6 व 7 फेब्रुवरीला त्यागमूर्ती रमाई जन्मोत्सव ..आनंदराज आंबेडकर राहणार उपस्थित…विकास राजा यांचे सांस्कृतिक प्रबोधन
नागपुर – प्रियदर्शी सम्राट अशोक बहुउद्देशीय संस्था नागपुरच्या वतीने दिनांक 6 व 7 फेब्रूवारीला सम्राट अशोक क्रीडांगण, कुकडे लेआउट, नागपूर येथे त्यागमूर्ती रमाई जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला आनंदराज आंबेडकर प्रमुख पाहुणेउपस्थित राहतील. महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध भीम बुद्ध गीत प्रबोधनकार विकास राजा यांचा सांस्कृतिक प्रबोधन पर कार्यक्रम 6 जानेवारीला संध्याकाळी 6 वाजता होईल अशी माहिती अनिकेत कुतरमारे ,सिध्दांत पाटील,यांनी रविवारी रविभवन येथे आयोजित पत्रकार परिषद मध्ये दिली.
सामाजिक, शैक्षणिक संगठना प्रियदर्शि सम्राट अशोक बहुउद्देशीय संस्था तर्फे मागील १० वर्षांपासून सातत्याने त्यागमूर्ती रमाई जन्मोत्सव” चे आयोजन करण्यात येतो. यावर्षीसुध्दा सलग ११ व्या त्यागमूर्ती रमाई जन्मोत्सव या २ दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन दिनांक ०६ व ०७ फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता स्थळ कुकडे ले आउट स्थित सम्राट अशोक क्रिडांगण येथे करण्यात आलेले आहे.
कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी मंगळवार दिनांक ०६ फेब्रुवारी २०२४ रोजी रमाई तथा बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज यशवंत आंबेडकर हे प्रमुख अतिथी तथा मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच राष्ट्रीय प्रबोधनकार विकास राजा यांचा सांस्कृतिक प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. तत्पूर्वी स्विकृति गोडेस्वार या १० वर्षीय बालकलाकारातर्फे आई रमाई” हे एकपात्री नाटक सादर करण्यात येईल तसेच सेव्हींग फाउन्डेशन तर्फे स्वागत नृत्य प्रस्तुत केले जाईल. कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी बुधवार दिनांक ०७ फेब्रुवारी २०२४ रोजी पूज्यनीय भिक्कू संघाला चिवरदान केले जाईल, तसेच भव्य भोजनदान आयोजित करण्यात आले आहे.
जास्तितजास्त संख्येने लोकांनी उपस्थित राहावे अशे आवाहन संस्थेचे अध्यक्ष अनिकेत कुत्तरमारे यांनी केले आहे.
पत्रकार परिषदेला शुभम दामले, सिध्दार्थ बंसोड, प्रशिक वाहाणे, आदित्य सोनुले, वैशाली घुटके, लिना कांबळे, सिध्दांत पाटील,उपस्थित होते,