जीपिकोॅन 2025 मध्ये 500 हून अधिक डॉक्टरांनी एकत्र येऊन, जनरल मेडिसिन आणि गॅस्ट्रोएन्टेरॉलॉजीतील नवीन प्रगतीवर चर्चा केली
नागपूर : “गॅस्ट्रोएन्टेरॉलॉजी आणि मेडिसिन क्षेत्रातील नवीन प्रगती आणि ताजी माहिती जाणून घेण्यासाठी 23 ऑगस्ट 2025 रोजी नागपूरच्या जामठा येथील व्हीसीए क्लबमध्ये जनरल प्रॅक्टिशनर्स कॉन्फरन्स – जीपिकोॅन 2025 यशस्वीरित्या पार पडली.
या परिषदेचा उद्देश जनरल मेडिसिन आणि गॅस्ट्रोएन्टेरॉलॉजी क्षेत्रातील ताज्या प्रगतीबद्दल जागरूकता निर्माण करणे हा होता. अशा प्रकारच्या परिषदांमुळे फॅमिली फिजिशियनना आपले ज्ञान अद्ययावत करण्यास आणि त्यांच्या दैनंदिन वैद्यकीय सेवेत अधिक सुधारणा करण्यास मदत होते. यंदा या कार्यक्रमाला 500 हून अधिक डॉक्टर आणि फॅमिली फिजिशियननी उत्साहाने सहभाग नोंदवला.
परिषदेचा शुभारंभ पारंपरिक दीपप्रज्वलनाने झाला. हा समारंभ महाराष्ट्र शासनाचे महसूल मंत्री व नागपूर आणि अमरावती जिल्ह्यांचे पालकमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते पार पडला. ते या कार्यक्रमाचे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांच्यासोबत डॉ. श्रीकांत मुकेवार (आयोजन अध्यक्ष – जीपिकोॅन 2025 व व्यवस्थापकीय संचालक, मिडास हॉस्पिटल), डॉ. सौरभ मुकेवार (आयोजन सचिव – जीपिकोॅन 2025 व संचालक, मिडास हॉस्पिटल, वर्धा रोड, नागपूर), तसेच डॉ. शुभंकर गोडबोले(आयोजन सचिव – जीपिकोॅन 2025) आणि डॉ. भूषण बावरे (आयोजन सचिव – जीपिकोॅन 2025) हेही प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
महत्त्वाची सत्रे आणि तज्ज्ञ वक्ते
वैज्ञानिक कार्यक्रमात मेडिसिन आणि गॅस्ट्रोएन्टेरॉलॉजीतील महत्त्वाच्या विषयांवर तज्ज्ञांची सत्रे घेण्यात आली, त्यामध्ये पुढील विषयांचा समावेश होता :
• हायपरटेन्शन : पॅथोफिजिओलॉजी व उपचार पद्धती – डॉ. देबाशिष बाला
• अॅनिमिया : तपासणी व उपचारातील महत्त्वाचे मुद्दे – डॉ. रमेश मुंडले
• डायबिटीज, लठ्ठपणा व फॅटी लिव्हर डिसीज (पॅनेल चर्चा) – डॉ. श्रीकांत मुकेवार, डॉ. निखिल बालंखे, डॉ. अमृत कौर, डॉ. सनोबर शेख
• अॅसिड पॅप्टिक डिसीज : निदान व उपचार (गोळ्यांपासून शस्त्रक्रियेपर्यंत) – डॉ. अमित कवीमंदन
• कॉन्स्टिपेशन : फॅमिली फिजिशियनसाठी सोपी उपचार पद्धती – डॉ. श्रीकांत मुकेवार
• जुलाबाची हाताळणी – डॉ. भूषण भवरे
• पोटदुखी : जीपींसाठी डायग्नोस्टिक रोडमॅप– डॉ. सौरभ मुकेवार
• एलएफटी समजून घेणे व पिवळ्या काविळीवर केस – आधारित चर्चा – डॉ. अमृत कौर गहरा
• शरीरभर होणारी खाज – निदान व उपचार – डॉ. नेली चौधरी
• ताप आणि ट्रॉपिकल आजारांचे व्यवस्थापन – डॉ. शरद देशमुख
• किडनी रोगाचे लवकर निदान – डॉ. मोनाली साहू
• ॲक्यूट पॅन्क्रियाटायटिसचे प्राथमिक पातळीवरील व्यवस्थापन – डॉ. सौरभ मुकेवार
• सांधेदुखी : फिजिशियनला काय माहित असणे आवश्यक आहे – डॉ. कौस्तुभ बेलापुरकर
• न समजणारी लक्षणे – त्याकडे कसे पाहावे – डॉ. ईशा अहलुवालिया
• डोकेदुखी समजून घेणे : डोकेदुखीचे निदान आणि व्यवस्थापन करण्यासाठी एक सामान्य डॉक्टरांचे मार्गदर्शक– डॉ. प्रणित खंडाईत
• प्रौढ लसीकरणावरील शिफारसी : जागतिक व भारतीय दृष्टिकोन आणि जीआय आजार असलेल्या रुग्णांवर प्रौढ संसर्गाचा परिणाम – डॉ. शुभंकर गोडबोले
• “जस्ट आस्क मी एनीथिंग” (जामा) संवादात्मक सत्र – डॉ. श्रीकांत मुकेवार आणि टीम मिडास
या प्रसंगी बोलताना मिडास हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीकांत मुकेवार म्हणाले, “जीपिकोॅन 2025 हे केवळ वैद्यकीय ज्ञान वाटण्यासाठीचे व्यासपीठ नसून तज्ज्ञ डॉक्टर आणि फॅमिली फिजिशियन यांच्यातील एक दुवा आहे. ज्यामुळे आरोग्यसेवेतील नवनवीन प्रगती थेट तळागाळातील रुग्णांपर्यंत पोहोचू शकते.”
डॉ. सौरभ मुकेवार, संचालक, मिडास हॉस्पिटल, वर्धा रोड, नागपूर यांनी सांगितले :“सतत शिकत राहणे हे उत्तम आरोग्यसेवेचे गमक आहे. या परिषदेच्या माध्यमातून आम्ही डॉक्टरांना मेडिसिन आणि गॅस्ट्रोएन्टेरॉलॉजीतील ताज्या माहितीने सक्षम करण्याचा प्रयत्न करत आहोत.”
प्रमुख पाहुणे श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी अभिमान व्यक्त करताना सांगितले “नागपूरमध्ये मिडास हॉस्पिटलसारखी अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध असणे ही अभिमानाची गोष्ट आहे. मिडास हॉस्पिटलने आंतरराष्ट्रीय दर्जाचे उपचार नागपूरमध्ये उपलब्ध करून देण्याचे स्पष्ट ध्येय ठेवले आहे. या परिषदेचा उद्देश म्हणजे आरोग्यसेवेत नवीन तंत्रज्ञान वापरण्यास प्रोत्साहन देणे आणि रुग्णांना उत्तम सेवा व उपचार देण्यासाठी जागरूकता निर्माण करणे.”
ते पुढे म्हणाले, “मिडास हॉस्पिटल फॅमिली फिजिशियनना नवीन वैद्यकीय माहिती देऊन त्यांना सक्षम बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे, जेणेकरून ते रुग्णांना दर्जेदार उपचार देऊ शकतील. महाराष्ट्राच्या आरोग्यसेवा यंत्रणेला 2029, 2035 आणि 2047 पर्यंत अधिक मजबूत करण्याचे सरकारचे दीर्घकालीन ध्येय आहे. यात रोबोटिक शस्त्रक्रिया आणि रोबोटिक आरोग्यसेवेतील प्रगती महत्त्वाची ठरेल. नागपूरमध्ये इतके प्रगत केंद्र उभारल्याबद्दल मी डॉ. श्रीकांत मुकेवार आणि डॉ. सौरभ मुकेवार यांचे अभिनंदन करतो. तसेच अशा प्रकारच्या परिषदांचे आयोजन विदर्भातील सर्व जिल्हा स्तरावर व्हावे, अशी माझी ठाम सूचना आहे.”
परिषद डॉ.शुभंकर गोडबोले(आयोजन सचिव – जीपिकोॅन 2025) यांच्या आभार प्रदर्शनाने संपन्न झाली आणि प्रदेशातील वैद्यकीय क्षेत्र व रुग्णसेवा अधिक सक्षम करण्याच्या दिशेने आणखी एक यशस्वी टप्पा गाठला गेला.
Leave a Reply