शिवकालीन १२ किल्ल्यांना ‘युनेस्को’चा जागतिक वारसा दर्जा!
-महाराष्ट्रासाठी गौरवाचा क्षण; शिवकालीन दुर्गसंपदेला आंतरराष्ट्रीय ओळख
मुंबई, दि. 14 जुलै छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या ऐतिहासिक दुर्गसंपदेचा सन्मान जागतिक स्तरावर झाला असून, महाराष्ट्रातील ११ व तामिळनाडूतील १ अशा एकूण १२ किल्ल्यांना युनेस्कोने ‘जागतिक वारसा स्थळ’ (World Heritage Site) म्हणून मान्यता दिली आहे. हा निर्णय संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाचा आणि ऐतिहासिक क्षण ठरला आहे.
किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश
यामध्ये रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग आणि खांदेरी या महाराष्ट्रातील दुर्गांचा तसेच जिंजी किल्ला(तामिळनाडू) यांचा समावेश आहे.
अद्वितीय वैश्विक मूल्यामुळे निवड हे सर्व किल्ले ‘युनेस्को’च्या Outstanding Universal Value (OUV)या जागतिक निकषांवर खरे उतरल्यानंतर त्यांचा यादीत समावेश झाला. शिवकालीन दुर्गांचे सामरिक, स्थापत्य आणि सांस्कृतिक महत्त्व सह्याद्रीच्या कुशल वापरातून साकारलेली माची स्थापत्यशैली आणि गनिमी काव्याचे युद्धतंत्र हे घटक निर्णायक ठरले.
सरकारचा सक्रिय पाठपुरावा
सांस्कृतिक कार्य विभागाच्या अंतर्गत पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयामार्फत यासाठी सविस्तर प्रस्ताव तयार करण्यात आला होता. प्रधानमंत्री कार्यालय<span;> आणि संस्कृती मंत्रालयाच्या पाठपुराव्याने हा प्रस्ताव युनेस्कोकडे पाठवण्यात आला.
या यशस्वी प्रक्रियेत वास्तुविशारद डॉ. शिखा जैन पुरातत्व संचालक डॉ. तेजस गर्गे गड संवर्धन समित्या जिल्हाधिकारी वनविभाग आणि ICOMOS तज्ज्ञ श्री. ह्वाजोंग ली यांच्या भूमिकाही महत्त्वपूर्ण ठरल्या.
राजकीय नेतृत्वाची मोलाची भूमिका
या ऐतिहासिक घडामोडीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीs उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेळोवेळी पुढाकार घेतला. सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी युनेस्कोच्या महासंचालकांची भेट घेऊन शिष्टमंडळाचे नेतृत्व केले.अपर मुख्य सचिव विकास खारगे भारताचे युनेस्कोतील स्थायी प्रतिनिधी विशाल शर्मा उपसंचालक हेमंत दळवी यांनीही या प्रक्रियेसाठी मोठे योगदान दिले.
पर्यटन आणि संशोधनास चालना
या मान्यतेमुळे पर्यटन, संशोधन आणि स्थानिक अर्थव्यवस्थायांना मोठी चालना मिळणार आहे. महाराष्ट्राच्या स्वराज्यरचनेचा वारसा शौर्य आणि स्थापत्य परंपरा यांना आता जागतिक व्यासपीठावर ओळख मिळाली आहे.
“छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेली दुर्गसंपदा म्हणजे महाराष्ट्राच्या शौर्याचा वारसा आहे. युनेस्कोचा दर्जा ही त्या ऐतिहासिक समृद्धतेला जागतिक मान्यता आहे,” असे मत अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी व्यक्त केले.