हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

गोंदियातील राहुल गांधींची सभा आघाडीला तारणार ?

spot_img

🔴 LIVE TV 🔴

गोंदियातील राहुल गांधींची सभा आघाडीला तारणार ?

गोंदिया : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूका अवघ्या काही दिवसांवर आहेत. जिल्ह्यात सर्वच प्रमुख पक्षाच्या नेतेमंडळींचे प्रचार दौरे सुरू आहेत. महायुतीकडून केंद्रियमंत्री नितिन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्ह्यात येऊन गेले. त्यात मंगळवारी कॉंग्रेसचे नेते खा. राहुल गांधी यांनी मविआच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ गोंदियात प्रचारसभा घेतली. मात्र, सद्या जिल्ह्यात आघाडीत झालेली बंडखोरी, नवखे व बाहेरील उमेदवाराला दिलेली संधी त्यातच पक्षाअंतर्गत असलेली नाराजी आदींचा विचार केल्यास राहुल गांधींची सभा मविआच्या उमेदवारांना तारणार का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.


महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आता रंगात आली असून या निवडणूकीत महायुती वर्सेस महाविकास आघाडी अशी थेट लढत होत आहे. असे असले तरी काही मतदारसंघात बंडखोर, स्वतंत्र उमेदवारांसह वंचित, बसपा आदी छोट्या पक्षांचा जोरही दिसून येत आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. गोंदिया जिल्ह्याच्या राजकीय घडामोडींकडे लक्ष दिल्यास जिल्ह्यात गोंदिया, तिरोडा-गोरेगाव, अर्जुनी-मोरगाव व देवरी-आमगाव असे चार मतदारसंघ असून
या चारही मतदारसंघात युती-आघाडीचे उमेदवार परस्परांपुढे उभे ठाकले आहे.

यात महायुतीला अर्जुनी-मोरगावात भाजप जिल्हा उपाध्यक्ष रत्नदीप दहीवले व देवरी-आमगाव या मतदारसंघात आदिवासी नेते शंकर मडावी यांच्यामुळे बंडखोरीला सामोरे जावे लागले आहे. याचा परिणाम महायुतीच्या उमेदवारांना या निवडणुकीत जाणवणार आहे. मात्र, दुसरीकडे महाविकास आघाडीच्या गोटात पाहता गोंदिया सोडलं तर अर्जुनी-मोरगावात कॉंग्रेस तर्फे दिलीप बनसोड यांना तिकीट जाहीर झाल्यानंतर पार्सल उमेदवार दिल्याचा ठपका ठेवत अजय लांजेवार यांनी बंडखोरी करून निवडणूक लढवित आहेत, तर ऐन वेळेवर तिकीट कापण्यात आल्याने येथील विद्यमान आमदार मनोहर चंद्रिकापूरे यांचे चिरंजीव सुगत चंद्रिकापूरेही प्रहारच्या तिकीटावर आपले भाग्य आजमावत आहेत.

त्यामुळे या मतदारसंघात तिसरी आघाडी निर्माण झाली असून तगडे बंडखोर असल्याने येथे चौरंगी लढत होणार आहे. याचा थेट लाभ कुणाला मिळणार हे २३ नोव्हेंबर रोजी कळणार आहे. त्यातच देवरी-आमगाव मतदारसंघात कॉंग्रेसकडून विद्यमान आमदार सहेषराम कोरोटे यांना डावलत राजकारणात नवखे असलेले जिपचे उपमुकाअ राजकुमार पुराम यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे येथील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये कुठे तरी नाराजी खदखदत असल्याचे जाणवत आहे. दुसरीकडे तिरोडा-गोरेगाव मतदारसंघाची जागा आघाडीकडून कॉंग्रेसला सुटेल असे वाटत असताना शरद पवार गटाचे रविकांत बोपचे यांना जाहीर करण्यात आली. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात नाराजीचे सुर दिसून आले. दरम्यान, नाराज कार्यकर्त्यांची समजूत घालण्यात पक्षश्रेष्टींना यश आले असले तरी काहींची नाराजी दूर झालेली नसल्याचे चित्र त्यांच्या राहणीमानातून पुढे येत आहे.

दुसरीकडे गोंदिया मतदारसंघात काँग्रेस व भाजपमध्ये थेट लढत असून भाजपतर्फे विनोद अग्रवाल तर काँग्रेसकडून गोपालदास अग्रवाल रिंगणात आहेत. गेल्या निवडणुकीत गोपालदास अग्रवाल यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करत तिकीट मिळवली होती यावेळी विनोद अग्रवाल यांनी स्वतंत्र निवडणूक लढवत त्यांचा पराभव केला होता. त्यातच आता गोपालदास अग्रवाल यांनी कॉंग्रेस पक्षात घरवापसी करून निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे काही जुन्या कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांना स्विकारले का ? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. एकंदरीत संपूर्ण जिल्ह्याचा आढावा घेता महाविकास आघाडीपुढे अनेक अडथडे दिसून येत असून विजयाची माळ नेमकी कुणाच्या गळ्यात पडेल हे येत्या २३ नोव्हेंबर रोजी कळणार आहे.

spot_img
spot_img