हॅलो कॉर्नर ने सुरु केली मतदान जनजागृती मोहीम 

हॅलो कॉर्नर ने सुरु केली मतदान जनजागृती मोहीम 

अमरावती (प्रतिनिधी): प्रत्येक निवडणुकीत मतदारांना मतदान करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी आपल्या अनोख्या दृष्टिकोनाचा वापर करणाऱ्या चपराशीपूरा येथील प्रसिद्ध हॅलो कॉर्नरने ने यावर्षीही मनपा निवडणुकी दरम्यान देशभक्तीचे उदाहरण प्रस्तुत केले .हॅलो कॉर्नर चे संचालक इरफान अथर अली यांनी आपल्या सामाजिक कार्याद्वारे अमरावती महानगरपालिकेच्या सहकार्याने एक ऐतिहासिक मोहीम आयोजित केली, ज्यामध्ये लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुकीत वाढत्या मतदानाला प्रोत्साहन मिळण्यासाठी सर्व उत्पादनांवर १० टक्के सूट देण्यात आली. हॅलो कॉर्नरच्या या उपक्रमाचे न्यायाधीश, ऑलिंपियन, विभागीय आयुक्त, जिल्हा दंडाधिकारी, पोलिस आयुक्त तसेच मंत्री, खासदार आणि आमदार यांनी ३३ वर्षांपासून या उपक्रमाचे कौतुक केले आहे.

२०२६ च्या अमरावती महानगरपालिका निवडणुकीत मतदारांनी आपले अमुल्य मत देऊन आपआपले कर्तव्य पार पाडण्यासाठी एक अनोखा उपक्रम सादर केला आहे. भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त आणि सर्व कार्यालय प्रमुखांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे. उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी संपूर्ण भारतात असे कार्यक्रम आयोजित करण्याचे आवाहनही केले. या कार्यक्रमाला मनपा शिक्षणाधिकारी डॉ.मेश्राम, मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ.सचिन बोंद्रे, हॅलो कॉर्नरचे संचालक, इरफान अथर अली, ऍड. डॉ.मनीष शिरसाट, वरीष्ठ पत्रकार मोहन गंगन , संपादक सुहास जोशी, पत्रकार जया चांडक, डॉ.शहादली फारुकी, दीपक धुरंदर, आसिफ अतहर अली, फैजान इरफान अली, अजय शिनगारे, अभिजीत बाळापुरे, अब्दुल सलीम, निसार भाई, अफसर शेख, अफसर मोहन बेग, अहमद, डॉ. मोईन देशमुख, सुभेदार साहेब यांच्यासह अनेक मान्यवर मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

News By

ताजा अपडेट