सुपर नॅचरल थ्रीलरपट ‘ गडद अंधार ‘ ३ फेब्रुवारीला होणार रिलीज ..!मराठी चित्रपटांनी नेहमीच विविधांगी विषय सादर करत रसिकांचं होणार मनोरंजन .पत्रकार परिषद मध्ये दिली माहिती
नागपुर – आशयघन कथानकांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत मागील काही वर्षांपासून मराठी चित्रपट टेक्निकलीही सक्षम बनला आहे . याची प्रचिती वेळोवेळी जगभरातील मराठी रसिकांना आली आहे . ‘ गडद अंधार ‘ हा आगामी मराठी चित्रपट त्या पुढे एक पाऊल टाकणारा ठरला आहे .
आजवर मराठी चित्रपटांच्या पटलावर कधीही न दिसलेलं पाण्याखालचं जग गडद अंधार’मध्ये पहायला मिळणार आहे . बऱ्याच रहस्यांचा उलगडा करत एक थरारक अनुभव देणारा गडद अंधार ‘ हा सुपर नॅचरल श्रीलरपट ३ फेब्रुवारी २०२३ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे . निर्माते कॅप्टन अवधेश सिंग आणि वर्षा सिंग यांनी इलुला फिचर व्हिजन प्रा . लि.च्या बॅनरखाली ‘ गडद अंधार ‘ या चित्रपटाची निर्मिती केली आहे . मराठीत एक अनोखं धाडस करत दिग्दर्शक प्रज्ञेश रमेश कदम यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे . फर्स्ट लुक , टिझर आणि नुकत्याच रिलीज झालेल्या ट्रेलरमध्ये ‘ गडद अंधार’ची अचूक झलक प्रेक्षकांना पहायला मिळाली आहे .
मन मोहून टाकणारी पाण्याखालची सिनेमॅटोग्राफी हे या चित्रपटाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे . वरवर निळ्याशार दिसणाऱ्या समुद्राच्या खोल पाण्यात गडद अंधार आहे . या गडद अंधारात बरीच रहस्ये दडलेली आहेत . पाण्याखालच्या अंधारात दडलेलं एक रहस्य जेव्हा जमिनीवरील प्रकाशात येतं तेव्हा काय घडतं ते या चित्रपटात पहायला मिळणार आहे . ताल धरायला लावणारं गायक – संगीतकार रोहित श्याम राऊतचं संगीत या चित्रपटाची आणखी एक जमेची बाजू आहे . यातील ‘ दरिया , दरिया … ‘ हे गाणं चांगलंच गाजत आहे . ‘ गडद अंधार’चं कथानक आजवर कधीही प्रकाशात न आलेल्या पैलूंवर प्रकाशझोत टाकणारं असल्याचे संकेत ट्रेलर पाहिल्यावर मिळतात .
दिग्दर्शक प्रज्ञेश कदम यांनी या चित्रपटाच्या निमित्तानं प्रवाहापेक्षा काहीसं वेगळं दाखवण्याचा प्रयत्न केला असल्याचंही जाणवतं . या चित्रपटाचं लेखन प्रज्ञेश कदम यांनी लौकिक आणि चेतन मुळे यांच्या साथीनं केलं आहे . चित्रपटातील संवादही अतिशय मार्मिक असून विचार करायला लावणारे आहेत . ‘ बिग बॉस ‘ आणि ‘ एमटिव्ही स्प्लिट्सव्हीला एक्स ३ ‘ या रिअॅलिटी शोद्वारे महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेल्या जय दुधाणेला मोठ्या स्क्रीनवर पहाणं त्याच्या चाहत्यांसोबतच इतर सर्वसामान्य प्रेक्षकांसाठीही उत्सुकतेचं ठरणार आहे .
नायिकेच्या भूमिकेत आपला ठसा उमटवण्यात यशस्वी झालेल्या नेहा महाजन यात जयसोबत आहे . त्यामुळे दोघांची केमिस्ट्रीही रसिकांना आकर्षित करणारी ठरेल . थोडक्यात काय तर दर्जेदार निर्मितीमूल्ये , कसदार अभिनय , मुद्देसूद लेखन , कर्णमधूर गीत – संगीत , नेत्रदीपक कॅमेरावर्क , गतीमान संकलन आणि अफलातून दिग्दर्शनाचा उत्तम नमुना ‘ गडद अंधार’च्या रूपात प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे . जय – नेहाच्या जोडीला या चित्रपटात शुभांगी तांबळे , आकाश कुंभार , चेतन मुळे , आरती शिंदे , श्री , बालकलाकार अस्था आदी कलाकारही आहेत . रोहितच्या जोडीला जुईली जोगळेकर राऊत आणि दिव्य कुमार यांनीही गाणी गायली आहेत . आदिनाथ पातकर यांनी गाण्याचे संयोजन केले असून , प्रवीण वानखेडे यांनी कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी सांभाळली आहे . सुपर नॅचरल थ्रीलर ‘ गडद अंधार ३ फेब्रुवारी २०२३ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे .प्रेक्षाकाने अवश्य हा चित्रपट बघण्यास अवश्य जाल..!