हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

स्व. प्राचार्य अण्णासाहेब हिवसे मिशन आय ए एस.चे पहिले अध्यक्ष

spot_img

स्व. प्राचार्य अण्णासाहेब हिवसे
मिशन आय ए एस.चे पहिले अध्यक्ष

अमरावती –  आज अमरावतीच्या विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीचा सर्वत्र बोलबाला आहे. डॉ.श्री नितीन धांडे हे या संस्थेचे विद्यमान अध्यक्ष आहेत. भारतीय जनता पार्टीने त्यांच्यावर संघटनात्मक जबाबदारी पण दिली आहे. याच अमरावतीच्या विदर्भ युथ वेल्फेअर सोसायटीचा महाराष्ट्रातील मिशन आय ए ए.च्या जळणघळणीत महत्त्वाचा वाटा आहे. महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री प्रा.राम मेघे या संस्थेचे अध्यक्ष असतानाची गोष्ट. प्राचार्य बाबुराव उर्फ अण्णासाहेब हिवसे या संस्थेचे तेव्हा कोषाध्यक्ष होते. त्यांचा वारसा त्यांचे चिरंजीव श्री नितीन हिवसे आज चालवीत आहेत.

प्राचार्य अण्णासाहेब हिवसे यांचा माझा परिचय कवी श्रेष्ठ सुरेश भटांमुळे झाला. सुरेश भट व अण्णासाहेब हे जिवलग मित्र. त्यांच्या तासंतास बैठकी चालायचा. गप्पा गोष्टींना ऊत यायचा. अण्णासाहेबांनी तर एक वेळ चक्क अमरावतीच्यात रेल्वे स्टेशन चौकात सुरेश भटांचा कार्यक्रम ठेवला.. कवितेचा कार्यक्रम आणि तोही रेल्वे स्टेशन चौकात. ही अमरावतीच्या इतिहासात लिहिण्यासाठी गोष्ट आहे. तेव्हा अण्णासाहेबांची रेल्वे स्टेशन चौकात बैठक होती आणि म्हणून त्यांनी रेल्वे स्टेशन चौक निवडला होता .

Advertisements

प्राचार्य अण्णासाहेब हिवसे एकवेळ मला म्हणाले तुम्ही खूप काम करता .एक वेळ घरी या .मी त्यांच्या घरी गेलो आणि अण्णा साहेबांनी त्यांचे घर आणि त्यांची संस्था आमच्यासाठी मोकळी करून दिली. अण्णासाहेब मदतीला आल्यानंतर आमचे सर्व आर्थिक प्रश्न सुटले .अण्णा साहेबांना या गोष्टीची आवड होती. मिशन आय ए एस.चा पहिला सेमिनार झाला तो अण्णासाहेबांच्या दंत महाविद्यालयातच. आताचे अपर मुख्य सचिव व तेव्हाचे यवतमाळचे जिल्हाधिकारी श्री विकास खारगे याच्या हस्ते त्या चर्चासत्राचे उद्घाटन झाले.. हा पहिला सेमिनार स्पर्धा परीक्षांवर होता. आताचे आयकर आयुक्त श्री अभिनय कुंभार तेव्हा नुकतेच आय ए एस झाले होते. महाराष्ट्रातून त्यांचा तिसरा तर देशातून 81 वा क्रमांक होता. ते प्रसन्न ट्रॅव्हल्सच्या गाडीत बसेपर्यंत मुलं त्यांना प्रश्न विचारीत होते.. तो काळ असा होता की आयएएस बद्दल कोणालाच फारसे काही माहीत नसायचे.

अण्णा साहेबांनी त्यांची सगळी महाविद्यालय आमच्या मिशन आय.ए एस.साठी मोकळी करून दिली .कधी दंत महाविद्यालय हो तर कधी अभियांत्रिकी महाविद्यालय तर कधी बडनेरा येथील आरडीआयचे महाविद्यालय तर कधी इर्विन चौकातील महिला महाविद्यालय तेव्हा विद्यापीठ रोडवर असलेले बियाणी चौकातील समाजकार्य महाविद्यालय.. त्यांनी नुसती महाविद्यालये उपलब्ध करून दिले नाहीत .तर त्या कार्यक्रमाला येणाऱ्या खर्चाचा भारही उचलला. हा काळ 2000 सालचा.. तेव्हा आम्ही तरुण होतो. उत्साही होतो .कार्यकर्ते होतो .पण पैसा नव्हता .पण अण्णासाहेबांनी आम्हाला कधीही पैशाची उणीव भासू दिली नाही

अण्णा साहेबांना लोकांना जेऊ घालण्याचा भारी छंद. स्पर्धा परीक्षा कार्यशाळा असली की ते जेवणाची ऑर्डर देऊन टाकायचे. त्यांच्या बाबु नावाचा कॅटरर होता.. आणि मला सांगायचे काठोळे 200 लोकांची जेवणाची ऑर्डर दिली. मी म्हणायचो अण्णासाहेब एवढे लोक येणार नाहीत ना. अण्णासाहेब म्हणायचे त्याच्यापेक्षा जास्त येतील .माझा अनुभव तुमच्यापेक्षा दांडगा आहे .लोकांना खाऊ पिऊ घाला .तर त्यांना ज्ञान पचनी पडेल आणि पैशाची काळजी करू नका. पेट्रोलचे बिल मी देणार आहे .तुमच्यावर भार पडणार नाही. आणि व्हायचे तसेच .अण्णासाहेबांनी जो अंदाज ठरविलेला असायचा .त्याच्या जवळपास लोक यायचे .तरुण यायचे. त्यांचे आई वडील यायचे. अण्णासाहेब कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून तर कार्यक्रम संपेपर्यंत कार्यक्रम स्थळीच असायचे. अण्णासाहेब असल्यामुळे त्या त्या महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचारी देखील आमच्या दिमतीला असायचे.

Advertisements

कधी अण्णासाहेब गावात नसले तर कार्यक्रमाची जबाबदारी ते त्यांचे सुपुत्र श्री नितीन यांच्यावर सोपवायचे. नितीन भाऊचा दरारा असायचा .त्यांना सांगितलेले काम ते पटकन कर्मचाऱ्यांच्या मदतीने ताबडतोब या स्पीडने करून टाकत होते.. त्यांच्या मदतीला दंत महा.चे डीन डॉक्टर राम ठोंबरे डॉक्टर हरिभाऊ गुल्हाने अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री देशपांडे हे असायचे. अण्णासाहेबांनी सोपविलेली जबाबदारी ते समर्थपणे पार पाडायचे.. साहेबांचे सांगणे असायचे .स्पर्धा परीक्षा कार्यशाळा चांगली झाली पाहिजे .मुलं जेवण खाऊन करून गेली पाहिजेत.. तुम्ही पैशाची काळजी करायची नाही. कार्यक्रमाची काळजी घ्या. या कार्यक्रमातून जाणाऱ्या प्रत्येक मुलाने कार्यक्रम चांगला झाला असे म्हटले पाहिजे.

आम्हाला मिशन आय ए एस ची पुस्तके छापायची होती .मी अण्णा साहेबां जवळ शब्द टाकला. अण्णासाहेबांनी मला बजेट विचारले .मी सांगितले. एक रुपयाही मागेपुढे न करता अण्णा साहेबांनी तेवढ्या रकमेची तरतूद करून दिली.
पुढे आम्ही श्री संत गाडगे महाराज यांच्या जीवनावर नाटक बसले. अण्णासाहेबांना ते आवडले. आमची मेहनतही आवडली. नाटक आमचे. गाड्या आण्णा साहेबाच्या. वराडी कवी प्राचार्य डॉक्टर विठ्ठल वाघ हास्य सम्राट मिर्झा रफी अहमद बेग अमरावतीला आले की मी अण्णासाहेबांना फोन करायचा. अण्णासाहेब प्राचार्य डॉक्टर विठ्ठल वाघ मिर्झा शंकर बडे आलेले आहेत. अण्णासाहेब ताबडतोब त्यांच्या कॉलेजमध्ये कार्यक्रम आयोजित करायचे .कवींना चांगले मानधन द्यायचे.

मिशन आय.ए.एस.ची जडण घडण घडत असताना अण्णासाहेब आमच्या पाठीमागे देवदूतासारखे उभे राहिले. ते त्यांचे घर म्हणजे आमचे मिशन आय.ए.एस.चे कार्यालयात झाले. आमची घर केव्हा लहान होती .अण्णा साहेबांचे घर मोठे होते आणि मनही मोठे होते.. येणाऱ्या प्रत्येकाचे मनापासून स्वागत करणे हा त्यांच्या ठिकाणी रुजलेला संस्कार होता.. त्यामुळे आमच्याकडे कोणीही पाहुणे आले तर आम्ही आमच्या घरी न नेता अण्णासाहेबांकडे घेऊन जायचे. अण्णासाहेब त्यांचे पूर्ण आदरतिथ्य करायचे. शिवाय पाहुण्यांना कुठे जायचे असते तर आपली कार उपलब्ध करून द्यायचे.

Advertisements

आज मिशन आय.ए.एस.ची चळवळ पूर्ण भारतभर पसरली आहे. महाराष्ट्रातही 24 जिल्ह्यात मिशनचे काम सुरू आहे.शेकडो स्पर्धा परीक्षा कार्यशाळा झाल्या .पुस्तक प्रकाशित झाली. भेट देणाऱ्या आयएएस अधिकाऱ्यांची संख्या देखील 400 च्या घरात गेली.आज अण्णासाहेब नाहीत. पण त्यांनी मिशनचा जो अंकुर होता त्याला जे खतपाणी घातले ते सर्वात महत्त्वाचे आहे. सामाजिक चळवळीसाठी काही माणसे स्वतःला झोकून देतात. त्यापैकी अण्णासाहेब एक होते. महाराष्ट्रात जेव्हा आयएएस हा शब्दही फार कमी लोकांना माहीत होता किंवा मर्यादित लोकांना माहीत होता .तो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घराघरात पोहोचण्यासाठी आम्ही जी चळवळ उभारली .त्या चळवळीला अण्णासाहेबांनी भरभरून मदत केली आणि आज मिशनला चांगले दिवस आलेले आहेत .याचे बरेचसे श्रेय अण्णासाहेबांना जाते. अण्णासाहेबांना आमचा मानाचा मुजरा.

प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे
संचालक
मिशन आय.ए.एस.
अमरावती
9890967003