हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

एनएनटीआरच्या जंगलात वाघोबाचा दबदबा ◼️नवेगाव-नागझिऱ्यात यंदा पर्यटकांच्या संख्येत वाढ : महसूलही वाढले

spot_img

एनएनटीआरच्या जंगलात वाघोबाचा दबदबा

◼️नवेगाव-नागझिऱ्यात यंदा पर्यटकांच्या संख्येत वाढ : महसूलही वाढले

गोंदिया : नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प (एनएनटीआर) गोंदिया-भंडारा जिल्ह्याचे वैभव असून या वैभवात वाढ व्हावी. व्याघ्र प्रकल्पाकडे पर्यटकांचा कल वाढावा या उद्देशाने नवेगाव-नागझिरा प्रकल्प व वन्यजीव विभागाकडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. याचीच फलश्रृती नवेगाव नागझिऱ्यात वाघांच्या संख्येत वाढ होऊन येथे येणाऱ्या पर्यटकांना हमखास वाघोबांचे दर्शन होऊ लागले आहे. परिणामी यंदाच्या उन्हाळ्यात म्हणजेच एप्रिल ते जून या तीन महिन्यांत नवेगाव-नागझिऱ्यात पर्यटकांनी लक्षणीय हजेरी लावली असून यंदा महसूलातही वाढ झाली आहे.

Advertisements

गेल्या दहा वर्षांत गोंदिया व भंडारा जिल्ह्यात वाघांच्या संख्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे. विशेषतः वाघांच्या अधिवासासाठी प्रादेशिक आणि वन्यजीव जंगलांमधील पोषक वातावरण या मागील कारण आहे. विशेष म्हणजे, गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील जंगल मध्य भारतातील व्याघ्र प्रकल्पांना जोडणारा दुवा आहे. नागझिरा ते पेंच, नागझिरा नवेगाव- ताडोबा, नागझिरा-उमरेड, पवनी, कऱ्हांडला अभयारण्य असा एक कॅरिडोर आहे. त्यातच गोंदिया-भंडारा जिल्ह्यात वाघांची संख्या आता वाढत असल्याचे शुभ संकेत मिळत असताना जिल्ह्याच्या चौफेर वाघांचा अधिवास आहे. त्यामुळे नवेगाव-नागझिऱ्याकडे पर्यटकांचा कल वाढला आहे. विशेष म्हणजे, येथे येणाऱ्या पर्यटकांना पूर्वी एखाद्या वाघाचे दर्शन व्हायचे, पण हल्ली प्रत्येक एक दोन दिवसांनी येथे वाघांचे दर्शन मागील एप्रिल, मे आणि जून महिन्यात पर्यटकांना झाल्याचे दिसून आले असून गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी पर्यटकांची संख्या लक्षणीय रित्या वाढली असताना महसूलातही वाढ झाली आहे.

दरम्यान, पावसाळ्याचा दिवस पाहता १ जुलैपासून व्याघ्र प्रकल्पातील जंगल सफारी बंद करण्यात आलेली आहे.

◼️१७ हजार ३३२ पर्यटकांनी केली सफारी…

Advertisements

नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात एप्रिल, मे, जून या तीन महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पर्यटक हे येत असतात. मागील वर्षी या हंगामात १५ हजार पर्यटकांनी हजेरी लावली होती. यात यंदा २० टक्क्यांनी वाढ झाली असून या वर्षी ३१ जून पर्यंत १७ हजार ३३२ पर्यटकांनी जंगल सफारी केली आहे. विशेष म्हणजे, या वर्षी विदेशी पर्यटकांनी सुद्धा नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाला भेट दिली आहे.

◼️४२.१७ लाख रुपयांचे महसूल …

यंदा पर्यटकात वाढ झाली असतानाच गतवर्षीच्या तुलनेत व्याघ्र प्रकल्पाच्या महसुलातही वाढ झाली आहे. गेल्या वर्षी ३१ लाख ६० हजार रुपयाचे महसूल प्राप्त झाले होते. यात यंदा पर्यटक वाढल्याने ४२ लाख १७ हजार रुपयाचा महसूल नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाला पर्यटनातून मिळालेला आहे.

Advertisements

◼️अशी वाढली वाघोबाची संख्या…

नवेगाव नागझिऱ्यात २० मे २०२३ ला वनमंत्री सुधीर मुंगनटीवार यांच्या हस्ते दोन वाघ सोडण्यात आले होते. त्यापैकी एक वाघीण अवघ्या काही दिवसातच शेजारील मध्यप्रदेशात निघून गेली. दरम्यान, ११ एप्रिल २०२४ ला नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात आणखी एक वाघीण सोडण्यात आली. तर दुसरीकडे नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील टी-३ या वाघिणीने काही छाव्यांना जन्म दिला आहे. त्यामुळे येथील वाघांची संख्या चांगलीच वाढली आहे.
०००००००