“सर्वसामान्यांच्या जगण्यातले हुंकार अतिशय संवेदनशील आहेत, याची जाणीव निर्माण करा” – डॉ.
– डॉ आसाराम लोमटे
नागपूर wh news – बर्डी येथील और हिंदी मोर भवन मधील मधुरम सभागृहामध्ये शनिवार, दि. 30 ऑगस्ट 2025 ला सायंकाळी सहा वाजता कामगार केसरी आर. एस. रुईकर संस्थेकडून “कामगार केसरी रुईकर स्मृती व्याख्यान” दरवर्षीप्रमाणे आयोजित केले होते. हे व्याख्यान प्रसिद्ध साहित्यिक व पत्रकार डॉ. आसाराम लोमटे यांनी दिले.
याप्रसंगी बोलताना ते म्हणाले की सर्वसामान्यांच्या जगण्यातले हुंकार अतिशय संवेदनशील आहेत. भारतातील सर्व प्रदेशातील कष्टकऱ्यांचे जग चित्रीत करण्याचे प्रयत्न असता गायब आजचागायत सुरूच आहेत, याची फारशी कल्पना आपणास नाही. त्यात कष्टकऱ्यांच्या खडतर, कठीण व दुरापास्त जगणे लेखणीबद्ध होत आहेत. ‘भाकरीचा तुकडा म्हणजे नसणे म्हणजे तुम्ही गुन्हेगार आहात’ ही भावना अण्णाभाऊ साठे यांनी जगासमोर मांडली. अशा स्थलांतरित मजुरांचे चित्र चितारण्याचे प्रयत्न सातत्याने देशातील समाजाभिमुख साहित्यिकांनी अनेकदा केले आहेत.
यात राजस्थानी, गुजराती, महाराष्ट्र, पंजाब, ओडिया व दक्षिण अशा अशा सर्व प्रांतात व भाषांमध्ये शब्दबद्ध झाले आहेत. ‘विदेशीया’ सारख्या कलाकृतीत अशाच स्थलांतर करणाऱ्या कष्टकऱ्यांचे जगणे इथे सांगितले जात आहे. त्यांचे जगणे कठीण असले तरी ते शहरी समाजापेक्षा कितीतरी प्रगल्भ आहे, हे समजावे लागेल. ही माणसे जगताना आपली जीवनमूल्य सोडत नाहीत कितीही संकटे येत असली तरीही हे आपली तत्वे सुटू देत नाही. ते आपल्याला अनुसरणीय असायला पाहिजे, असे मत त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले. आपल्या अनेक लोककथा कष्टकऱ्यांनी रचल्यात. त्या कष्टकऱ्यांचा जो विवेक किंवा बुलंद आवाज आहे, तो वेळप्रसंगी इथल्या देव, धर्म व व्यवस्थेलासुद्धा नाकारत आला आहे, याची दखल आपल्याला घ्यावी लागेल, असेही ते याप्रसंगी म्हणाले.
स्मृती व्याख्यानाचे अध्यक्षीय भाषण करताना कामगार केसरी आर एस रुईकर संस्थेचे संचालक डॉ. श्रीनिवास खांदेवाले आपले अध्यक्ष भाषण करताना म्हणाले की “आम्ही भाकर विकत नसतो ” ही कष्टकऱ्यांची मनोवृत्ती आपण आजपर्यंत समजू शकलो नाही, हे सत्य आहे. समाजात एक पोकळी निर्माण झाली आहे. ती कशी भरून काढायची ही खरी समस्या आहे. ही पोकळी ग्रामीण व शहरी, कष्टकरी व सुखासीन, जुनी व नवीन पिढी, या सगळ्यांमध्ये निर्माण झाली आहे. ‘समृद्धी मार्गाने समृद्धी आलीच,’ असे अहंभावाने आपण म्हणत असलो तरी समृद्धी कोणीकडून कुठे येत आहे ? याचे उत्तर आपण कसे देऊ शकतो? समृद्धी नेमकी कुणाची ? आपणच फक्त माणसे आहोत, शहरांबाहेरील राहणारी लोक माणसे नाहीत, असा आपण समज करून घेतला आहे.
त्यामुळे ही दरी दोन समाजात निर्माण झाली आहे. यात मेळ घालण्याची जबाबदारीही आपलीच आहे, ती स्वीकारावी लागेल, असे मत त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे संचालन डॉ. जी एस ख्वाजा यांनी केले
संस्थेचा परिचय संस्थेचे सहसंचालक कॉम्रेड आर एन पाटणे यांनी केला व अतिथींचा परिचय संस्थेचे सचिव डॉ. गौतम कांबळे यांनी तर आभार प्रदर्शन संस्थेचे सदस्य एन एस. अडचुळे यांनी केले.
या कार्यक्रमाला शहरातील गणमान्य व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
Leave a Reply