कट्टर भीमसैनिक, नामांतर योद्दा
विजय वाकोडे
काल 16 डिसेंबर रात्रौ 9 वाजता विजय वाकोडे यांच्या निधनाची बातमी आली
विश्वास बसत नव्हता परंतु दुर्दैवाने बातमी खरी होती
परभणी पोलिसांच्या मारहाणीत शाहिद भीमसैनिक व्यंकट सूर्यवंशी यांचेवर अंतसंस्कार आटोपून परतत असता हार्ट अटॅक येऊन विजय वाकोडे यांचे निधन झाले दोन दिवसापूर्वी माझे वाकोडे सोबत बोलने झाले होते महाराष्ट्र बंद नंतर परभणीला येऊन भेटतो असे आश्वासित केले होते दुर्दैवाने आता मात्र विजय वाकोडे पुन्हा भेटणार नाही.
गेल्या आठवडया पासून परभणी धूमसत आहे पोलिसांचा लाठीहल्ला, कोम्बिंग ऑपरेशन, धरपकडं यामुळे रिपब्लिकन आंबेडकरी समाज त्रस्त आहे सर्वं राजकीय पक्ष आंबेडकरी समाजाच्या विरोधात एकवटले आहे संविधानाचा सन्मान व संवर्धन, संविधान धोक्यात असल्याच्या खोटा फेक प्रचार करून दलित वंचित आदिवासी मतदारांची मते लाटली ते इंडिया आघाडीचे पक्ष देखील आंबेडकरी जनतेच्या पाठीशी उभे राहिले नाही अश्या पद्धतीने आंबेडकरी समाज कोंडीत पडला असता सर्वं आघाड्यावर एकटे विजय वाकोडे झुंजत होते त्यांचे विरोधात देखील परभणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे अश्या प्रचंड तणावात सूर्यवंशी यांच्या निधना मुळे तणावात अधिक भर पडली.
सूर्यवंशी यांचे अंत्यविधी संस्कार आटोपून घरी जात असताना हार्टफेलने मृत्यू झाला
माझा वाकोडे यांचा परिचय 1978 नामांतर आंदोलनातून झाला वाकोडे औरंगाबाद भडकल गेट येथे आई वाडीला सोबत राहत होते त्यांचे वडील महसूल खात्यात तहसीलदार पदावर काम करीत होते मूळचे बुलढाणा ज़िल्हा नांदुरा येथील वाकोडे शिक्षणा साठी औरंगाबाद येथे आले पुढे सरकारी नोकरीं मुळे ते औरंगाबादेत स्थायिक झाले विजय शाळकरी मुलगा नामांतर आंदोलनात सामील झाला समर्पित झाला आंदोलन, केसेस गुन्हे, अटक जामीन मुळे विजयला परभणी येथे स्थलांतरित करण्यात आले महात्मा फुले नगर परभणी येथे भाड्याच्या खोलीत राहू लागले.
.. नामांतर आंदोलनात झोकून दिलेल्या वेडापिसा झालेला आक्रमक परंतु आक्रस्ताळी नसलेल्या विजयला परभणी मोकळे रान मिळाले
परभणी नामांतर विरोधकांचे हेडक्वाटर होते त्या परभणीत नामांतर चळवळ उभी करने फार कठीण काम होते विजय वाकोडे यास त्याच्याच प्रमाणे आक्रमक निर्भीड सहकारी मिळाले त्यात के आर गायकवाड हे एक त्यांचे दौरे प्रचार सभा गाजू लागल्या वाकोडे यांची लोकप्रियत्ता वाढू लागली
वाकोडे माझ्या सोबत विसापूर तुरुंगात एक महिना होतो नागपूर तुरुंगात देखील महिनाभर तुरुंगात होतो तुरुंग आमच्या साठी केडर कॅम्प असायचे बौद्दीक शिबीर असायचे दिवसभर चर्चासत्र, परिसंवाद रात्री व्याख्यान नंतर कविता आणि गाणे दुसरे काही कामच नाही ह्या हरेक तुरुंग यात्रेत विजय वाकोडे आमचे सोबत सहभागी असायचे पुरेपूर बौद्दीक तयारी झालेला कार्यकर्ता कशी आक्रमक चळवळ उभी करतो याचे मूर्तिमंत उदाहरणं अर्थात विजय वाकोडे
रिपब्लिकन ऐक्य फुटल्या नंतर आम्ही व्ही पी सिंग जनतादल सोबत युतीत गेलो चळवळीतले सहकारी मित्रांना उमेदवारी मिळवून देऊन जनतादलाच्या चक्र निशाणीवर निवडणुका लढविल्या होत्या त्यात हरीश लोहट वाकोला अण्णासाहेब कटारे देवळाली, चिंतामण गांगुर्डे भांडुप त्याचं वेळी आम्ही विजय वाकोडे यांना परभणी मतदार संघातून उमेदवारी मागितली आणि मिळविली देखील त्याचं जागेवर शेकाप पार्टीचे विजय गव्हाणे यांचाही आग्रह होता तेंव्हा वाकोडे विजय यांनी शेकापचे विजय गव्हाणे यांच्या उमेदवारीला पाठिंबा देऊन मनाचा मोठेपणा दर्शवीला शाहू फुले आंबेडकर चळवळीत काम करणारं दोन्ही विजय एकच आहे सिद्ध केले अन्यथा विजय वाकोडे 1995 सालीच आमदार झाले असते
विजय वाकोडे यांच्या निधणामुळे चळवळीचे फार मोठे नुकसान झाले आहे हानी झाली आहे
तानसेन ननावरे
युनायटेड रिपब्लिकन पार्टी