शबरी चे उष्टे बोर खाणारे देव निर्माण झाले परंतु आजपण दलित आदिवासी यांच्या ताटात जेवण घेणारे माणूस दिसत नाही: प्रा.दुपारे !
नागपूर : या देशात समता बंधुता,भाईचारा निर्माण करण्यासाठी अजून किती दिवस वाट बघावी लागेल संविधानाने या देशाला आदिवासी राष्ट्रपती दिला परंतु आजपण जंगलात पाहडात आदिवासी, दलितांची विषम परिस्थिती आहे अंधश्रध्दा, शिक्षणाचा अभाव,जातीवाद संपुष्टात आला नाही या देशात शबरीचे उष्टे बोर खाणारे देव निर्माण झाले परंतु आदिवासी, दलितांचा ताटात जेवण करणारी मानसिकता तयार झाली नाही असे प्रतिपादन आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा चे शहराध्यक्ष प्रा.रमेश दुपारे यांनी केले ते आज फुटाळा येथिल बिरसा मुंडा यांच्या पुतळ्या जवळ जागतिक आदिवासी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते या प्रसंगी आंरिमो चे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी बिरसा मुंडा यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अँड मिलिंद खोब्रागडे यांनी दिपप्रज्वलन केले मोर्चा ची मुलख मैदानी तोफ धर्मा बागडे यांनी दलित, आदिवासी एकता जिंदाबाद घोषवाक्यानी परिसर दणाणून सोडले या प्रसंगी मोनिका आत्राम, मिणा मडके, माधूरी शिडाम प्रतिभा मसराम, कांचन गेडाम, नरेश खन्ना संतोष गेडाम, विशाल गेडाम,जीया आत्राम, रामकृष्ण मसराम सशिका सिडाम आदिंसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.