हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

श्रीराम फायनान्स तर्फे नागपूर मध्ये टू-व्हीलर एक्सचेंज आणि लोन मेळा आयोजित

spot_img

🔴 LIVE TV 🔴

श्रीराम फायनान्स तर्फे नागपूर मध्ये
टू-व्हीलर एक्सचेंज आणि लोन मेळा आयोजित

• टू-व्हीलर एक्सचेंज आणि लोन मेळावा सप्टेंबर 21 आणि 22 2024 रोजी फॉर्च्युन मॉल, नागपूर येथे होणार आहे.
• लोन प्रक्रिया अधिक सुलभ झाल्याने ग्राहक त्यांच्या दुचाकी कर्जाची पात्रता त्वरित तपासू शकतात.
• श्रीराम फायनान्स कर्जदारांना दुचाकी कर्जासाठी अर्ज करणे अधिक सुलभ, सोयीस्कर आणि कार्यक्षम बनवले आहे

नागपूर, 21सप्टेंबर, 2024: श्रीराम समुहाची प्रमुख कंपनी असलेल्या श्रीराम फायनान्स लिमिटेडने सप्टेंबर 21 आणि 22, 2024 रोजी फॉर्च्युन मॉल, नागपूर येथे टू-व्हीलर एक्सचेंज आणि लोन मेळावा आयोजित केला आहे. हिरो, सुझूकी, टीव्हीएस आणि रॉयल एनफिल्ड यासारख्या दिग्गज ओईएम कंपन्यांनी या एक्सचेंज आणि लोन मेळाव्यासाठी श्रीराम फायनान्ससोबत भागीदारी केलेली आहे. आगामी सणासुदीच्या हंगामात ग्राहकांना टू-व्हीलर लोन अतिशय सुलभतेने आणि कार्यक्षम पद्धतीने उपलब्ध व्हावे त्याचबरोबर या सणासुदीत त्यांच्या टू-व्हीलर खरेदीचे स्वप्न साकारण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.

नागपुर आणि आसपासचे रहिवासीं जे लोन मेळ्याला भेट देतील त्यांना आपल्या कर्ज पात्र रकमेची माहिती त्वरित समजेल आणि श्रीराम टू-व्हीलर कर्ज पात्रता व्हाउचर द्वारे त्यांची कर्ज मंजूरीची प्रक्रिया सुलभ होईल. www.shriramfinance.in किंवा श्रीराम वन ॲपवर मूलभूत तपशील भरून, ग्राहकांना संपूर्ण कर्जाच्या इत्यंभूत विभागणीसह एक व्हाउचर मिळते आणि संबंधित ग्राहक ते व्हाउचर कर्ज मेळाव्यातील श्रीराम फायनान्स प्रतिनिधीला पुढील कर्ज प्रक्रियेसाठी सादर करू शकतात. कर्ज मंजुरीला फक्त 10 मिनिटे लागतात आणि पुढील 24 तासांच्या* आत निधी वितरित केला जातो.

या उपक्रमाविषयी बोलताना, श्रीराम फायनान्स लिमिटेडच्या मार्केटिंगच्या कार्यकारी संचालक सुश्री एलिझाबेथ वेंकटरामन म्हणाल्या, “नवीन वाहनांच्या खरेदीसाठी सणासुदीचा हा काळ अतिशय शुभ मानला जातो. श्रीराम फायनान्स आयोजित करत असलेला एक्सचेंज आणि लोन मेळावा ग्राहकांना नवीन टू-व्हीलर खरेदी करण्याची किंवा त्यांची सध्याची टू-व्हीलर बदलण्याची अप्रतिम संधी देतो. कर्जप्रक्रिया अधिकाधिक सुलभ करण्यासाठी या कर्ज मेळाव्यात ग्राहकांना कर्ज पात्रता व्हाउचर दिले जाते आणि त्यामुळे त्यांना त्वरीत कर्जपात्रता स्पष्ट होऊन सहज कर्ज मिळण्याचा त्यांचा मार्ग सुकर होतो. यामुळे एक सुरळीत आणि जलद प्रक्रिया सुनिश्चित झाली असून नागपूर आणि महाराष्ट्रातील कुटुंबांना या सणासुदीला नवीन टू-व्हीलर घरी आणून सण आनंदाने साजरा करणे सोपे झाले आहे.”

श्रीराम फायनान्स बहुभाषिक डिजिटल मोहिमेसह या एक्सचेंज आणि लोन मेळ्याचे समर्थन करत आहे आणि श्रीराम फायनान्स टू-व्हीलर कर्ज पात्रता व्हाउचर मोहिमेचे TVC खालील लिंक्स वापरून पाहिले जाऊ शकतात:

 

spot_img
spot_img