पत्रकार विजय खवसे, मुकेश मोहन यांच्या वरील गुन्हे मागे घ्या… नागपुरात पत्रकारांनी केले आंदोलन!
नागपूर, 4 एप्रिल 2026:
संविधान चौक येथे आज आयोजित पत्रकार संरक्षण आंदोलनाला विविध संघटना आणि व्यक्तींनी जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. राकेश धारगावे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात पत्रकारांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारितेवर वाढते हल्ले, खोटे गुन्हे आणि दडपशाही यामुळे समाजात चिंता व्यक्त होत आहे. विशेषतः विजय खवसे आणि मुकेश मोहन यांच्यावरील कारवाईला अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आघात मानले जात असून, त्याविरोधात जे खोटे गुन्हे दाखल केले ते लवकर मागे घ्यावे या साठी आवाज उठवण्यात आला आहे.
विविध संघटनांनी आपल्या निवेदनातून स्पष्ट केले आहे की, पत्रकार संरक्षण कायदा कठोरपणे लागू करण्यात यावा, खोटे गुन्हे मागे घेण्यात यावेत आणि सत्य मांडणाऱ्या पत्रकारांना सुरक्षा देण्यात यावी. विजय खवसे यांच्यावरील दाखल केलेले गुन्हे पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी रागापोटी दाखल केले. तक्रारकर्ता व विजय खवसे यांच्या फोन से 8वर्षाचे सीडीआर काढावा कोण किती वेळा कोणासोबत बोलले यात अवैध धंदे वाले अज्जू कबाडी व पोलिसांचे सुद्धा सीडीआर तपासावा अशी मागणी आंदोलनात उठली आहे.
या मागण्या न्यायोचित असल्याचेही आंदोलनकर्त्यांनी नमूद केले.
आंदोलनात अनेक संघटना,कार्यकर्ते आणि नागरिक प्रत्यक्ष सहभागी झाले होते, “पत्रकार एकता जिंदाबाद”च्या घोषणा देत पत्रकारांच्या हक्कांसाठी एकजूट दाखवली आहे.
हे आंदोलन नागपूरमधील पत्रकारांच्या सुरक्षेसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.
राकेश धारगावे, नेहाल पाटील, धीरज गणेर यांनी धरणे आंदोलनाचे आयोजन केले.
