धारदार शस्त्राने वार करत तरुणाची निर्घृण हत्या…. गोंदियाच्या भिवापूर परिसरातील घटना…. तिरोडा पोलिसांत अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल.

धारदार शस्त्राने वार करत तरुणाची निर्घृण हत्या…. गोंदियाच्या भिवापूर परिसरातील घटना…. तिरोडा पोलिसांत अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल.

गोंदिया : जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील भिवापूर येथील नाल्याजवळ रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या एका तरुणाचा मृतदेह आढळला. अज्ञात मारेकऱ्यांनी त्याच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याची बाब पोलिसांनी केलेल्या मोका पंचनाम्यादरम्यान पुढे आली. सुनील चंद्रकुमार तुमळे (३२) रा. भुराटोला असे मृतक तरुणाचे नाव आहे.
तिरोडा तालुक्यातील भुराटोला येथील सुनील तुमळे याच्या गावापासून ७ किलोमीटर अंतरावर असलेल्या भिवापूर गावाच्या परिसरात मुख्य रस्त्यापासून ५० फूट आत त्याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळला.

मृत तरुण हा आपल्या मोटरसायकल ने भिवापूर परिसरात गेला होता. पण तो घरी परतला नाही. त्याची मोटारसायकल रस्त्यालगत उभी होती. अज्ञात मारेकऱ्यांनी त्याच्या डोक्यावर धारदार शस्त्राने तीन घाव घातले. यात एक घाव खोलवर तर दोन घाव सामान्य होते. यात त्याचा मृत्यू झाला. या घटनेसंदर्भात त्याची आई चंद्रकला चंद्रकुमार तुमळे (५२) यांच्या तक्रारीवरून तिरोडा पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १०३ (१) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *