हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

गोंदियात केमिकल कंपनीला भीषण आग ◼️जीवितहानी नाही ◼️५० लाखांहून अधिक रुपयांच्या नुकसानीची शक्यता

spot_img

गोंदियात केमिकल कंपनीला भीषण आग

◼️जीवितहानी नाही

◼️५० लाखांहून अधिक रुपयांच्या नुकसानीची शक्यता

Advertisements

गोंदिया ब्यूरो चीफ : गोंदिया शहरातील फुलचुर नाका परिसरात एका केमिकल कंपनीत भीषण आग लागल्याची घटना आज (दि. ४) सकाळ ७ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. सुदैवानं या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी आर्थिक नुकसान मात्र मोठ्या प्रमाणात झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

गोंदिया-गोरेगाव मार्गावर फुलचुर टोलनाका परिसरात गोंदियातील अविनाश बजाज यांच्या मालकीची ही केमिकल कंपनी असून याठिकाणी फर्निचर करिता वापरण्यात येणारे केमिकल, पॉलीश आदी साहित्य असल्याचे त्यांनी सांगितले. तर शॉट सर्किटमुळे ही आग लागली असावी अशी शक्यता त्यांनी यावेळी व्यक्त केली. बजाज यांच्या मते यात त्यांचे जवळपास ५० लाख रुपयांहून अधिकचे नुकसान झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. सकाळी फूल तोडण्यासाठी गेलेल्या काही लोकांना कंपनीतून आगीचे लोट बाहेर येताना दिसले. याची माहिती त्यांनी बजाज यांना दिली त्यांनी कंपनीकडे धाव घेत नागरिकांच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते.

त्यामुळे आग विझविण्याच्या प्रयत्नात एक युवकही किरकोळ भाजल्याची माहिती पुढे येत आहे. दरम्यान, घटनेची माहिती अग्निशमन पथकाला देण्यात आली. अग्निशमन दलाचे चार बंब व पोलीस पथक घटनास्थळावर दाखल झाले असून आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. तर सकाळी ११ वाजतापर्यंत सुमारे ८० टक्के आग विझविण्यात पथकाला यश आले होते.

Advertisements

◼️मोठा अनर्थ टळला
आग लागलेल्या कंपनीच्या शेजारीच खासगी मोकळ्या जागेत वीज वितरण कंपनीचे रोहित्र व इतर साहित्य ठेवण्यात आले असून आग आटोक्यात आल्याने हे साहित्य विशेषतः रोहित्र थोडक्यात बचावले. अन्यथा मोठा स्फोट होऊन अनर्थ घडला असता अशा चर्चा घटनास्थळावर उपस्थित लोकांमध्ये सुरू होत्या.

◼️अग्निशमन दिनाच्या दिवशीच घडली घटना

४ मे सर्वत्र आंतरराष्ट्रीय अग्निशमन दिन म्हणून साजरा करण्यात येत असून योगायोगाने आजच्याच दिवशी ही घटना घडली. यात कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले असताना इमारतीलाही नुकसान पोहचले आहे.

Advertisements