रेल्वेत नागपूरच्या महिला खेळाडूंची छेडछाड; भाजयुमो आक्रमक, रेल्वे प्रशासनाला दिले निवेदन

 

रेल्वेत नागपूरच्या महिला खेळाडूंची छेडछाड; भाजयुमो आक्रमक, रेल्वे प्रशासनाला दिले निवेदन

​नागपूर: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या महिला कराटे संघातील खेळाडू मुलींसोबत ‘फलकनुमा एक्स्प्रेस’मध्ये झालेली छेडछाड आणि अश्लील वर्तनाची घटना अत्यंत निंदनीय असून, या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी आज भारतीय जनता युवा मोर्चा नागपूरतर्फे विभागीय रेल्वे व्यवस्थापक (DRM) यांना निवेदन देण्यात आले.

भारतीय जनता पार्टीचे नागपूर शहर अध्यक्ष मा. दयाशंकर तिवारी यांच्या सूचनेनुसार आणि युवा मोर्चाचे अध्यक्ष सचिन करारे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने रेल्वे प्रशासनाची भेट घेऊन आपला तीव्र निषेध नोंदवला.
​ओडिशामधील बालासोर येथे होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी नागपूर विद्यापीठाचा १०-१२ मुलींचा संघ रवाना झाला असताना, रविवारी सकाळी भुवनेश्वरहून फलकनुमा एक्स्प्रेसमध्ये (गाडी क्र. १२७०४) ही धक्कादायक घटना घडली. विद्यापीठ प्रशासनाच्या नियोजनाअभावी प्रशिक्षक दुसऱ्या बोगीत होते आणि खेळाडू मुली वेगवेगळ्या डब्यांमध्ये विखुरलेल्या होत्या. याच संधीचा फायदा घेत काही उनाड तरुणांच्या टोळक्याने या खेळाडू मुलींची छेड काढली, त्यांच्यावर अत्यंत अश्लाघ्य भाषेत शेरेबाजी केली आणि अश्लील वर्तन केले.

अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत या मुलींनी स्वतःच्या संरक्षणासाठी व्हिडिओ बनवून आपल्या पालकांना पाठवला, तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. ही घटना रेल्वेतील महिला सुरक्षेच्या चिंधड्या उडवणारी आहे.​या निवेदनाद्वारे भारतीय जनता युवा मोर्चाने प्रामुख्याने चार मागण्या मांडल्या आहेत. ज्या तरुणांनी धावत्या रेल्वेत मुलींवर शेरेबाजी केली, त्यांच्यावर कठोर कलमान्वये गुन्हा दाखल करून त्यांना अद्दल घडेल अशी शिक्षा व्हावी. तसेच, पालकांनी केलेल्या आरोपानुसार आरपीएफला माहिती देऊनही त्यांनी त्वरित प्रतिसाद दिला नाही, या निष्काळजीपणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी रेल्वे सुरक्षा कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी. याशिवाय, राष्ट्रीय किंवा राज्य स्तरावरील संघ प्रवासाला निघताना रेल्वे प्रशासनाने त्यांच्या डब्यांमध्ये विशेष सुरक्षा पुरवणे आवश्यक आहे आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये कायमस्वरूपी पोलीस गस्त वाढवण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.निवेदन देतांना रितेश पांडे ,रिशभ अरखेल, विक्की पांडे, उदय मिश्रा अक्षय शर्मा ,अथर्व त्रिवेदी, सुमित पडोळे,येजाज शेख,तुषार ठाकरे, प्रवीण श्रीवास,जय साजवानी ,आशिष तिवारी, युवती प्रमुख प्रशंशा भोयर,श्रदा डवले,मीनल गेहलोत,पल्लवी गिल्लोरे चोरसिया ,अमन गुप्ता ,दीपक पांडे ,सोमेश गोर, निलेश भिवसनकर ,मनीष वर्मा व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

​”भारतीय जनता युवा मोर्चा या प्रकरणाचा शेवटपर्यंत पाठपुरावा करेल. जर या प्रकरणातील दोषींवर आणि कामात हलगर्जी करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई झाली नाही, तर प्रशासनाविरुद्ध तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशारा युवा मोर्चाचे अध्यक्ष सचिन करारे यांनी यावेळी दिला.

News By

  • WH NEWS is an independent digital news platform committed to factual, balanced, and public-interest journalism across Maharashtra. We provide structured reporting on political developments, civic issues, social matters, cultural events, and government updates. Our aim is to present verified information with neutrality, transparency, and professional ethics. All content is published strictly for informational purposes. Views expressed by interviewees are their personal opinions. WH NEWS respects the Constitution of India, the rule of law, and the authority of courts and public institutions. WH NEWS operates independently without external control. Any financial support received is strictly voluntary and accepted only as goodwill support for journalism. No demand, solicitation, pressure, or conditional benefit is ever involved. Contributions are used solely for reporting, production, and operational expenses and never influence editorial decisions.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

यह भी पढ़िए