केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उद्या गोंदिया जिल्ह्यात
◾️आमगाव व गोंदिया येथे जाहिर सभा
गोंदिया : केंद्रीय परिवहण मंत्री नितीन गडकरी ८ नोव्हेंबर रोजी गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून ते महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहिर सभा घेणार आहेत. यावेळी त्यांच्या सोबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल उपस्थित राहणार आहेत.
नियोजित दौर्यानुसार शुक्रवारी दुपारी १२ वाजता आमगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पटांगणवर उमेदवार संजय पुराम यांच्या प्रचारार्थ ते जाहिर सभेला संबोधीत करणार आहेत. त्यानंतर गोंदिया येथे दुपारी १.३० वाजता भाजप उमेदवार विनोद अग्रवाल यांच्या प्रचारार्थ स्वागत लॉनच्या पटांगणावर आयोजित सभेला संबोधीत करणार आहेत. सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.
००००००