बुद्धांनी अडीच हजार वर्षांपूर्वीच महिलांना समान हक्क दिला:नयन मोंढे -जागतिक महिला दिनानिमित्त 378 वी रविवारची बुद्ध वंदना उत्साहात

 

बुद्धांनी अडीच हजार वर्षांपूर्वीच महिलांना समान हक्क दिला:नयन मोंढे

-जागतिक महिला दिनानिमित्त 378 वी रविवारची बुद्ध वंदना 

अमरावती WH NEWS (प्रतिनिधी ) :
जगाला स्त्री-पुरुष समानतेचा संदेश देण्याचे महान कार्य अडीच हजार वर्षांपूर्वीच तथागत भगवान गौतम बुद्ध यांनी केले. त्यांनी महिलांना भिक्खू संघात स्थान देऊन स्त्रीला धर्म, समाज आणि विचारांच्या क्षेत्रात समान हक्क दिले. त्यामुळे महिलांना भिक्खू संघात प्रवेश मिळालेला तोच दिवस खऱ्या अर्थाने महिला दिन असल्याचे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे सचिव नयन मोंढे यांनी केले.

जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित भारतीय बौद्ध महासभेची रविवारची बुद्ध वंदना कार्यक्रमात बोलत होते. अमरावती बडनेरा शाखेच्या वतीने गणपती नगर, येथील विश्वरत्न आंबेडकर वाचनालय येथे रविवारची 378 वी बुद्ध वंदना पार पडली. जिल्हा पर्यटन व प्रचार सचिव नयन मोंढे यांनी महिलांचे अधिकार व सद्यस्थिती या विषयावर बौद्ध उपासक उपासिकांना धम्मदेशना दिली. जिल्हाध्यक्ष प्रा. प्रकाश बोरकर यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी मोंढे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की, समाजाची प्रगती ही त्या समाजातील महिलांनी केलेल्या प्रगतीवरून मोजता येते. या विचारातूनच महिलांच्या शिक्षण, स्वातंत्र्य आणि अधिकारासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या भारतीय संविधानामुळे आज महिलांना समान हक्क मिळाले असून त्या राष्ट्रपती, प्रधानमंत्री यांसारख्या सर्वोच्च पदांवरही विराजमान झाल्या आहेत. ही बाब भारतीय लोकशाहीची आणि संविधानाची मोठी ताकद असल्याचे त्यांनी नमूद केले.महिलांनी शिक्षण, सामाजिक भान आणि संघटनाच्या बळावर पुढे येत समाज परिवर्तनाच्या चळवळीत सक्रिय भूमिका बजावावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

कार्यक्रमात उपस्थित महिलांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी मालती मेश्राम, बौद्धाचार्य पी झेड ठवरे गुरुजी, खुशाल सांबारे, राहुल शेंडे, विलास नागदिवे, अरुण शेंडे, देवानंद बडगे, किशोर खोब्रागडे, अशोक तायडे, श्रीराम मोहोळ, विजय बागडे, गोपाल लांजेवार, बंडू मेश्राम, मंदा वासनिक, माया बोरकर, वर्षा वाकोडे, कुंदा वासनिक, स्वाती लांजेवार, ज्योती बेले, धर्मपाल डोंगरे,प्रवीण खंडारे, पंजाब गेडाम, अश्वदीप खंडारे, कैलास ढोके, सुरेश दहाटे,अरुण मेश्राम, मदन खंडारे,आर आर राऊत, शशिकला सोनवणे, मुकुंद मेश्राम, सुरेखा मेश्राम, भावना मेश्राम, अशोक उके यांच्यासह भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, गणपती नगर येथील बौद्ध उपासक, उपासिका बहुसंख्येने उपस्थित होत्या.

News By

  • WH NEWS is an independent digital news platform committed to factual, balanced, and public-interest journalism across Maharashtra. We provide structured reporting on political developments, civic issues, social matters, cultural events, and government updates. Our aim is to present verified information with neutrality, transparency, and professional ethics. All content is published strictly for informational purposes. Views expressed by interviewees are their personal opinions. WH NEWS respects the Constitution of India, the rule of law, and the authority of courts and public institutions. WH NEWS operates independently without external control. Any financial support received is strictly voluntary and accepted only as goodwill support for journalism. No demand, solicitation, pressure, or conditional benefit is ever involved. Contributions are used solely for reporting, production, and operational expenses and never influence editorial decisions.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

यह भी पढ़िए