Home WH NEWS पत्रकार प्रशांत कांबळे – चांदूर रेल्वे ते मंत्रालय प्रतिनिधी पर्यंतचा प्रवास.! वाढदिवस विशेष

पत्रकार प्रशांत कांबळे – चांदूर रेल्वे ते मंत्रालय प्रतिनिधी पर्यंतचा प्रवास.! वाढदिवस विशेष

0
पत्रकार प्रशांत कांबळे – चांदूर रेल्वे ते मंत्रालय प्रतिनिधी पर्यंतचा प्रवास.! वाढदिवस विशेष

पत्रकार प्रशांत कांबळे – चांदूर रेल्वे ते मंत्रालय प्रतिनिधी पर्यंतचा प्रवास.! वाढदिवस विशेष

अमरावती जिल्ह्यातील लहानशा चांदूर रेल्वे शहरातून आपल्या पत्रकारितेच्या कारकिर्दीची सुरुवात करणारा प्रशांत कांबळे आज मुंबईसारख्या गजबजलेल्या आणि स्पर्धात्मक राजधानीच्या शहरात पत्रकारितेत स्वतःचा वेगळा ठसा उमटवत आहे. त्याचा हा प्रवास केवळ वैयक्तिक मेहनत, चिकाटी आणि जिद्दीचा नाही, तर सामाजिक बांधिलकी आणि सत्यनिष्ठेचेही उदाहरण आहे.

सुरुवातीची पावले – चांदूर रेल्वेतून सुरुवात

प्रशांत कांबळे ची पत्रकारितेतील कारकीर्द एका स्थानिक वृत्तपत्रात तालुका प्रतिनिधी म्हणून सुरू झाली. गावातील सामान्य माणसांचे प्रश्न, स्थानिक समस्या आणि ग्रामीण भागातील घडामोडी यांचे अचूक, जबाबदार आणि संवेदनशील वृत्तांकन त्यांनी केले. त्यामुळे अल्पावधीतच ते लोकांच्या मनात विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जाऊ लागले.

मुंबईकडे वाटचाल

नंतर पत्रकारितेच्या वाटेवर पुढील टप्पा गाठण्यासाठी प्रशांत कांबळे मुंबईत दाखल झाला. जय महाराष्ट्र सारख्या न्यूज चैनल मध्ये असताना मुंबईच्या गटारात काम करणाऱ्या कामगारांची व्यथा न्यूज चॅनलमध्ये मांडली.. महानगरातील जलद गतीचे आयुष्य, स्पर्धा आणि सतत बदलणाऱ्या घडामोडी यांच्या मध्यभागी राहूनही त्यांनी सत्य, तथ्य आणि जबाबदारीचा धागा सोडला नाही.

दिव्य मराठीत मंत्रालय प्रतिनिधी

सध्या प्रशांत कांबळे मुंबईतील अग्रगण्य दैनिक दिव्य मराठी मध्ये मंत्रालय प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. शासनाच्या निर्णयांपासून ते जनतेच्या समस्यांपर्यंत, त्यांनी नेहमीच वाचकांपर्यंत अचूक आणि प्रभावी माहिती पोहोचवण्याचे काम केले आहे. मंत्रालयातील राजकारण, धोरणे आणि त्याचा जनजीवनावर होणारा परिणाम याचे सूक्ष्म विश्लेषण करून त्यांनी आपले वेगळेपण सिद्ध केले आहे.

सामाजिक बांधिलकी आणि संवेदनशीलता

प्रशांत कांबळे हा केवळ बातम्या देणारा पत्रकार नाही, तर एक संवेदनशील मन, सामाजिक जाण असलेले व्यक्तिमत्त्व आहे. सामान्य नागरिकांच्या समस्या, सामाजिक अन्याय, ग्रामीण भागातील आवाज आणि वंचित घटकांचे मुद्दे निर्भीडपणे मांडतो. पत्रकारितेला व्यवसायापेक्षा लोकसेवेचे माध्यम म्हणून पाहणारा हा दृष्टीकोन त्याचा इतरांपेक्षा वेगळा ठरवतो.

राहुल गडपाले यांनी दिली मुंबईत संधी….

मुंबईतून काही काळ अमरावतीत आल्यानंतर प्रशांत कांबळे याला खरंतर परत मुंबईत पत्रकारितेत जायचे होते मात्र मुंबईत चांगल्या वृत्तपत्रात काम मिळणे सोपे नाही. मात्र या कामी दैनिक सकाळचे संपादक राहुल गडपाले यांनी प्रशांतला दैनिक सकाळमध्ये मुंबईत काम करण्याची संधी दिली, आणि ही राहुल गडपाले यांनी दिलेली संधी प्रशांतच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. या संधीचे सोने करत सकाळ मधून मंत्रालय प्रतिनिधी म्हणून दिव्य मराठीत प्रशांत कांबळे यांनी झेप घेतली.
प्रशांत कांबळे च्या या यशात राहुल गडपाले यांच्यासोबतच विनोद भाऊ राऊत यांचा देखील महत्वाचा वाटा आहे…. विदर्भातल्या छोट्या गावातून मुंबईत गेलेल्या प्रशांतला मुंबईत सहकार्य साथ व मार्गदर्शन करणारे पत्रकारांचे देखील तेवढेच सहकार्य आहे.

वाढदिवसानिमित्त शुभेच्छा

आज प्रशांत कांबळे याचा वाढदिवस. प्रशांतला वाढदिवसानिमित्त खूप खूप मनःपूर्वक शुभेच्छा. सत्य, न्याय आणि सामाजिक बांधिलकीच्या मार्गावर प्रशांत असाच ठामपणे प्रवास करत राहावा, हीच अपेक्षा.WH NEWS NAGPUR

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here