शी इज इंडिया” साजरा करत आहे नागपूरच्या मिसेस युनिव्हर्स इंडिया माधुरी पटले यांचा मिसेस युनिव्हशीर्स एम्पॉवर 2023 चा विजय
नागपूर– सामाजिक लेबलांच्या पलीकडे महिलांचे उल्लेखनीय सार साजरे करण्यासाठी समर्पित प्रीमियर प्लॅटफॉर्म- “शी इज इंडिया,” माधुरी पटले यांच्या विलक्षण कामगिरीची अभिमानाने घोषणा करते, ज्यांना मिसेस युनिव्हर्स एम्पॉवर 2023 आणि मिसेस युनिव्हर्स फेस 2023 हा पुरस्कार मिळाला आहे. फिलीपिन्समधील मनिला येथे झालेल्या मिसेस युनिव्हर्स स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या माधुरी पटलेसाठी या प्रतिष्ठित विजेतेपदाचा प्रवास अविश्वसनीय ठरला आहे.
रिचा सिंग यांनी 2016 मध्ये स्थापन केलेली, “शी इज इंडिया” ही भारतातील मिसेस युनिव्हर्सची स्थापना झाल्यापासून अधिकृत फ्रेंचायझी आहे. “ब्रेव्ह बोल्ड ब्यूटीफुल” या टॅगलाइनने प्लॅटफॉर्मचे चित्र उत्तम प्रकारे टिपले आहेत आणि ते स्त्रियांना त्यांच्या खऱ्या क्षमतेचा स्वीकार करण्यास सक्षम बनवत आहे. स्त्रीच्या भावविश्वाची बेलगाम शक्ती तिच्या सर्व वैभवात प्रदर्शित करण्याचे कार्य या माध्यमातून केले जात आहे. कौटुंबिक हिंसाचाराच्या विरोधात महिला सक्षमीकरण, शी इज इंडिया या थीमला स्पर्श करते, म्हणूनच, भारतीय महिलांना त्यांचे मत मांडण्यासाठी आणि निषिद्ध, रूढी आणि जुनाट विचारांच्या वेड्या तोडण्यासाठी एक व्यासपीठ सक्षम करून स्वतः ला सर्वोत्कृष्ट रित्या बाहेर आणण्याची संधी प्रदान करते.
जागतिक मंचावर भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नामवंत विजेत्यांच्या पावलावर पाऊल ठेवून माधुरी पटलेंनी यश संपादित केले आहे. या आजवरच्या विजेत्यांमध्ये यांचा समावेश आहे.
लक्ष्मी शेषाद्री (मिसेस युनिव्हर्स इंडिया 2016)
श्वेता अठवाल (मिसेस युनिव्हर्स इंडिया 2017)
डॉ. नेहा त्यागी (मिसेस युनिव्हर्स इंडिया 2018)
. दिव्या बरंगे (मिसेस युनिव्हर्स इंडिया 2019)
श्रुती कावेरी अस्पर (मिसेस युनिव्हर्स इंडिया 2021)
डॉ. स्वप्रा मिश्रा (क्लासिक युनिव्हर्स 2021) अदिती शर्मा (मिसेस युनिव्हर्स इंडिया 2022)
माधुरी पटले (मिसेस युनिव्हर्स इंडिया 2023)
फिलिपाइन्सच्या मनिला येथे झालेल्या मिसेस युनिव्हर्सच्या 46व्या एडिशन मध्ये मिसेस युनिव्हर्स इंडिया 2023 माधुरी पटले यांनी “मिसेस युनिव्हर्स – एम्पॉवर 2023” आणि “मिसेस युनिव्हर्स – फेस 2023” या 2 प्रतिष्ठित पुरस्कार चटकाविले आहे.
शी इज इंडियाच्या संस्थापक आणि संचालक ऋचा सिंग म्हणतात, “शी इज इंडिया” माधुरी पटलेचे तिच्या अतुलनीय यशाबद्दल अभिनंदन करते आणि आशा करते की ती परिवर्तनासाठी शक्तीचा आवाज बनून ती भारताचा वारसा सदैव जिवंत ठेवेल.
हे व्यासपीठ महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी आणि त्यांच्या अमर्याद क्षमतांचे प्रदर्शन करण्यासाठी त्यांना एक मंच प्रदान करण्यासाठी समर्पित आहे. माधुरी पटलेची यशोगाथा ही आपल्या प्रवासातील एक मैलाचा दगड आहे.
आपल्या विजयाबद्दल बोलताना माधुरी पटले म्हणाल्या, “शी इस इंडिया हे एक असे व्यासपीठ आहे ज्याने माझ्या आयुष्याला कलाटणी दिली आहे. जेव्हा मी मिसेस युनिव्हर्स इंडिया 2023 शी इज इंडिया द्वारे मुकुट पटकावला तेव्हा मला केवळ प्रसिद्धी मिळाली नाही तर सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची आयुष्यभराची संधी देखील मिळाली. शी इज इंडिया ब्रेव्ह, बोल्ड अँड ब्युटीफुल या थीमने मला समाजाप्रती असलेली माझी बांधिलकी दाखवण्यास सक्षम केले आणि माझ्या आयुष्यातील सर्वात मोठ्या ड्रीम प्रोजेक्टला मी आबाधा फाऊंडेशन असे नाव दिले. ”
पुढे पाहताना, “शी इज इंडिया” 2024 च्या आवृत्तीसाठी तयारी करत आहे, जे भारतातील सर्वात धाडसी आणि सुंदर महिलांचा अतुलनीय उत्सव असल्याचे वचन देते. वर्षाच्या पहिल्या सहामाहीत नियोजित होणारा हा आगामी कार्यक्रम “नेव्हर लाईक बिफोर ” असा अनुभव आहे जो जागतिक स्तरावर भारतीय महिलांच्या अविश्वसनीय क्षमतेवर प्रकाश टाकत राहील.
शी इज इंडिया ऑर्गनायझेशनबद्दल
रिचा सिंगने स्थापन केलेले, शी इज इंडिया हे अश्या प्रत्येक भारतीय स्त्रीसाठी एक व्यासपीठ आहे. जी जगाला सामाजिक टॅग्जच्या पलीकडे पाहू देण्याचा प्रयत्न करते किंवा त्यांचे ध्येय ठेवते. महिला हा आपल्या मानव जातीचा पाया आहे. हजारो वर्षांपासून, शेकडो संस्कृतींमध्ये आणि असंख्य विश्वासांमध्ये, पुरुषांनी स्त्रियांचा आदर केला आहे आणि त्यांची पूजा केली आहे. हिंदू पौराणिक कथांमधील मातृ निसर्ग, दुर्गा, काली किंवा शक्तीच्या रूपात किंवा अथेनाच्या रूपात, ग्रीक पौराणिक कथांमधील युद्धाची देवी किंवा पराक्रमी अमेझोनियन योद्धा ह्या महिलाच होत्या. जवळपास सर्वच प्रमुख संस्कृतींनी स्त्रियांभोवती कथा विणल्या आहेत आणि कवींनी त्यांच्या स्तुतीसाठी पाने रंगविली आहेत. झाशीची योद्धा राणी लक्ष्मीबाई यांच्या श्रद्धेपोटी प्रत्येक भारतीय खूब लडी मर्दानी वह तो झाशी बाली राणी थी म्हणत मोठा झाला आहे.
मात्र समाजाला अशा शक्तीशाली स्त्रियांचा विसर पडत आहे, आणि त्यांच्या कर्तृत्वाच्या रेषा पुसण्याचा प्रयत्न केला जात आहे. दैनंदिन जीवनात स्त्रियांचा समान आदर करणे काही लोकं विसरत चालले आहेत. शतकानुशतके सामान्य स्त्रीला त्यांच्या मूलभूत हक्कांसाठी झगडावे लागले आहे; मग तो त्यांचा शिक्षणाचा हक्क असो किंवा मतदानाचा हक्क असो किंवा जिवंत राहण्याचा मूलभूत हक्क का असेना. कौटुंबिक हिंसाचार हे आणखी एक रणांगण आहे जे खिया दररोज शांतपणे, अदृश्यपणे लढत आहेत आणि अजूनही त्यांची ही लढत सुरूच आहे.
कौटुंबिक हिंसाचाराच्या विरोधात महिला सक्षमीकरण, शी इज इंडिया या थीमला स्पर्श करते, म्हणूनच, भारतीय महिलांना त्यांचे मत मांडण्यासाठी आणि निषिद्ध, रूढी आणि जुनाट विचारांच्या बेड्या तोडण्यासाठी एक व्यासपीठ सक्षम करून स्वतः ला सर्वोत्कृष्ट रित्या बाहेर आणण्याची संधी प्रदान करते. महिलांचे प्रतिनिधित्व महत्त्वाचे असल्याने, प्लॅटफॉर्मचे ब्रीदवाक्य “शी इनदिड इज इंडिया” आहे. आणि प्रत्येक भारतीय खीला त्यांना जगामध्ये पहायचे असलेले बदल करण्याची संधी देण्यासाठी धाडसी पावले उचलली जातात.