्ह्यातील प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न
मुंबई, दि. ११ : उद्योगांमधून विविध प्रकारचे प्रदूषण होते. प्रदूषण कमी करण्यासाठी शासन विविध उपाययोजना करीत असून उद्योगांमधील प्रदूषण कमी करण्यासाठी तज्ञांची समिती स्थापन करण्यात येईल. या समितीच्या अहवालानंतर प्रदूषण कमी करण्यासाठी अधिक प्रभावीपणे उपाययोजना करण्यात येतील. चंद्रपूर जिल्ह्यातील प्रदूषण कमी करण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल, असे पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.
चंद्रपूर जिल्ह्यातील प्रदूषणाबाबत सदस्य सुधीर मुनगंटीवार, सदस्य देवराव भोंगळे यांनी अर्धा तास चर्चा उपस्थित केली होती.
या चर्चेच्या उत्तरात पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, प्रदूषण कमी करण्यासंदर्भात आमदारांची समितीही गठीत करण्यात येईल. चंद्रपूर देशातील सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी एक आहे. केंद्र शासनाकडून चंद्रपूर जिल्ह्यात 21 मार्च 2012 रोजी नवीन उद्योगांना बंदी करण्यात आली. मात्र चंद्रपूर जिल्ह्यातील प्रदूषण पातळी 83.88 टक्क्यांवरून 54 पर्यंत खाली आल्यामुळे केंद्र शासनाने उद्योगबंदी उठवली. त्यानंतर जिल्ह्यात उद्योगांचा विस्तार, नवीन उद्योग वाढीस लागले. राज्यामध्ये स्टील, वस्त्रोद्योग व औष्णिक वीज उद्योगसारख्या अति प्रदूषण करणाऱ्या उद्योग समूहांची उपाययोजनांसंदर्भात बैठक घेण्यात येईल. तसेच अतिप्रदूषण करणाऱ्या उद्योगांची एक वेगळी सूची तयार करण्यात येईल. चंद्रपूर जिल्ह्यातील उद्योग या यादीमध्ये समाविष्ट करण्यात येतील.
पर्यावरण विभागाच्या माध्यमातून प्रदूषण करणाऱ्या उद्योगांना भेटी देऊन तपासणी करण्यात येते. अशा तपासण्याची संख्या वाढवण्यात येईल. अधिवेशन संपल्यानंतर चंद्रपूर जिल्ह्याचा दौरा करून या भागातील परिस्थितीचा आढावा घेण्यात येईल. वेकोली कोळसा खाणीबाबत अधिवेशन काळात बैठक घेण्यात येईल. चंद्रपूर जिल्ह्यात उद्योगामुळे झालेल्या शेती नुकसानीबाबत कृषी विभागाच्या अहवालानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल. प्रदूषण कमी करण्यासाठी कोळशाची वाहतूक ‘ कन्व्हेअर बेल्टमधून बंद स्वरूपात करणे. कार्बन फॉगरचा उपयोग करुन पाण्याची नियमित फवारणी करणे. तसेच वृक्ष लागवड करणे, यासारख्या उपाययोजना करण्यात येतील, असेही मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितले.
-
वोक्हार्ट हॉस्पिटल्समध्ये महिला दिनानिमित्त “आय एम फिअरलेस’’ मोहिमेचे आयोजन – अडथळ्यांवर मात करत आरोग्याचा उत्सव साजरा – आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त भारतभरातील १८०० महिलांचा कर्मचाऱ्यांचा सहभाग
वोक्हार्ट हॉस्पिटल्समध्ये महिला दिनानिमित्त “आय एम फिअरलेस’’ मोहिमेचे आयोजन
– अडथळ्यांवर मात करत आरोग्याचा उत्सव साजरा
– आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त भारतभरातील १८०० महिलांचा कर्मचाऱ्यांचा सहभाग
नागपूर, ८ मार्च
वोक्हार्ट हॉस्पिटल्सने दरवर्षीप्रमाणे या वर्षीदेखील आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधत ”आय एम फिअरलेस” मोहिमेचे आयोजन केले. मुंबई सेंट्रल, मीरा रोड, राजकोट आणि नागपूर येथील विविध शाखांमधील महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. रहिवासी डॉक्टर, डॉक्टर, परिचारिका, प्रशासकीय कर्मचारी, सफाई कर्मचारी आणि इतर विभागांचे सहकारी मिळून तब्बल १८०० महिला कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला. महिलांच्या आरोग्यासंदर्भात जागरूकता वाढवणे, त्यांच्या प्रतिभेला वाव देणे आणि संस्थेमध्ये एकजूट व सहकार्याची भावना निर्माण करणे हा या मोहिमेमागील उद्देश होता.कार्यक्रमात नामवंत वैद्यकीय तज्ञ तसेच स्त्रीरोग व प्रसूती तज्ञांनी महिलांच्या आरोग्यावर मार्गदर्शन केले. महिलांच्या पुनरुत्पादनक्षम आरोग्याविषयी सामान्य समस्या, दैनंदिन स्व:आरोग्य मूल्यांकनाचे महत्त्व, तसेच लवकर निदानाद्वारे गंभीर आजार टाळण्याचे फायदे यावर त्यांनी मार्गदर्शन केले. व्याख्यानांनंतर डॉक्टरांसोबत संवाद व प्रश्नोत्तर सत्र आयोजित करण्यात आले, ज्यामुळे सहभागींसाठी हा अनुभव अधिक माहितीपूर्ण आणि उपयुक्त ठरला.
महिला दिनाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी केक कटिंग, मनोरंजक खेळ आणि एकत्रीकरणाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला.
महिला आरोग्यासाठी प्रतिबद्धतेचा एक भाग म्हणून, वोक्हार्ट हॉस्पिटल्सने ८ मार्च ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत पॅप स्मीयर टेस्ट, मॅमोग्राफी आणि डॉक्टर कन्सल्टेशनवर २५% सूट दिली.वोक्हार्ट हॉस्पिटल्स ग्रुपच्या व्यवस्थापकीय संचालिका, जहाबिया खोऱाकीवाला यांनी या प्रसंगी आपली प्रतिक्रिया व्यक्त केल्या. ‘’वोक्हार्ट हॉस्पिटल्सच्या माध्यमातून आम्ही महिलांना निर्भयपणे जगण्यासाठी सक्षम करण्यावर विश्वास ठेवतो. ‘आय एम फिअरलेस’ ही मोहीम महिलांच्या त्यांच्या सामर्थ्याची आणि जिद्दीची आठवण करून देणारी मोहीम आहे. महिलांचे आरोग्य आणि कल्याण जपण्याच्या या प्रवासात त्यांना साथ दिल्याचा आम्हाला अभिमान आहे. हा दिवस केवळ उत्सव म्हणून साजरा करण्यासाठी नसून, महिलांच्या आरोग्यविषयक महत्त्वाच्या मुद्द्यांबाबत जागरूकता वाढवण्यासाठी आहे”,
असे त्या म्हणाल्या
वोक्हार्ट हॉस्पिटल्स ग्रुपचे मानवसंसाधन विभाग प्रमुख, अमिय कुमार साहू यांनी या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले कि, वोक्हार्ट हॉस्पिटल्समधील महिलांचा सन्मान करणे आणि त्यांच्या आरोग्य, विकास आणि सक्षमीकरणाबाबत असलेली आमची आमची वचनबद्धता अधोरेखित करणे हा आमचा या मोहिमेद्वारे उत्सव साजरा करण्याचा उद्देश होता. या उपक्रमांमुळे सर्वांना एकत्रित येण्याची संधी मिळते आणि संस्थेमध्ये महिलांनी दिलेल्या अमूल्य योगदानाची जाणीव होते.”वोक्हार्ट हॉस्पिटल्स, नागपूरचे सेंटर हेड, रवी बागली यांनीही आपल्या भावना व्यक्त व्यक्त केल्या. ते म्हणाले, ”या उत्सवामुळे आमच्या महिला कर्मचाऱ्यांचे सामर्थ्य, समर्पण आणि प्रतिभेचा प्रत्यय आला. त्यांच्या संघभावनेने आणि उत्साहाने आम्हाला प्रेरणा मिळाली आहे. आम्ही त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक प्रगतीसाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत.”
“आय एम फिअरलेस” ही मोहीम वोक्हार्ट हॉस्पिटल्सच्या महिला सशक्तीकरण, निरोगी जीवनशैली आणि रुग्ण तसेच कर्मचाऱ्यांच्या सर्वांगीण कल्याणासाठी असलेल्या वचनबद्धतेचा महत्त्वाचा भाग ठरत आहे. -
पूर्व विदर्भातील नागपूर लोकसभा व रामटेक लोकसभा युवा सेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न
पूर्व विदर्भातील नागपूर लोकसभा व रामटेक लोकसभा युवा सेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न
नागपूर – युवासेना प्रमुख आदित्य साहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शकांना खाली तसेच युवा सेना सचिव आमदार वरून जी सरदेसाई साहेब यांच्या आदेशाने व
युवा सेना कार्यकारणी सदस्य हर्षल दादा काकडे यांच्या नेतृत्वात आज पूर्व विदर्भातील नागपूर लोकसभा तसेच रामटेक लोकसभा युवा सेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक रवी भवन येथे आयोजित करण्यात आली होती.याप्रसंगी युवा सेनेच्या वतीने प्रत्येक जिल्ह्यामध्ये बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी मोफत *नीट,जेईई,लॉ सीईटी मॉक टेस्ट* उपलब्ध करून देण्यात येणार आहे या संदर्भात जास्तीत जास्त विद्यार्थी या मॉक टेस्टचा फायदा कसा घेऊ शकतील या संदर्भाने सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले तसेच शिवसेना पक्षातून ज्यांनी काही दिवसाआधी भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला होता असे पंकज अहिरराव व त्यांचे प्रवीण अहिरराव (भारतीय जनता युवा मोर्चा शहर मंत्री) यांनी परत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मशाल जिल्हा असलेला भगवा दुपट्टा घालून हर्षल दादा काकडे यांच्या शुभ हस्ते शिवसेना पक्षात पक्षप्रवेश केला.
याप्रसंगी युवासेना सहसचिव जयसिंग राजे भोसले युवा सेना विभागीय सचिव युवती सेना अपूर्वा पीठ्ठलवार युवासेना वर्धा जिल्हा विस्तारक विक्रम राठोड युवासेना चंद्रपूर जिल्हा विस्तारक संदीप रियाल (पटेल) युवा सेना गडचिरोली जिल्हा विस्तारक शुभम सोरते
युवा सेना भंडारा जिल्हा विस्तारक अक्षय मेश्राम , युवासेना रामटेक लोकसभा समन्वयक आशिष मनपिया,युवासेना जिल्हा युवा अधिकारी प्रीतम कापसे, लोकेश बावनकर, आकाश इंगोले, भंडारा जिल्हा युवा अधिकारी श्रीकांत मेश्राम , , युवा सेना वर्धा जिल्हा उपजिल्हाधिकारी महेश चौधरी, नागपूर शहर प्रमुख आशिष हाडके, जिल्हा समन्वयक अब्बास अली,गुलशन ग्वालानी, उपजिल्हा प्रमुख अखिल पोहनकर कौशिक येरणे,छोटू राऊत, उपजिल्हा प्रमुख प्रफुल कापसे, लखन राऊत, बंटी पंडेल, अविनाश लोखंडे
तसेच नागपूर लोकसभा रामटेक लोकसभा भंडारा लोकसभा वर्धा चंद्रपूर गडचिरोली येथील अनेक पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते इतर पदाधिकारी उपस्थित होते. -
महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाला नवी उंची देणारा अर्थसंकल्प : ऍड. धर्मपाल मेश्राम
महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाला नवी उंची देणारा अर्थसंकल्प : ऍड. धर्मपाल मेश्राम
नागपूर – उद्योग, रोजगार, शिक्षण, पायाभूत सुविधा, पर्यावरण, पर्यटन अशा सर्वच क्षेत्रांत प्रगतीची वाटचाल गतिमान करून राज्याच्या सर्वांगीण विकासाला नवी उंची प्रदान करणारा अर्थसंकल्प मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारमधील अर्थमंत्री श्री. अजित पवार यांनी सादर केला आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रवक्ते ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी दिली आहे.
राज्यात शंभर दिवसीय सात कलमी कृती आराखडा, महाराष्ट्रातील नवीन औद्योगिक धोरण 2025 व त्यानुसार राज्यात पाच वर्षात 40 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक व 50 लाख रोजगारांची निर्मिती, नवीन कामगार धोरण, गडचिरोली जिल्ह्यातील खनिकर्म महामार्गाच्या जाळ्यासाठी 500 कोटी रुपयांची तरतूद, सामूहिक प्रोत्साहन योजनेसाठी 6400 कोटी रुपयांचे प्रोत्साहन अनुदान, नागपूर येथे अर्बन हाट चा स्थापना अशा व अनेक लोकाभिमुख योजनांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेचे जीवन सुकर करण्याचा प्रयत्न असल्याचेही मत ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी व्यक्त केले.
आद्य शिक्षिका ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव नायगाव, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा येथे स्मारक व महिला प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा गौरवशाली निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याशिवाय साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जन्मस्थळ वाटेगांव, तालुका वाळवा, जिल्हा सांगली येथील स्मारकासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून दिला. हे दोन्ही निर्णय आणि त्यासाठी अर्थसंकल्पातील विशेष तरतूद सामाजिक न्यायाचा पाया अधिक भक्कम करणारा आहे, असेही ॲड. धर्मपाल मेश्राम म्हणाले.
-
॥ साक्षात भीमसेविका घरी येते तेव्हा ॥
॥ साक्षात भीमसेविका घरी येते तेव्हा ॥
मा. लेडी गव्हर्नर व सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश श्री भूषण गवई यांच्या मातोश्री तसेच बिहार केरळ व सिक्कीमचे राज्यपाल श्री रा सू गवई यांच्या पत्नी प्राचार्य डॉ.कमलताई गवई यांनी मराठी मधील सुप्रसिद्ध कवी प्रा. इंद्रजीत भालेराव यांच्या परभणी मधील एकनाथ नगर येथील निवासस्थानी भेट दिली. त्याप्रसंगी प्रा. इंद्रजीत भालेराव यांनी केलेले हे शब्दांकन
॥ साक्षात भीमसेविका घरी येते तेव्हा ॥
परवा (०४ – ०३ – २०२५) अचानक लेडी गव्हर्नर कमलताई गवई घरी येऊन गेल्या. प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे यांचा फोन आला की ताई तुमच्या घरी येऊ इच्छितात. परभणीत कृषी विद्यापीठातल्या कार्यक्रमानिमित्त त्या आलेल्या होत्या आणि सदिच्छा भेटीसाठी त्या माझ्या घरी येऊ इच्छित होत्या. मला अर्थातच आनंद झाला. म्हटलं, या. बरोबर साडेचार वाजता त्या माझ्या घरी आल्या.
कमलताई या महाराष्ट्रातले जुने रिपब्लिकन नेते, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष असलेले, नंतर सतत तीस वर्षे आमदार म्हणून निवडून आलेले, दोन वेळा खासदार झालेले, केरळ, सिक्कीम आणि बिहारचे राज्यपाल राहिलेले स्मृतीशेष रा. सू. गवई यांच्या सहधर्मचारिणी आहेत. रा. सू. गवई यांनी प्रत्यक्ष बाबासाहेब आंबेडकर यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून काम केलेलं आहे. कमलताईही त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून होत्याच. कमलताई अमरावतीच्या महाविद्यालयात प्राचार्य होत्या. एका बाजूला रा. सू. गवई यांच्या जशा त्या सहधर्मचारिणी तशाच सर्वोच्च न्यायालयाचे वर्तमान न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या त्या आई आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय आर. आर. आबा यांनी रा. सु. गवई यांच्या व्यक्तिमत्त्वाचे काही राजस किस्से मला सांगितलेले होते. गवई विधानसभेचे सभापती असताना आबा तेव्हा साधे आमदार होते. ते किस्से कधीतरी लिहिण्यासारखे आहेत.
सध्या कमलताईंचं वय ८५ वर्षे आहे. तरीही त्या फिरतात. त्यांची शैक्षणिक आणि सामाजिक कामं सुरूच आहेत. त्यांचं राहणं, वागणं, बोलणं अगदी निरागस आणि निगर्वी. जिथे मुक्काम होईल तिथे साध्या घरात राहणं, अंगावरचे कपडेही तितकेच साधे. स्वभावही तितकाच साधा, सरळ. त्यामुळे होत्या तितक्या वेळात त्यांचं व्यक्तिमत्व आम्हाला भाराऊन गेलं.
त्यांना दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनाच्या वतीने दिला जाणारा जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाल्याचे समजल्यामुळे मलाही वाटलं की, आपण त्यांचा सत्कार केला पाहिजे. म्हणून सौ. गया, सुनबाई गायत्री आणि मी असा आम्ही कमलताईंचा सत्कार केला. त्यांना भेट देण्यासारखी एक गोष्ट माझ्याकडे होती, ती म्हणजे माझं नुकतच कबीरावर आलेलं पुस्तक. ते मी त्यांना भेट दिलं. नातूऋतू हे पुस्तक मी नरेशचंद्र काठोळे सरांना भेट दिलं, तेव्हा कमलताई म्हणाल्या मलाही ते पुस्तक द्या. मी ते अर्थात आनंदानं त्यांना दिलं. बालकवीतेचं त्यांना कशाला द्यायला पाहिजे, म्हणून मी टाळत होतो. पण त्यांनी मागून घेतलं याचा मला खूप आनंद वाटला.
घरात होत्या तेवढा वेळ गया, गायत्री आणि आमचा नरेन यांच्याशी त्या अगदी वात्सल्यपूर्ण वागल्या.त्यांच्यासोबत असलेल्या प्रा. डाॅ. नरेशचंद्र काठोळे यांनी कबीराच्या पुस्तकाच्या काही प्रति विकत घेतल्या. ते नेहमीच ग्रंथप्रसार करतात. आवडलेली पुस्तकं विकत घेतात आणि आपल्या मित्रांना वाटतात. मागच्या वेळी आले तेव्हा त्यांनी ‘तुमची आमची माय’ हे पुस्तक विकत घेतलेलं होतं आणि अनेकांना भेट दिलेलं होतं. यावेळी त्यांनी कबीर लोकांपर्यंत पोहोचवायचा असं ठरवलेलं दिसतय.
प्रत्यक्ष बाबासाहेबांसोबत काम करणाऱ्या कमलताई सारख्यांची तासाभराची का होईना ही भेट आम्हाला खूप समृद्ध करून गेली. आम्ही तर अक्षरशः भारावून गेलो होतो. माझ्या डोळ्यासमोर सतत बाबासाहेबांच्या सहवासातल्या कमलताई दिसत होत्या. रा. सु. गवई यांच्या सहवासातल्या कमलताई दिसत होत्या. मी मनोमन त्यांना वंदन केलं आणि प्रत्येक्षातही त्यांना वंदन केलं.
प्रा.इंद्रजीत भालेराव
परभणी
8432225585
(लेखक मराठी मधील अतिशय लोकप्रिय व संवेदनशील कवी आहेत)