छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय दो अभियान प्रारंभ.
नागपूर – सामाजिक न्यायाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा आंबेडकरी विचार मोर्चा च्या वतीने यशवंत स्टेडियम येथिल कार्यालयात सामाजिक न्याय दो अभियान प्रारंभ करण्यात आला असे आंविमो आणि आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा चे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी सांगितले आज कोल्हापूर येथे छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन करून आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा च्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण राज्यात अभियान राबविण्यात येणार आहे असा संकल्प केला त्यांचाच एक भाग म्हणून नागपूर येथे ही सदर उपक्रम राबविले जाणार आहे.
बागडे पुढे म्हणाले सत्तेचे उलट पालट झाले पंरतू सामाजिक प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासन उदासीन असल्याचे दिसून येते उदा.बेरोजगारांच्या कल्याणकारी योजना ठंडया बस्त्यात गुंडाळून ठेवले आहे.दादासाहेब गायकवाड स्वाभिमानी योजना, महात्मा फुले, अण्णा भाऊ साठे, वसंतराव नाईक, आदिवासी विकास महामंडळ, मौलाना अबुल कलाम आर्थिक महामंडळ शोभेचे हत्ती ठरलं आहे, निराधार योजना फोल ठरत आहे, महात्मा फुले आरोग्य योजनेची तारांबळ उडाली आहे, शासकीय राशन प्रणाली, हवेत तरंगत आहे, रमाई घरकुल योजना लालफितीत धुळखात आहे.
या सर्व योजना अंमलात आणण्यासाठी शासकीय कार्यालय चलो अभियान राबविण्यात येणार आहे असे ही बागडे म्हणाले, कार्यक्रमाचे अध्यक्ष राजु पांजरे हे होते तर प्रमुख उपस्थितीत सुप्रसिद्ध साहित्यिक तन्हा नागपूरी, आंविमो चे राष्ट्रीय संघटक देवेंद्र बागडे, विदर्भ सचिव प्रवीण आवळे, युवा मोर्चा चे प्रकाश कांबळे, धर्मा बौद्ध बागडे, दादाराव पाटील, कल्पना गोसावी, हे होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा रमेश दुपारे यांनी केले तर आभार के.टी.कांबळे यांनी केले.