ग्लोबल बुद्धिस्ट ॲम्बेसिडर अवॉर्डने वरिष्ठ पत्रकार शेखर गजभिये सन्मानित…आंबेडकरवादी पत्रकारांचा गगन मलिक यांच्या हस्ते पुरस्कार देवून केला सन्मान
नागपूर – WH न्यूज़ –
बुद्धिस्ट टुडे सोसायटी व्हिएतना, त्रिरत्न भूमी फाउंडेशन थायलंड, रॉयल मॉनेस्ट्री थायलंड यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल बुध्दीस्ट ॲम्बेसिडर अवॉर्ड-२०२२ हा पत्रकारिता सामाजिक राजकीय व धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विशिष्ट व्यक्तींना दिला जाणारा पुरस्कार नागपुरतील वरिष्ठ पत्रकार शेखर गजभिये जाहीर झाला.
गगन मलिक फाउंडेशनचे अध्यक्ष गगन मलिक यांच्या हस्ते बुधवारी रवी भवन येथे ग्लोबल बुद्धिस्ट ॲम्बेसिडर या पुरस्काराने शेखर गजभिये यांना सन्मानित करण्यात आले. यासह इतर 15 पत्रकारांना सन्मानित करण्यात आले.त्या मध्ये दैनिक भास्कर चे योगेश चिवंडे ,लोकमत समाचार योगेंद्र शंभरकर, लोकमत आंनद डेकाटे सकाळ केवल जीवनतारे,नीलेश डोये, नवराष्ट्र रवि गजभिये,प्रेम बागड़े, बहुजन सौरभ संध्या,लार्ड बुध्दाचे सचिन मून,राजुकर सह इतरही आंबेडकरवादी पत्रकारांना सन्मानित करण्यात आले.
शेखर गजभिये हे गेल्या अनेक वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांनी लोकमत, देशोन्नती, नवराष्ट्र, लोकशाही वार्ता, महाराष्ट्र टुडे, विदर्भ की बात अशा वृत्तपत्रात वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे सध्या ते बहुजन सौरभ या दैनिकात वरिष्ठ उपसंपादक म्हणून कार्यरत आहेत. सामाजिक क्षेत्रातील समस्यांना आपल्या लेखणीतून मांडत त्यांनी अनेक समस्यांना वाचा फोडली आहे. पत्रकारिता क्षेत्रात उत्कृष्ट कार्यासाठी त्यांना यापूर्वीही विविध संघटनांकडून सन्मानित करण्यात आलेले आहे.
बुधवारी रवी भवन येथे आयोजित पुरस्कार वितरण कार्यक्रमात गगन मलिक फौंडेशनचे अध्यक्ष गगन मलिक समन्वयक नितीन गजभिये, पी एस. खोब्रागडे, कोषाध्यक्ष स्मिता वाकडे, प्रवीण कांबळे, रवी सवयीतुल आदी मान्यवर उपस्थित होते.