दोन दुचाकींची समोरासमोर धडक ◾️ दोघांचा मृत्यू, तीन जखमी ◾️रावनवाडी-अर्जुनी मार्गावरील घटना

दोन दुचाकींची समोरासमोर धडक
◾️ दोघांचा मृत्यू, तीन जखमी

◾️रावनवाडी-अर्जुनी मार्गावरील घटना

गोंदिया : तालुक्यातील रावणवाडी ते अर्जुनी ते कामठा मार्गावर सोमवार 25 नोव्हेंबर रोजी दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी दुपारी १२:३० वाजताच्या सुमारास घडली. महेंद्र ठाकरे (वय ३५, रा. चिचगाव, ता. गोरेगाव ), रेखलाल पटले (५०, रा. किरणापूर वारा, मध्य प्रदेश) अशी मृतांची नावे आहेत.

रावणवाडीकडून अर्जुनीच्या दिशेने जाणारी मोटारसायकल आणि विरुद्ध दिशेने येणारी दुचाकी यांच्यात सोमवारी दुपारी १२:३० वाजता रावणवाडी अर्जुनी कामठा रस्त्यावर भीषण धडक झाली.
या अपघातात महेंद्र ठाकरे, रेखलाल पटले यांचा जागीच मृत्यू झाला. तर विरुद्ध दिशेने येणाऱ्या मोटारसायकलने मध्य प्रदेशातील मांडला येथील दोघेजण गंभीर जखमी झाले असून, अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे. तिन्ही जखमींना जिल्हा सामान्य शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. मोटारसायकलची धडक एवढी भीषण होती की, दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले असून दोन्ही मोटारसायकलचे नुकसान झाले आहे. या घटनेचा तपास रावणवाडी ठाण्याचे पोलिस निरीक्षक वैभव पवार करीत आहेत.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *