थॅलेसीमिया आजाराबाबत प्रत्येकांनी जागृत असले पाहिजे….आनुवंशिक आणि रक्ताचा गंभीर आजार..! जिल्हा शल्यचिकित्सक डॉ अनिल रुडे यांचे मार्गदर्शन.
नागपूर / चक्रधर मेश्राम
थॅलेसीमिया काय आहे त्याचे लक्षण आणि उपचाराबद्दल जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
दरवर्षी 8 मे रोजी जगभरात जागतिक थॅलेसीमिया दिन साजरा केला जातो. हा एक आनुवंशिक रक्ताचा आजार आहे, जे आई वडीलां पासून मुलांना येतो. या आजाराचे लक्षण जवळपास 3 महिन्या नंतर कळून येतात. थॅलेसीमिया दिन साजरे करण्याचा मुख्य हेतू लोकांमध्ये रक्ताशी निगडित या गंभीर आजाराबद्दल जन जागृती करणे आहे.
आई वडिलांकडून वारसा मिळालेल्या या आजाराची एक विचित्रता आहे की , ह्या आजाराचे कारणं माहिती असून सुद्धा या पासून वाचता येणे अशक्य आहे. खेळण्याचा बागडण्याचा वयामध्ये लहान मुलांना दवाखान्यात रक्त पेढींच्या भोवती नेहमी फेऱ्या माराव्या लागतात. त्यांना सततचे आजारपण, कोमजलेला चेहरा, वजन कमी होणे, असे अनेक लक्षण मुलांमध्ये हा आजार झाल्यास दिसून येतात.
हा मुलांमध्ये जन्मापासूनच असतो. या आजारामध्ये बाळाच्या शरिरात रक्ताची कमी होऊ लागते. जेणे करून त्याला बाहेरून रक्त पुरवठा करावा लागतो. त्यामुळे शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता येते. वारंवार रक्त द्यावे लागल्यामुळे शरीरात जास्त प्रमाणात लोह तत्त्व जमा होतं जे पुढच्या आयुष्यात हृदयासाठी प्राणघातक ठरू शकते.
थॅलेसेमियाची लक्षणे माहिती असणे आवश्यक आहे जेणेकरून तातडीने उपाययोजना करणे सोयीचे होते.
सततचे आजारपण सर्दी, पडसं होणे.
अशक्तपणा आणि उदासीनता जाणवणे. वयानुसार शरीराची वाढ न होणे.अंग पिवळे होणे, दात जास्त बाहेर येणे.श्वास घ्यायला त्रास होणे. अतिसंक्रमण होणे
असे अनेक लक्षण दिसून येतात. थॅलेसीमिया पासून बचाव करण्यासाठी लग्नाच्या आधीच स्त्री आणि पुरुषाची संपूर्ण रक्ताची तपासणी करणे आवश्यक आहे.
गरोदरपणात सुद्धा तपासणी करून घ्यावी.
रुग्णाचे हिमोग्लोबिनचे स्तर 11 -12 राखण्याचे प्रयत्न करावे. वेळच्या वेळी औषधे घेणे आणि निदान पूर्ण करणे.
थॅलेसेमियाचे 2 प्रकार असतात. जन्म घेणाऱ्या बाळाच्या आई वडिलांचा जीन्स मध्ये किरकोळ (मायनर) थॅलेसीमिया असेल तर बाळाला जास्त प्रमाणाचे थॅलेसीमिया होऊ शकतो. जे जीवघेणे असू शकते. आणि बाळाच्या आई वडिलांमध्ये कोणाला एकालाच कमी प्रमाणाचे थॅलेसीमिया असल्यास बाळाच्या जीवाला काही धोका नसतो. यासाठी लग्नाच्या आधीच दोघांची चाचणी करणे गरजेचे आहे. थॅलेसीमिया आजारामागील काही तथ्ये आहेत.
थॅलेसीमिया या गंभीर आजारात भरपूर रक्त आणि औषधे लागतात. त्यासाठी भरपूर पैसे सुद्धा खर्च होतो. सगळेच या आजारांवर खर्च करू शकतात असे नाही. त्यामुळे पैसे अभावी उपचार मिळत नसल्याने वयोगट 12 ते 15 वर्षाची मुलं मरण पावतात आणि व्यवस्थित औषधोपचार मिळाल्यावर त्यांची जगण्याची प्रमाण जास्त असतात. या आजारामध्ये जसं जसं वय वाढते तसं तसं रक्ताची गरज जास्त भासू लागते. वेळच्या वेळीच योग्य ती काळजी घेऊन आपण या आजाराला ओळखणे चांगले आहे.
या साठी अस्थी मज्जा प्रत्यरोपण (बोन मॅरो ट्रान्सप्लान्टेशन) एक प्रकारची शल्य चिकित्सा असते ते करणे फायदेशीर असतं. पण हे फारच खर्चिक असते. जगभरात थॅलेसीमिया, सिकल सेल, सिकलथेल, हिमोफिलिया, या आजाराचे मुलं पैशाअभावी वयोगट 8 ते 10 वर्षांपेक्षा जास्त जगत नाही. लाल रक्तपेशींशी संबंधित असणारा गंभीर आजार आहे. यामध्ये लाल रक्तपेशींची झपाट्याने घट होते. थॅलेसेमिया झालेल्या रुग्णाच्या शरीरातील लाल रक्तपेशींचे आयुष्य केवळ 20 दिवस असते. अशा परिस्थितीत दर 20 ते 25 दिवसांनी या रुग्णांना बाहेरून रक्त द्यावे लागते. या आजारावर योग्य उपचार न केल्यास तो मृत्यूचे कारणही ठरू शकतो,
जागतिक थॅलेसेमिया दिन पहिल्यांदा 1994 मध्ये साजरा करण्यात आला. थॅलेसेमिया इंटरनॅशनल फेडरेशनचे अध्यक्ष आणि संस्थापक जॉर्ग एंग्लेजॉस यांनी या आजाराने ग्रस्त असलेल्या सर्व रुग्ण आणि त्यांच्या पालकांच्या सन्मानार्थ या दिवसाची सुरुवात केली. या आजाराबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा मुख्य उद्देश आहे.
जेव्हा जोडीदारांपैकी एकामध्ये दोषपूर्ण गुणसूत्र असतात, तेव्हा मुलाला किरकोळ थॅलेसेमिया होतो. मायनर थॅलेसेमियामध्ये रुग्ण सामान्य माणसांप्रमाणे जीवन जगू शकतो. पण जेव्हा पती-पत्नी दोघांच्या गुणसूत्रांमध्ये दोष असतो, तेव्हा त्या मुलाला मेजर थॅलेसेमिया होतो. अशा स्थितीत त्याला बाहेरून वारंवार रक्त घ्यावे लागते.
थॅलेसेमिया आजारात सतत अशक्तपणा जाणवणे, थकल्यासारखे वाटणे, ओटीपोटीत सूज येणे, गडद लघवीला होणे, त्वचेवर पिवळसर रंग येणे, त्याचबरोबर नखे, डोळे आणि जीभ फिकट होणे, मुलांची वाढ मंदावणे ही या आजाराशी संबंधित काही लक्षणं आहेत.
थॅलेसेमियावर बोन मॅरो ट्रान्सप्लांट हा एकमेव उपचार मानला जातो. परंतु हे दुर्दैव आहे की केवळ 20 ते 30 टक्के रुग्णांना त्यांच्या कुटुंबाकडून एचएलए आयडेंटिकल डोनर मिळू शकतो. 70 टक्के रुग्णांमध्ये रक्तगटाच्या अभावी उपचार होऊ शकत नाही. आता अशा वेळी त्यांना वेळोवेळी रक्त द्यावे लागते. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधोपचार तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.