वंचित बहुजन आघाडी ने महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात केली साजरी !
नागपूर | WH NEWS प्रतिनिधी
११ एप्रिल २०२६ रोजी महान समाजसुधारक महात्मा ज्योती फुले यांची जयंती वंचित बहुजन आघाडी, नागपूर शहर यांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमात उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महात्मा फुले यांच्या विचारांचे स्मरण करत सामाजिक समता, सर्वांसाठी शिक्षण आणि स्त्री-पुरुष समानतेचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प केला.
कार्यक्रमात प्रमुख पाहुणे व पदाधिकाऱ्यांनी आपल्या भाषणातून महात्मा फुले यांच्या कार्याचा गौरव करत आजच्या काळात त्यांच्या विचारांची गरज अधिक असल्याचे नमूद केले. समाजातील अन्याय, विषमता आणि शोषणाविरुद्ध लढण्यासाठी त्यांच्या विचारांची प्रेरणा घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच वंचित बहुजन आघाडी ही संघटना समाजातील वंचित व शोषित घटकांच्या हक्कांसाठी सातत्याने लढा देत राहील, अशी ग्वाही यावेळी देण्यात आली.
या कार्यक्रमाला नागपूर शहराध्यक्ष मंगेश वानखेडे, महासचिव राहुल दाईकर, ज्येष्ठ सल्लागार आनंद चौरे, मनोज सुटे, हरीश नारनवरे, कमलेश शेम्भरकर, उपाध्यक्ष किशोर भाऊ धोटे, किरण देवरे, सिद्धार्थ भांगे, हरिदास गवई, शशांक उगले, विनोद मोहोड, विजय गोंडुले, चांद मोहम्मद, शिशुपाल देशभरतार, संदेश धनविजय, युवक आघाडीचे अध्यक्ष (पूर्व नागपूर) आदित्य कापसे, कल्पेश चौहान, महिला आघाडीच्या अध्यक्षा वनमाला ताई उके, मधुमालती धोटे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमास मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिकांनी उपस्थित राहून महात्मा फुले यांना अभिवादन केले.
संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन वंचित बहुजन आघाडी, नागपूर शहर यांच्या वतीने करण्यात आले.
