औरंगाबाद पोलीसांनी दिला शेकडो अन्यायग्रस्तांना न्याय…! तिसऱ्या डोळ्यां’नी केले दीडशेवर गुन्हे उघड!

औरंगाबाद पोलीसांनी दिला शेकडो अन्यायग्रस्तांना न्याय…! तिसऱ्या डोळ्यां’नी केले दीडशेवर गुन्हे उघड!

मुंबई ,WH न्यूज़ –  औरंगाबाद या स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या माध्यमातून मास्टर सिस्टीम इंटीग्रेटर ( एमएसआय ) प्रकल्पांतर्गत शहरासह सेपसिटीसाठी जवळपासच्या परिसरात ७०० कॅमेरे बसविण्यात आले आहेत . या तिसऱ्या डोळ्यांमुळे आजवर तब्बल दीडशेच्या वर गंभीर गुन्हे उघडकीस आल्याची समाधानकारक बाब समोर आली आहे .

विशेष म्हणजे , उघडकीस आलेल्या गुन्ह्यांमध्ये सहा खुनांसह बेपत्ता झालेली पाच मुले , एक अत्याचार , वीस लाखांच्या बीएसएनएल केबल चोरीसह , मोटार अपघात , मंगळसूत्र चोरींसारख्या इतर तब्बल १५० गुन्ह्यांचा समावेश आहे . सदर प्रकल्पांतर्गत बसविलेल्या सातशे कॅमेऱ्यांचे पोलिस आयुक्तालयात कमांड कंट्रोल सेंटर ( सीसीसी ) आहे . ‘ तिसऱ्या डोळ्यांमुळे पोलिसांना गुन्हे उघड होण्यात मोलाची मदत झाली आहे . शहरात मंगळसुत्र चोरट्यांचा सुळसुळाट असून अशा गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यात सेफ सिटीचे कॅमेरे मैलाचे दगड ठरले आहेत . अशा गुन्ह्यातील १४ हून अधिक आरोपींना पकडण्यात औरंगाबाद पोलिसांना या कॅमेऱ्यामुळे बरेच मोठे यश मिळाले आहे . दररोज १५ ते १६ हजारांचा दंडविशेष म्हणजे सीसीटिव्ही मध्ये बसणारे पोलिस कर्मचारी गर्दीच्या ठिकाणी असलेल्या विना क्रमांकाच्या दुचाकी , इतर वाहनेही कॅमेऱ्याद्वारे झूम करुन पाहतात .

अनेकवेळा कर्मचारी चौकात हजर राहत नाहीत , अशा वेळी सीसीटीव्ही मध्ये आढळून आल्यास वरिष्ठांद्वारे तत्काळ संबंधित कर्मचाऱ्यास सूचना दिली जाते . त्यामुळे त्या..त्या चौकातील वाहतूक कर्मचाऱ्यां वरही आता तिसऱ्या डोळ्याने नजर ठेवली आहे . लाईव्ह सीसीटीव्ही बघून आतापर्यंत टळली गेलेली १५४ प्रकरणे शहरातील संवेदनशील ठिकाणे , धार्मिक स्थळे तसेच जवळपास १५ पुतळ्यांजवळ आखलेल्या रिंगणाच्या आत कोणीही प्रवेश केला तर त्याची नोंद सीसी टीव्हीमध्ये होऊन आक्षेपार्ह कृत्य केल्यास त्यावर कायदेशीर कारवाई करणे सोपे जाते . आजवर अशा १५४ प्रकरणात सीसीटीव्ही कॅमेरे लाईव्ह पाहून नियंत्रण कक्षाला कळविल्याने अनेक अनर्थ टळले आहेत .स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत बसविण्यात आलेल्या सिसिटिव्ही कॅमेऱ्याची औरंगाबाद शहर पोलिसांना फार मोठी मदत झाली. कॅमेऱ्यामुळे पोलिसांना माहिती काढण्यासाठी नेमण्यात आलेल्या खबऱ्यांवर अवलंबून राहाण्याची गरज पडली नाही. चोरट्यांना मोठ्या प्रमाणात धक्का बसला असल्याचे आकडेवारी वरुन स्पष्ट होते.

सिसिलिया मध्ये तिन सिफ्टमध्ये पोलीस उपनिरीक्षक, 21 अंमलदार, आणि 15 – 20 तंत्रज्ञही काम करीत आहेत. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सिसिटिव्ही कॅमेऱ्यात टिपलेल्या घटकांची माहिती संबधीतापर्यत पोहचविण्याचे काम सिसिसि केंद्र करीत आहे.

News By

  • WH NEWS is an independent digital news platform committed to factual, balanced, and public-interest journalism across Maharashtra. We provide structured reporting on political developments, civic issues, social matters, cultural events, and government updates. Our aim is to present verified information with neutrality, transparency, and professional ethics. All content is published strictly for informational purposes. Views expressed by interviewees are their personal opinions. WH NEWS respects the Constitution of India, the rule of law, and the authority of courts and public institutions. WH NEWS operates independently without external control. Any financial support received is strictly voluntary and accepted only as goodwill support for journalism. No demand, solicitation, pressure, or conditional benefit is ever involved. Contributions are used solely for reporting, production, and operational expenses and never influence editorial decisions.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

यह भी पढ़िए