हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

राहुल गांधींना आपल्या देशाबद्दल अभ्यास नाही ◾️ प्रफुल पटेल यांचा राहुल गांधींवर घनाघात

spot_img

🔴 LIVE TV 🔴

राहुल गांधींना आपल्या देशाबद्दल अभ्यास नाही

◾️ प्रफुल पटेल यांचा राहुल गांधींवर घनाघात

गोंदिया : राहुल गांधी जरी एका राष्ट्रीय पक्षाचे नेते आहेत, एका काळात राष्ट्रीय अध्यक्षही होते. तरीदेखील त्यांना भारत जोडो यात्रा काढावी लागत असेल तर त्यांना आपल्या देशाबद्दल अभ्यास नाही. असा घनाघात खा. प्रफुल पटेल यांनी राहुल गांधी यांच्यावर लगावला. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये डाव्या विचारांच्या संघटना सहभागी झाल्या होत्या असे एका इंग्रजी वृत्तपत्राच्या मुलाखतीत म्हटले होते. यावर बुधवारी (ता. ६) आयोजित पत्रकार परिषदेत खा. पटेल यांना विचारले असता ते बोलत होते.

प्रसंगी आम्हाला वाटते की आम्हाला अभ्यास आहे. तर आम्हालाच नाही तर काँग्रेसमध्येही असे अनेक नेते आहेत, ज्यांना देशाबद्दल संपूर्ण अभ्यास आहे. मात्र, ज्यांना अभ्यास नसतो त्यांनाच अशी यात्रा काढावी लागत असल्याचा टोलाही त्यांनी लावला. यावेळी त्यांच्यासोबत माजी आमदार राजेंद्र जैन उपस्थित होते. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीने महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार असलेल्या ५० पेक्षा अधिक मतदारसंघांसाठी राज्यस्तरीय आणि मतदारसंघनिहाय घोषणापत्र जाहीर करण्यात आले. या अनुषंगाने खा. प्रफुल्ल पटेल यांनी बुधवारी गोंदिया येथे घोषणापत्र सादर करत, मागील कार्यकाळात झालेल्या विकासकामांचा आढावा घेतला आणि आगामी काळातील वचनांची पूर्तता करण्याच्या दृष्टीने पत्रकार परिषदेतून घोषणापत्र जाहिर केले.

पुढे बोलताना खा. पटेल यांनी पक्षाने दिलेली मतदारसंघनिहाय घोषणापत्राची माहिती, तसेच महाराष्ट्रवादी हेल्पलाइनच्या माध्यमातून उमेदवारांची माहिती आणि मतदारसंघातील विकासकामांची माहिती मिळवण्याच्या प्रक्रियेचे मार्गदर्शन केले. व राष्ट्रवादी काँग्रेसच्या या घोषणापत्रामुळे गोंदिया-भंडारा लोकसभा क्षेत्रातील जनतेसमोर पक्षाची आगामी योजना आणि विकासविषयक धोरण स्पष्ट होणार असल्याचे खासदार पटेल यांनी सांगितले.
०००००००००००००

spot_img
spot_img