मोझरी–जळका रस्त्याच्या नूतनीकरणासाठी नवा प्रस्ताव पाठवणार; बच्चू कडू यांच्या मध्यस्थीने आमरण उपोषण मागे सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे, पुरुषोत्तम मेश्राम, चंदू वानखडे यांच्या लढ्याला यश

मोझरी–जळका रस्त्याच्या नूतनीकरणासाठी नवा प्रस्ताव पाठवणार; बच्चू कडू यांच्या मध्यस्थीने आमरण उपोषण मागे
सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे, पुरुषोत्तम मेश्राम, चंदू वानखडे यांच्या लढ्याला यश
तिवसा WH NEWS (प्रतिनिधी):
मोझरी ते जळका हा रस्ता अमरावती–नागपूर राष्ट्रीय महामार्गाला पर्यायी मार्ग म्हणून ओळखला जातो. तसेच वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवाच्या काळात हजारो भाविकांच्या दिंड्या याच मार्गाने जात असल्याने या रस्त्याचे नूतनीकरण, रुंदीकरण, तसेच मार्गावरील पुलांची उंची वाढविणे आणि धोत्रा ते माळेगाव मार्गावरील दुरुस्ती व पुलांचे बांधकाम करण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी चार दिवस आमरण उपोषण केले होते.

या उपोषणाची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता विनोद बोरसे यांनी लेखी आश्वासन देत मोझरी ते जळका रस्त्याच्या नूतनीकरणासाठी तसेच संबंधित पुलांच्या बांधकामासाठी नव्या अर्थसंकल्प, नाबार्ड आणि केंद्रीय मार्ग निधी (CRF) यामार्फत प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.
माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या मध्यस्थीने सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे, पुरुषोत्तम मेश्राम आणि चंदू वानखडे यांनी आपले आमरण उपोषण मागे घेतले. त्यामुळे चार दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाला यश मिळाल्याचे चित्र आहे.

दरम्यान, रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी काही तातडीच्या उपाययोजना करण्याचेही आश्वासन देण्यात आले आहे. मोझरी ते जळका मार्गावरील अपघातप्रवण ठिकाणी सूचना फलक लावण्यात येणार असून धोकादायक वळणांवर रात्रीच्या वेळी वाहनचालकांना मार्ग स्पष्ट दिसावा यासाठी रिफ्लेक्टर बसविण्यात येणार आहेत. तसेच शिरजगाव मोझरी येथील नाल्याचे सरळीकरण करून त्या ठिकाणी उंच पुलाचे बांधकाम करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे. धोत्रा ते सालोरा मार्गावरील नदीवरील पुलाची उंची वाढविण्यासाठीही नाबार्ड व अर्थसंकल्पीय निधीतून प्रस्ताव पाठविण्याचे लेखी आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाने दिले आहे.

यावेळी माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सांगितले की, रस्ते विकासाचे प्रस्ताव प्रशासनाकडून पाठविले जात असले तरी त्यांना मंजुरी मिळवून आणण्यासाठी स्थानिक आमदार व खासदारांनी पाठपुरावा करणे आवश्यक असते. त्यामुळे या सर्व कामांसाठी पुढील काळात आवश्यक तो पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे यांनी सांगितले की, “चार दिवसांचे आमरण उपोषण लेखी आश्वासनानंतर जरी मागे घेतले असले तरी मोझरी, शिरजगाव, धोत्रा, सालोरा, शेंदोळा आणि जळका या गावांच्या रस्त्यांसह विविध समस्यांसाठीचा लढा पुढेही सुरूच राहणार आहे. मोझरी–जळका आणि धोत्रा–माळेगाव या मार्गांवर पुढे होणारे बदल हे या आमरण उपोषणाचेच फलित असेल.”

News By

  • विजय सीताराम खवसे महाराष्ट्र के नागपुर में सक्रिय एक पत्रकार, सामाजिक कार्यकर्ता और डिजिटल मीडिया न्यूज़ पोर्टल संघ नागपुर के सचिव है। वे जनहित से जुड़े मुद्दों पर निर्भिड और निष्पक्ष पत्रकारिता के लिए जाने जाते हैं। कई बार लोगों की मदद के लिए अपने संसाधनों का भी उपयोग करते हैं। नागपुर पुलिस आयुक्त के साथ हुए एक विवाद के बाद उनका नाम व्यापक रूप से चर्चा में आया।

    प्रारंभिक जीवन और शिक्षा
    विजय सीताराम खवसे का जन्म महाराष्ट्र के अमरावती जिले के थुगाव इसापूर, तहसील चांदुर रेल्वे में हुआ।अब नागपूर निवासी बने.उनकी प्रारंभिक शिक्षा स्थानीय क्षेत्र में हुई। आगे की पढ़ाई उन्होंने अशोक महाविद्यालय, चांदुर रेल्वे से की, जहाँ से उन्होंने बी.ए. पार्ट 2 तक पढाई कि । इसके बाद नागपुर में स्थित यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विश्वविद्यालय से उन्होंने पत्रकारिता (Journalism) का अध्ययन किया।

    पत्रकारिता करियर
    विजय खवसे ने वर्ष 2016 से 2022 तक दैनिक भास्कर, वाडी (नागपुर) में संवाददाता के रूप में कार्य किया। इस दौरान उन्होंने शहर में चल रहे विभिन्न सामाजिक और जनहित के मुद्दों पर रिपोर्टिंग की।
    इसके अतिरिक्त उन्होंने कई समाचार पत्रों में मुक्त पत्रकार (फ्रीलांस पत्रकार) के रूप में भी काम किया।

    WH NEWS की स्थापना
    वर्ष 2018 में उन्होंने “WH NEWS” नामक वेब पोर्टल और डिजिटल न्यूज प्लेटफॉर्म की स्थापना की। इस प्लेटफॉर्म के माध्यम से वे नागपुर और आसपास के क्षेत्रों के सामाजिक, प्रशासनिक और जनहित से जुड़े मुद्दों को प्रमुखता से उठाते हैं। वर्तमान में वे WH NEWS के मुख्य संपादक के रूप में कार्यरत हैं।

    विचारधारा और सामाजिक कार्य
    विजय खवसे को आंबेडकरवादी विचारधारा से प्रेरित माना जाता है और वे बहुजन आंदोलन तथा सामाजिक न्याय से जुड़े मुद्दों पर सक्रिय रहते हैं। उनकी पत्रकारिता का मुख्य उद्देश्य समाज में अन्याय, भ्रष्टाचार और अवैध गतिविधियों को उजागर करना तथा आम जनता की आवाज़ को मंच देना है।

ताजा अपडेट