आयसीएसआय – नवीन उपक्रम, नागपूरमध्ये एकदिवसीय परिषद
नागपूर – आयसीएसआय नागपूर चॅप्टरतर्फे 20 मार्च 2026 रोजी नागपूरमध्ये एकदिवसीय परिषद आयोजित करण्यात येत आहे. या परिषदेचा विषय– एसएमई आयपीओ: संधी आणि कंपनी कायदा 2013 अंतर्गत महत्त्वाचे अनुपालन आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. विश्वास पाठक (स्वतंत्र संचालक, एमएसईबी होल्डिंग कंपनी लिमिटेड) उपस्थित राहणार आहेत. तसेच विशेष पाहुणे म्हणून श्री. संदीप कुमार साळुंखे (मुख्य आयकर आयुक्त, प्रशासन आणि टीपीएस नागपूर) सहभागी होणार आहेत. या परिषदेत एसएमई लिस्टिंगमधील संधी ओळखणे’ या विषयावर पॅनल चर्चा होईल. तसेच दोन टेक्निकल सत्रे घेण्यात येणार आहेत, ज्यामध्ये कंपनी कायद्याचे महत्त्वाचे मुद्दे आणि एसएमई आयपीओ यावर सविस्तर मार्गदर्शन दिले जाईल.
II. जागतिक क्षमता विकास कार्यक्रम
आयसीएसआयने परराष्ट्र मंत्रालय (MEA) सोबत मिळून भारतीय तांत्रिक व आर्थिक सहकार्य (ITEC) उपक्रमांतर्गत 12 दिवसांचा विशेष प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला. हा कार्यक्रम 14 ते 25 जानेवारी 2026 दरम्यान कोलकाता येथील सीसीजीआरटी मध्ये पार पडला. या कार्यक्रमाचा विषय– उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी कॉर्पोरेट गव्हर्नन्स, अनुपालन, जोखीम आणि शाश्वतता यांमध्ये नेत्यांना सक्षम करणे होता. या प्रशिक्षणाचा उद्देश बदलत्या कॉर्पोरेट गव्हर्नन्सबाबत सखोल माहिती देणे हा आहे. यामध्ये ईएसजी गव्हर्नन्स, सस्टेनेबिलिटी डिस्क्लोजर आणि जागतिक ग्लोबल रिस्क मॅनेजमेंट यासारख्या विषयांवर सत्रे घेण्यात आली. तसेच भारत सरकारच्या एमसीए21, डिजिटल इंडिया आणि व्यवसाय सुलभता (Ease of Doing Business) सारख्या महत्त्वाच्या योजनांची माहितीही देण्यात आली.
III. नवीन कार्यक्रम
कॅपॅसिटी बिल्डिंग सिरीज (क्षमता विकास सिरीज)
आयसीएसआयचा हा उपक्रम सदस्य आणि विद्यार्थ्यांचे ज्ञान व कौशल्य वाढवण्यासाठी सुरू करण्यात आला आहे. यामध्ये विविध विशेष वेबिनार्स घेतले जातील, ज्यामुळे सदस्य आणि विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव आणि व्यावसायिक कौशल्य वाढवता येईल.
प्रोफेशनल रीबूटवरील आयसीएसआय सर्टिफिकेट कोर्स (महिलांसाठी)
हा कोर्स त्या महिला कंपनी सेक्रेटरींसाठी आहे ज्यांनी काही काळासाठी करिअरमध्ये ब्रेक घेतला आहे. या कोर्समुळे त्यांना पुन्हा कामात येण्यासाठी आवश्यक कौशल्ये आणि मार्गदर्शन मिळेल.
सागरी नियमन आणि अनुपालन व्यवस्थापनातील 2 वर्षांचा फुल-टाइम एमबीए कोर्स
हा कोर्स आयसीएसआय आणि गुजरात मॅरिटाईम युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आला आहे. यामध्ये कंपनी सेक्रेटरी अभ्यासक्रमासोबत समुद्री कायदे आणि नियमांचा अभ्यास केला जाईल. यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळेल, कौशल्य वाढेल आणि समुद्री कायदे व शिपिंग क्षेत्रात नोकरीच्या संधी वाढतील.
कॉर्पोरेट आणि सिक्युरिटीज मार्केट कम्प्लायन्स (CSMC) सर्टिफिकेट कोर्स
हा एक वर्षाचा निवासी (रेसिडेन्शियल) कोर्स आहे, जो नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटीज मार्केट्स (NISM) सोबत तयार करण्यात आला आहे. या कोर्समध्ये आधुनिक आणि उत्तम अभ्यासक्रम, प्रॅक्टिकल पद्धतीने शिकवणे आणि इंडस्ट्री इंटर्नशिपचा समावेश आहे.
आयसीएसआय सर्टिफिकेट कोर्स – यूएई बिझनेस मॅनेजर
हा कोर्स संयुक्त अरब अमिराती (यूएई) मध्ये काम करू इच्छिणाऱ्या व्यावसायिकांना आवश्यक ज्ञान आणि कौशल्ये देण्यासाठी तयार करण्यात आला आहे. यामध्ये यूएई मधील व्यवसाय वातावरण, कायदे आणि तेथील कामकाजाच्या पद्धती याबद्दल माहिती दिली जाते.
IV. विद्यार्थी आणि सदस्यांसाठी उपक्रम
थेट प्रवेशची सुविधा
मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना थेट कंपनी सेक्रेटरी एक्झिक्युटिव्ह प्रोग्राम मध्ये प्रवेश घेता येतो. तसेच आयसीएसआयने एक्झिक्युटिव्ह आणि प्रोफेशनल प्रोग्रामच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन शंका निरसन वर्ग सुरू केले आहेत.
आयसीएसआय स्टुअर्डशिप मार्गदर्शक तत्त्वे (आयजीपीएस)
हा एक नवीन आणि विशेष प्रकारचा मार्गदर्शक फ्रेमवर्क आहे, जो जागतिक ट्रेंडनुसार तयार करण्यात आला आहे. हे संस्थात्मक गुंतवणूकदार आणि सेवा पुरवठादारांना जबाबदार आणि शाश्वत गुंतवणुकीबाबत मार्गदर्शन करते. या तत्त्वांमध्ये पर्यावरणीय, सामाजिक आणि प्रशासन या घटकांचा समावेश आहे. आयजीपीएसला आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण (आयएफएससीए) कडून मान्यता मिळाली असून गुंतवणूक करणाऱ्या संस्थांना याचा अवलंब करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते.
आयसीएसआय हवामान बदल गव्हर्नन्सवरील तत्त्वे (IPCG)
आयसीएसआयने यावर्षी हवामान बदल गव्हर्नन्ससाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे (IPCG) सादर केली आहेत. या तत्त्वांचा उद्देश हवामान बदलाशी संबंधित माहिती अधिक पारदर्शकपणे सादर करणे हा आहे. हे तत्त्वे संस्थांना मार्गदर्शन करण्यासाठी तयार केलेले आहेत आणि त्यात सस्टेनेबिलिटी कामगिरी मोजण्यासाठी मापदंड ठरवणे आणि हवामान उद्दिष्टांकडे प्रगती साध्य करण्यासाठी लक्ष्य ठरवणे यासारखी मार्गदर्शने दिली आहेत.
ईएसजी वर स्टेकहोल्डर एंगेजमेंट टूलकिट
आयसीएसआयने आयजीपीएसचा पूरक म्हणून ईएसजी वर स्टेकहोल्डर एंगेजमेंट टूलकिट सादर केले आहे.
हा टूलकिट कंपनी सेक्रेटरी आणि बोर्ड्सना कंपन्यांसाठी संपूर्ण ईएसजी धोरण तयार करण्यास मदत करतो आवश्यक साधने उपलब्ध करून देतो.
कामाच्या ठिकाणी PoSH साठी गव्हर्नन्स आणि कम्प्लायन्स स्टँडर्ड
आयसीएसआयने हा स्टँडर्ड तयार केला आहे, ज्यामुळे इंटरनल कमिटीच्या बैठका, तक्रार आणि चौकशी प्रक्रिया, तसेच कर्मचारी/इंटरनल कमिटी मेंबर्ससाठी प्रशिक्षण व कौशल्य वाढीचे कार्यक्रम सुसंगत पद्धतीने पार पाडता येतात. हा स्टँडर्ड लैंगिक तटस्थ PoSH धोरण तयार करण्यासाठी मार्गदर्शन करतो आणि समावेशिता वाढवतो.
आयसीएसआय आंतरराष्ट्रीय एडीआर केंद्र
या केंद्राची स्थापना न्यायालयातील प्रकरणे कमी करण्यासाठी आणि जलद न्याय मिळवून देण्यासाठी करण्यात आली आहे.
आयसीएसआय स्टार्टअप आणि एमएसएमई कॅटॅलिस्ट
हा उपक्रम आयसीएसआय सदस्यांना एमएसएमई आणि स्टार्टअप्सना मार्गदर्शन करण्यासाठी आवश्यक कौशल्ये आणि ज्ञान प्रदान करतो.
आयसीएसआय सोशल ऑडिटर्स इन्स्टिट्यूट
ही सेक्शन 8 अंतर्गत नोंदणीकृत कंपनी आहे जी भारतातील सामाजिक लेखापरीक्षण आणि सामाजिक गव्हर्नन्सच्या प्रभाव मूल्यांकनाला बळकट करते. आयसीएसआय- आयएसए सामाजिक लेखापरीक्षण मानके विकसित करेल, सामाजिक लेखापरीक्षकांची नोंदणी करेल, व्यावसायिक आचारसंहितेसाठी मानके ठरवेल आणि एनआयएसएम सोबत सहयोग करून सोशल ऑडिट कोर्सेस चालवेल.
आयसीएसआय सोशल ऑडिट मानके
ही मानके आयसीएसआयने तयार केली असून त्यात SEBI (ICDR) नियम 2018, नियम 292E(2)(a) अंतर्गत नमूद केलेल्या 16 उपक्रमांचा समावेश आहे. कोणत्याही सामाजिक उपक्रमाच्या 16 क्रियाकलापांमध्ये सामाजिक लेखापरीक्षण कसे करावे यावर मार्गदर्शन करणे हा या मानकांचा उद्देश आहे.
नोंदणीकृत मूल्यांकनकर्ता टूलकिट
आयसीएसआय आरव्हीओ द्वारे प्रकाशित हा टूलकिट, नवे आणि अनुभवी नोंदणीकृत मूल्यांकनकर्त्यांना आवश्यक ज्ञान, नियमावली, व्यावहारिक साधने आणि नैतिक मार्गदर्शन देतो, जेणेकरून ते मूल्यांकन कार्य प्रभावीपणे पार पाडू शकतील.
पीसीएससाठी आयएजीईएस अंतर्गत संधी
आयसीएसआयने इंडियन असोसिएशन फॉर गोल्ड एक्सलन्स अँड स्टँडर्ड्स (IAGES) सोबत सहकार्य करण्यासाठी एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे, ज्यामुळे पीसीएस कंपन्याना विशेष संधी मिळतात आणि त्यांना आयएजीईएस मान्यता मानकांची अंमलबजावणी करण्यामध्ये मुख्य मार्गदर्शक म्हणून स्थान मिळते.
V. मान्यता (Recognitions)
आयसीएसआय ला खालील कायदे व नियमांमध्ये मान्यता मिळाली आहे:
• कंपनी कायदा, २०१३
• सेबी(एलओडीआर) नियमावली, २०१५
• सेबी(गैर-परिवर्तनीय सिक्युरिटीजची निर्गम आणि लिस्टिंग) नियमावली, २०२१
• आयएफएससीए (सिक्युरिटीजची निर्गम आणि लिस्टिंग) नियमावली, २०२१
• पीएनजीआरबी (गॅस एक्सचेंज) नियमावली, २०२०
• आयआरडीए (भारतीय विमा कंपन्यांची नोंदणी) नियमावली, २०००
• लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन सामान्य नियमावली, २०२१
VI. जागतिक उपस्थिती
आयसीएसआय ओव्हरसिज सेंटर्स
आयसीएसआयचा दृष्टीकोन “चांगल्या कॉर्पोरेट गव्हर्नन्सला प्रोत्साहन देणारे जागतिक नेतृत्व मिळवणे” आहे. आयसीएसआयचे ध्येय “चांगल्या कॉर्पोरेट गव्हर्नन्ससाठी उच्च दर्जाचे व्यावसायिक विकसित करणे” यासाठी आयसीएसआयने आंतरराष्ट्रीय पातळीवर पाऊल ठेवले असून ऑस्ट्रेलिया, कॅनडा, सिंगापूर, युएई, युके आणि युएसए मध्ये आयसीएसआय ओव्हरसिज सेंटर्स स्थापन केले आहेत.
आयसीएसआय आणि सेवा निर्यात प्रोत्साहन परिषद (SEPC) यांच्यात सामंजस्य करार
हा करार आयसीएसआय सदस्यांसाठी खास प्रशिक्षण कार्यक्रम उपलब्ध करून देईल आणि त्यांना जागतिक बाजारपेठेत प्रवेश मिळवून देईल.यामुळे संयुक्त संशोधन, साधनांची देवाणघेवाण आणि आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये सहकार्य करण्यास मदत होईल.
अकॅडमिक सहकार्य
आंतरराष्ट्रीय कॉमर्स ऑलिंपियाड आणि आयसीएसआय कॉमर्स ऑलिंपियाड
आयसीएसआयने सायन्स ऑलिम्पियाड फाउंडेशन (एसओएफ), हमिंग बर्ड एज्युकेशन लिमिटेड, इंटरनॅशनल ऑलिम्पियाड फाउंडेशन आणि सिल्व्हर झोन फाउंडेशनसोबत सामंजस्य करारावर (एमओयू) स्वाक्षरी केली आहे. याअंतर्गत संपूर्ण भारतातील शाळांमध्ये ऑलिंपियाड्स आयोजित केले जातील आणि शालेय विद्यार्थ्यांमध्ये कंपनी सेक्रेटरी कोर्स आणि व्यावसायिक क्षेत्राबाबत जागरूकता वाढवली जाईल.
आयसीएसआय अकॅडमिक कनेक्ट
आयसीएसआयने अकॅडमिक कनेक्ट उपक्रम सुरू केला आहे. यामध्ये विविध आयआयएम, आयआयटी (जसे की आयआयटी मद्रास – ‘स्वयम प्लस प्लॅटफॉर्मवर कौशल्य आधारित कोर्ससाठी), नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी आणि इतर राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित संस्था यांच्यासोबत सहकार्य केले जाईल. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थी, शिक्षक आणि व्यावसायिक यांचे ज्ञान वाढवणे आणि कौशल्ये विकसित करणे हा आहे.
VIII. आयसीएसआय सामाजिक उपक्रम
शुल्क माफी
• भारतीय लष्कर, अर्धसैनिक दल, अग्निवीर, शहीदांचे कुटुंबीय आणि भारतीय लष्कर/अर्धसैनिक दलाचे विद्यार्थी जे सीएस एक्झिक्युटिव्ह प्रोग्रॅम मध्ये नोंदणी करतात, त्यांना शुल्क माफ.
• जम्मू-काश्मीर आणि लडाखमधील विद्यार्थी जे सीएसईईटी आणि सीएस एक्झिक्युटिव्ह प्रोग्रॅममध्ये नोंदणी करतात, त्यांना शुल्क माफ.
• शैक्षणिक निधी (स्टुडंट्स एज्युकेशन फंड ट्रस्ट) अंतर्गत गुणवंत आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी शुल्क माफ.
शुल्क सवलत
• अनुसूचित जाती/जमाती आणि शारीरिकदृष्ट्या अपंग विद्यार्थ्यांसाठी.
• अंदमान आणि निकोबार, लक्षद्वीप, राज्ये आणि हिमाचल प्रदेशमधील विद्यार्थी जे सीएसईईटी आणि सीएस एक्झिक्युटिव्ह प्रोग्रॅममध्ये नोंदणी करतात, त्यांना सवलत.
• कॅनरा बँकेकडून विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्जाची सुविधा.
प्रीती कौशिक बॅनर्जी
जॉइन सेक्रेटरी
आयसीएसआय
दूरध्वनी: 011-4534 1022
ईमेल: preeti.banerjee@icsi.edu
आयसीएसआय बद्दल
इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (आयसीएसआय) ही कंपनी सेक्रेटरीज कायदा, 1980 अंतर्गत संसदेने स्थापित केलेली एक प्रमुख व्यावसायिक संस्था आहे. भारतातील कंपनी सेक्रेटरी व्यवसायाचे नियमन करणे आणि त्याचा विकास करणे हा संस्थेचा उद्देश आहे. आयसीएसआय भारतीय कंपनी मंत्रालयाच्या अधिकाराखाली काम करते. संस्थेचा दृष्टिकोन सक्रिय आहे, कंपनी सेक्रेटरी अभ्यासक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण आणि सदस्यांसाठी चांगले व्यावसायिक मानक सुनिश्चित करणे हा आहे. संस्थेमध्ये सध्या 78000 पेक्षा जास्त सदस्य आणि सुमारे 2.5 लाख विद्यार्थी नोंदणीकृत आहेत.
