नागलवाडी येथे जागतिक महिला दिनऔचित्य साधून महिलांचा केला सत्कार!
नागपूर WH NEWS – २१ मार्च २०२६ रोजी उत्कर्ष ज्ञानविकास बहुउद्देशीय संस्था, नागपूर यांच्या वतीने नागलवाडी येथे जागतिक महिला दिन औचित्य साधून मोठ्या उत्साहात महिलांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावच्या सरपंच सौ. हिराताई सहारे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष जनार्दन भगत तसेच पोलीस पाटील सौ. रविना गोडबोले उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन उत्तम किड्स कॉन्व्हेंटच्या मुख्याध्यापिका सौ. रजनी बगडे यांनी केले.
यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तीन महिलांचा संस्थेच्या वतीने शॉल, श्रीफळ, मोमेंटो व संविधान देऊन सत्कार करण्यात आला. सत्कारमूर्तींमध्ये सौ. रेखाताई लापकाले (माजी सरपंच व सामाजिक कार्यकर्त्या) यांचा गावाच्या विकासासाठी केलेल्या कार्याबद्दल गौरव करण्यात आला. तसेच सौ. त्रिवेणी बर्वे या उत्कृष्ट टेनिसपटू, गायक आणि शासकीय सेवेत कार्यरत असल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.यासोबतच वाडी पोलीस ठाण्यात कार्यरत महिला पोलीस कर्मचारी (WPC) सौ. इंदुताई कंडीयाल यांचाही गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाला कल्पिता आंदे, रेनुका सहारे, संगीता आंदे, प्रियंका बढई, नर्मदा बाहेश्वर, माधुरी शेंडे, गीता कोटरुंगे, वैशाली ताई, चिंदा बाई गुडे, विमलबाई, सुषमा आंदे यांसह गावातील मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
