नागपुरात महिलेकडून मारहाण व धमकीची तक्रार;आरोपी मालपाणी विरुद्ध कोतवालीत गुन्हा दाखल!

नागपुरात महिलेकडून मारहाण व धमकीची तक्रार;आरोपी मालपाणी विरुद्ध कोतवालीत गुन्हा दाखल!
नागपूर WH NEWS : शहरातील एका महिलेकडून मारहाण व धमकी दिल्याची तक्रार दाखल करण्यात आली असून या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 अंतर्गत तहसील पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंदवला आहे.
तक्रारदार महिलेने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विजय मालपाणी या व्यक्तीसोबत आर्थिक व्यवहाराच्या कारणावरून वाद निर्माण झाला होता. याच वादातून संबंधित व्यक्तीने महिलेच्या घरी येऊन शिवीगाळ,मारण्याची धमकी देणे तसेच मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

महिलेच्या तक्रारीनुसार, काही वर्षांपूर्वी तिची ओळख विजय सोबत झाली ओळखीचा फायदा घेत त्याने आर्थिक गरजेच्या वेळी आरोपीने बँकेकडून कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली काही व्यवहार केले होते. त्यानंतर पैशांच्या मागणीवरून दोघांमध्ये वाद निर्माण झाला. तक्रारदाराने असा आरोप केला आहे की, या वादाच्या पार्श्वभूमीवर आरोपीने तिच्या घरी येऊन हात पकडणे, शिवीगाळ करणे व मारण्याची धमकी देणे अशा प्रकारची वर्तणूक केली.
या घटनेनंतर पीडित महिलेने पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी प्राथमिक चौकशी करून भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 अंतर्गत कलम 74, 79 आणि 351(2) अन्वये गुन्हा नोंदवला असल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. फिर्यादी महिलेने दिलेल्या माहिती अनुसार आरोपी विजय मालपाणी अजूनही तिला त्रास देत असल्याचे तिने सांगितले. त्या दिशेने पोलिसांनी चौकशी करण्याची गरज आहे.

News By

  • WH NEWS is an independent digital news platform committed to factual, balanced, and public-interest journalism across Maharashtra. We provide structured reporting on political developments, civic issues, social matters, cultural events, and government updates. Our aim is to present verified information with neutrality, transparency, and professional ethics. All content is published strictly for informational purposes. Views expressed by interviewees are their personal opinions. WH NEWS respects the Constitution of India, the rule of law, and the authority of courts and public institutions. WH NEWS operates independently without external control. Any financial support received is strictly voluntary and accepted only as goodwill support for journalism. No demand, solicitation, pressure, or conditional benefit is ever involved. Contributions are used solely for reporting, production, and operational expenses and never influence editorial decisions.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

यह भी पढ़िए