महाराष्ट्रात महायुतीचे सरकार येणार असल्याचा व्यक्त केला विश्वास
गोंदियात सहकुटुंब बजावला मतदानाचा अधिकार
गोंदिया : महाराष्ट्रात महायुतीचे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस,रिपा, पिरिपाची महायुती स्पष्ट बहुमत घेऊन परत या राज्यातील लोकांची सेवा करण्यासाठी विजयी होणार आहेत. त्यामुळे विरोधक निराश झाले आहे. काल परवाचा जो प्रकरण काटोलचा होता किंवा मुंबई जवळील ठाणेमध्ये जे घडले ते अत्यंत म्हणजे एक फ्रस्ट्रेशनमध्ये आमचे विरोधक आले आहे. आणि त्यामुळेच अशा प्रकारचा चुकीचा काहीना काही खोटे आरोप आणि नाटक चालू झालेला आहे. मात्र, याचा परिणाम आमच्या महाराष्ट्राच्या जनतेवर होणार नाही. महायुतीने केलेली कामं लोकांना आवडणारे होते. त्यामुळे महाराष्ट्रात महायुतीचेच सरकार येणार असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष खा. प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केला.
खा. प्रफुल्ल पटेल यांनी आज, बुधवार २० नोव्हेंबर रोजी गोंदिया येथील नमाद महाविद्यालयातील मतदान केंद्रावर आपल्या कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला. यावेळी मतदानानंतर ते प्रसार माध्यमाशी बोलत होते. यावेळी त्यांनी महायुती १७५ जागांवर विजयी होणार असल्याचा विश्वास व्यक्त करित ते म्हणाले की, आम्ही लाडकी बहीण योजना, मुलींचा फ्री शिक्षण, गॅस सिलिंडर आणि बस तिकीटात सवलत अशी अनेक कामं, योजना दिलेली आहे. सोबतच शेतकर्यांना केंद्र व राज्याची सन्मान निधी, धानाला बोनस, इतर भागामध्ये सोयाबीन आणि कापसाला ५ हजार रुपये व दुधाला सात रुपये सबसिडी आणि निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच केंद्र शासनाकडून सोयाबीन ६ हजार रुपयांत खरेदी करण्याची ग्वाही देण्यात आली आहे. त्यामुळे राज्य महायुतीच चालवू शकते हे नागरिकांना पटलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रात महायुतीचे उमेदवार बहुमताने निवडून येणार आहेत हे विरोधकांना माहीत असल्याने ते अत्यंत निराश झाले असल्याचे खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले.
००००००