सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने देशभरात HPV-कर्करोग जनजागृती मोहीम सुरू केली
-HPV-श्री संबंधित कर्करोगांना तोंड देण्यासाठी नामपूर मध्ये वैद्यकीय तज्ञ एकत्र आले
नागपूर २९ जून २०२५: सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) च्या नेतृत्वाखालील देशव्यापी सार्वजनिक आरोग्य उपक्रमाचा भाग म्हणून आज नागपूर मध्ये ‘कॉन्स्युअर एचपीव्ही अँड कर्करोग कॉन्क्लेव्ह २०२५ लाँच करण्यात आले.
भारताला अजूनही HPV-संबंधित आजारांचा, विशेषतः गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग, मोठ्या प्रमाणात सामना करावा जामत आहे. जो देशातील महिलांमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात सामान्य कर्करोग झाला आहे. HPV आणि कर्करोगावरील ICO/IARC माहिती केंद्र (२०२३) नुसार, भारतात दरवर्षी १.२३ लाखांहून अधिक नवीन गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे रुग्ण आणि ७७,००० हून अधिक जणांचा संबंधित रोगाने मृत्यू झाल्याची नोंद केली जात आहे. याशिवाय ९०% पर्यंत गुदद्वाराशी संबंधित कर्करोग आणि ६३% पर्यंत पेनिल कॅन्सर HPV शी संबंधित आहेत.
नागपूर मध्ये झालेल्या एका कार्यक्रमामध्ये, वैद्यकीय तज्ञांच्या एका पॅनेलने एचपीव्हीचा सार्वजनिक आरोग्यावर होणाऱ्या परिणामांबाबत सखोल चर्चा केली. या पॅनेलमध्ये पुढील डॉक्टर समाविष्ट होतेः
डॉ. विनोद गांधी, संचालक, कलर्स मदर अॅड चाइल्ड केअर हॉस्पिटल, नागपूर, इंडियन अकादमी ऑफ पेडियाट्रिक्स, नागपूर शाखेचे माजी अध्यक्ष
डॉ. मिलिंद मंडलिक, संचालक, कलर्स मदर अॅड चाइल्ड केअर हॉस्पिटल, नागपूर, संस्थापक अध्यक्ष निओनॅटोलॉजी फोरम, नागपूर चैप्टरडॉ. चारू बाहेती, संचालक सुअरलाइफ हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नागपूर आयव्हीएफ-आयसीएसआय सल्लागार प्रसूती आणि स्त्रीरोग डॉ. संगीता ताजपुरिया, संचालक वेदांश हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नागपूर, उपाध्यक्ष एनओजीएस (२०२४-२५), सल्लागार मंडळ सदस्य आयव्हीएफ युनिट, एम्स नागपूर सर्जन, एचसीजी कर्करोग केंद्र, नागपूर, डॉ. मौमिता बाग, सल्लागार खीरोगतज्ज ऑन्कोलॉजिस्ट, एचआयपीईसी तज्ज्ञ, लॅप्रोस्कोपिक आणि रोबोटिक या सत्राचे सूत्रसंचालन नागपूर येथील कलर्स मदर अॅड चाइल्ड केअर हॉस्पिटलचे संचालक आणि एसीव्हीआयपी वेस्ट झीन सदस्य (२०२०-२२) डॉ. संजय मराठे यांनी केले. डॉ. संजय लालवानी यांनी तातडीने जागरूकता करण्याची गरज असल्याचे अधोरेखित केलं तसेच किशोरवयीन मुले आणि पालक या दोघांपर्यंत पोहोचण्याचे महत्त्व आणि त्याविषयी मार्गदर्शन करण्यात आरोग्य सेवा प्रदात्यांची असलेली महत्त्वाची भूमिका यावर प्रकाश टाकला आहे.
वक्त्यांनी यावर भर दिला की HPV हा केवळ गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोग पुरता मर्यादित नाही. हे व्हल्व्हर, योनी, गुदद्वारा, पेनिल, ऑरोफॅरिंजियलच्या कर्करोगाशी देखील संबंधित आहे, जे पुरुष आणि महिला दोघांनाही प्रभावित करते.
१५ ते २५ वयोगटामधील मुल-मुलीमध्ये HPV संसर्गाची शक्यता सर्वाधिक असल्याने, लवकरात लवकर याविषयी जागरुकता आणि त्यावर वेळेवर प्रतिबंधात्मक कारवाई करणे आवश्यक आहे. आता उपलब्ध असलेल्या आणि परवडणाऱ्या HPV लसीमुळे, HPV शी संबंधित कर्करोगांपासून प्रत्येक व्यक्तीचे संरक्षण करणे आणखी सोपे झाले आहे.
‘देशभरात आयोजित केलेल्या या कॉन्क्लेव्हद्वारे, आम्ही ह्युमन पंचिलीमाव्हायरस (HPV) आणि त्याचा गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगानी व इतर कर्करोगांशी असलेला संबंध याबद्दलची समाजामध्ये असलेली समज आणखी वाडवण्याचे उद्दिष्ट ठेवतो,’ असे सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक पराग देशमुख म्हणाले. वैद्यकीय तज्ञ, आरोग्यसेवा कर्मचारी आणि समाजातील सदस्यांना एकत्रित आणून, हे आसपीठ रोग्याचे निदान आणि त्यावर प्रतिबंध चर्चा करण्यासाठीच्या धोरणांना प्रोत्साहन देते.”
नागपुर कॉन्क्लेव्हचा समारोप प्रेक्षकांच्या खुल्या संवादाने झाला, ज्यामुळे मोहिमेच्या व्यापक उद्दिष्ट आणखी बळकट झालीः माहितीपूर्ण निर्णय घेण्याद्वारे आणि समाजातील सहभागाद्वारे प्रतिबंधित कर्करोगाचे ओझे कमी करणे. येत्या काही महिन्यांत देशभरातील शहरांमध्ये हा उपक्रम सुरू राहीन, ज्यामुळे आरोग्यसेवेतील विश्वासार्ह आवाजांना शिक्षित करण्यासाठी व्यासपीठ तयार करणे हे उद्दिष्ट आहे.
पुण्यात मुख्यालय असलेली सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी आहे आणि तिने भारतात आणि जागतिक स्तरावर सार्वजनिक आरोग्याच्या प्रगतीमध्ये दीर्घकाळ महत्त्वाची भूमिका बजावली आहे. लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे:
जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, गेल्या ५ दशकांहून अधिक काळ परवडणाऱ्या आणि उच्च दर्जाच्या लसी पुरवण्यात आघाडीवर आहे. जागतिक लोकांच्या आरोग्याचे रक्षण करण्याच्या ध्येयाने, सीरम इन्स्टिट्यूटने भारतातील पहिली स्वदेशी विकसित लिंग-तटस्थ काडिव्हॅलेंट HPV लस, सव्हव्हॅिक लॉच करून सार्वजनिक आरोग्यात एक महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे जी पुरुष आणि महिला दोघांनाही दिली जाऊ शकते.
गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हे भारतातील स्त्रियांच्या कर्करोगाचे दुसरे प्रमुख कारण आहे.
–गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका असलेल्या महिला (वय २ १५ वर्षे) ५११.४ दशलक्ष (५१.४ कोटी) आहेत
-गर्भाशयाच्या कर्करोगाच्या मृत्यूची वार्षिक संख्याः ७७,३४८
-गर्भाशयाच्या कर्करोगाच्या प्रकरणांची वार्षिक संख्याः १,२३,९०७
स्रोतः एचपीव्ही आणि कर्करोगावरील आयसीओ/आयएआरसी माहिती केंद्र २०२सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया बद्दलची माहिती
सायरस पूनावाला यांच्या ग्रुपचा भाग असलेली सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी लस उत्पादनात जागतिक आघाडीवर आहे, जी जगभरात अत्यंत कमी कर्मितीमध्ये लस पुरवण्यासाठी ओळखली जाते. अमेरिका, यूके आणि युरोपसह १७० देशांमध्ये कार्यरत असलेली सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) ही जागतिक स्तरावर उत्पादित संख्येनुसार जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी आहे. SIIPL’s चे मल्टीफंक्शनल उत्पादन है