पश्चिम नागपूर भाजपच्या दोन दिवसीय ‘दीनदयाल महाप्रशिक्षण’ वर्गाचा पारडसिंगा येथे समारोप

 

पश्चिम नागपूर भाजपच्या दोन दिवसीय ‘दीनदयाल महाप्रशिक्षण’ वर्गाचा पारडसिंगा येथे समारोप

​नागपूर/पारडसिंगा: भारतीय जनता पार्टीच्या वतीने संपूर्ण भारतात कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षणासाठी राबविण्यात येत असलेल्या विशेष अभियानांतर्गत, महाराष्ट्र प्रदेशच्या सूचनेनुसार पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्रातील तीनही मंडळांच्या दोन दिवसीय ‘दीनदयाल महाप्रशिक्षण’ वर्गाचा नुकताच पारडसिंगा येथे समारोप झाला. काटोल रोडवरील माता अनुसया मंदिर प्रांगणात आयोजित हे दोन दिवसीय शिबिर पूर्णतः निवासी स्वरूपाचे होते. या प्रशिक्षणाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलनाने करण्यात आले.

उदघाटन सत्राला प्रमुख म्हणून शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी,राज्यसभा खासदार मायाताई ईवनाते,श्रीकांत देशपांडे, शहर महामंत्री श्रीकांत आगलावे व रितेश गावंडे याची उपस्थिती होती.नवनिर्वाचित राज्यसभा खासदार मायाताई ईवनाते यांची पूर्ण वेळ वर्गात उपस्थिती होती.महाप्रशिक्षण वर्गाची माहिती व उपयुक्तता या संदर्भातील प्रस्तावना महानगर संयोजक संदीप जाधव यांनी मांडली. प्रशिक्षणादरम्यान कार्यकर्त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने प्रशिक्षित करण्यासाठी पॉवर पॉईंट प्रेझेन्टेशनचा (PPT) प्रभावी वापर करण्यात आला. यात प्रामुख्याने वैचारिक अधिष्ठान, भाजपचा इतिहास व विकास, बूथ व्यवस्थापन, ‘मन की बात’ कार्यक्रम, कार्यकर्त्यांची कार्यपद्धती, सोशल मीडिया, नमो ॲप, सरल ॲप, एआय (AI), कार्य विस्तार आणि केंद्र व राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजनांची कामगिरी अशा विविध महत्त्वाच्या विषयांवर तज्ज्ञ वक्त्यांकडून सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

​या प्रशिक्षण वर्गाला भाजप शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी, श्रीकांत देशपांडे, गिरीश देशमुख, विष्णू चांगदे, अविनाश ठाकरे, किशोर रेवतकर,राजीव पोतदार, अर्चना डेहनकर आणि वैशाली चोपडे वक्ते म्हणून उपस्थित होते.”हे महाभियान केवळ राजकीय नसून ते समाजसेवा आणि संघटनात्मक बांधणीवर आधारित आहे. भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याला पक्षाची विचारधारा, पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे तत्वज्ञान आणि सरकारचे जनहितार्ह निर्णय जनतेपर्यंत पोहोचवता यावेत, यासाठी हे शास्त्रोक्त प्रशिक्षण दिले जात आहे,” अशी माहिती शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी दिली. पश्चिम नागपूरच्या तीन मंडळांतून एकूण ३०० कार्यकर्त्यांची अपेक्षा असताना प्रत्यक्षात २७८ कार्यकर्त्यांनी या प्रशिक्षणात सक्रिय सहभाग नोंदवला.​शिबिराच्या दुसऱ्या दिवशी सकाळी योगासन आणि व्यायामाने दिवसाची सुरुवात झाली.

समारोप सत्रात काटोलचे आमदार चरणसिंग ठाकूर यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी महाराष्ट्रात सुरू होणाऱ्या ‘एसआयआर’ (SIR) प्रकल्पाबद्दल सविस्तर माहिती दिली. तसेच, कार्यकर्त्यांनी प्रशासनाला मदत करून मतदार यादी दुरुस्तीच्या कामात सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केले. सांस्कृतिक कार्यक्रम, सामूहिक भोजन आणि संघटनात्मक संकल्पाने या दोन दिवसीय प्रशिक्षणाची यशस्वी सांगता झाली.

 

News By

  • WH NEWS is an independent digital news platform committed to factual, balanced, and public-interest journalism across Maharashtra. We provide structured reporting on political developments, civic issues, social matters, cultural events, and government updates. Our aim is to present verified information with neutrality, transparency, and professional ethics. All content is published strictly for informational purposes. Views expressed by interviewees are their personal opinions. WH NEWS respects the Constitution of India, the rule of law, and the authority of courts and public institutions. WH NEWS operates independently without external control. Any financial support received is strictly voluntary and accepted only as goodwill support for journalism. No demand, solicitation, pressure, or conditional benefit is ever involved. Contributions are used solely for reporting, production, and operational expenses and never influence editorial decisions.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

यह भी पढ़िए