महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त नागपूर महानगर भाजपातर्फे विनम्र अभिवादन
नागपूर WH NEWS : भारतीय समाजक्रांतीचे जनक आणि स्त्री शिक्षणाचे अग्रदूत महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आज नागपूर महानगर भारतीय जनता पार्टीच्या वतीने कॉटन मार्केट येथील महात्मा फुले बाजार परिसरात असलेल्या त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. नागपूर महानगर भाजप अध्यक्ष श्री. दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते मल्यार्पण करून हा सोहळा पार पडला.
या प्रसंगी बोलताना दयाशंकर तिवारी म्हणाले की, “महात्मा ज्योतिबा फुले यांनी महिला शिक्षणासाठी स्वतःच्या पत्नीला समोर आणून स्त्रियांमध्ये शिक्षणाची ज्योत पेटवण्याचे महान कार्य केले. समाजातील विद्वेष दूर करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर जनजागृती केली. ‘नाना वरण की गाय, एक वरण का दूध, तुम कायके ब्राम्हण हम कायके सूत’ या त्यांच्या प्रसिद्ध विचारातून त्यांनी समतेचा संदेश दिला. केवळ समाजसुधारणाच नव्हे, तर स्वातंत्र्यलढ्यातील गरीब सैनिकांना स्वखर्चाने जामीन मिळवून देऊन त्यांनी राष्ट्रकार्यातही मोठे योगदान दिले आहे.समाजसुधारणेसोबतच भारतीय स्वातंत्र्य आंदोलनात महत्त्वाची भूमिका महात्मा फुले यांनी बजावली”यावेळी भाजप प्रदेश सचिव अर्चनाताई डेहनकर, महामंत्री श्रीकांत आगलावे, नगरसेवक बंडूजी राऊत,नगरसेवक मनोज साबळे,नगरसेविका कल्पना शर्मा,तसेच अमोल कोल्हे, खेमराज दमाहे, श्रीकांत सायरे,राजेश हाथीबेड, राम मुंजे, राजू गाडगे व इतर अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
