हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

त्यांच्या झोपडीत दिवा लागावा म्हणून..

spot_img

त्यांच्या झोपडीत दिवा लागावा म्हणून..

त्यांच्या झोपडीत दिवा लागावा म्हणून काही कार्यकर्ते जीव झोकून काम करत होते त्या कार्यकर्त्यांच्या कामाला आता कुठं थोडसं यश आलं…… वस्ती फुलायला लागली वस्ती डौरायला लागली… शिक्षणाचा सुगंध त्यांच्या आयुष्यात पसरायला लागला.

एमआयटीच्या मागे गेल्या दहावीस वर्षापासून दुर्लक्षित ही वस्ती …ह्या वस्तीचं नाव म्हणजे अण्णाभाऊ साठे नगर…फक्त प्लास्टिकची पाल आणि चार डेरी यातच त्यांचे उन्हाळे पावसाळे आणि हिवाळी निघायचे.. वरच्या येणाऱ्या पावसानं पावसाळ्यात त्यांची आंघोळ व्हायची ऊन थंडी वारा पाऊस कशाची बाधा न झालेला हा समाज…. पाठीवर पोट घेऊन जगणारा…

Advertisements

या समाजाची अख्खी वस्तीच सविता बेदरकर , धनेंद्र भुरले, सुनीता इंगळे, धर्मशील चव्हाण यांच्या प्रयत्नांनी वसवली गेली.
पण खऱ्या अर्थाने या वस्तीने विकासाची वाट धरली ती विशेष समाज कल्याण विभागाच्या सहकार्याने.. या वस्तीत विशेष समाज कल्याण विभागाचे कर्मचारी लक्ष्मण खेडकर आले त्यांनी या वस्तीचा सर्वे केला आणि त्याची पूर्ण माहिती त्यावरचे विशेष समाज कल्याण अधिकारी डॉक्टर मंगेश वानखेडे यांना सांगितली. डॉक्टर मंगेश वानखेडे सरांनी स्वतः भेट दिली आणि 18 विभागाच्या लोकांना त्या वस्तीत पाचारण केलं त्यांचा एक कॅम्प भरविला. अक्षरशह: पाणी गळत होते आणि सरांनी या वस्तीतील लोकांना साऱ्या योजना समजावून सांगितल्या केवळ समजावूनच ते थांबले नाहीत तर या वस्तीत सुविधांचा मोगरा फुलवण्यासाठी या विशेष समाज कल्याण विभागाचे विशेष योगदान आहे.


अधिकारी जर समाजशील असले तर एखाद्या वस्तीचा एखाद्या मोहल्याचा कसा कायापालट होऊ शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे विशेष समाज कल्याण विभाग.. जे माझ्या प्रत्येक सामाजिक उपक्रमात मदतीचा हात देतात स्वतः जातीने उभे राहतात स्वतः त्या लोकांपर्यंत पोहोचतात त्या समाज कल्याण विभागाचे जेवढे धन्यवाद मानावे तेवढे कमीच आहे…

त्यांच्या सहकाऱ्यांने या वस्तीत पहिल्यांदा आधारचे कॅम्प लागले ..नंतर राशन कार्ड वाटण्यात आले. न्यायाधीश दूधे आणि जिल्हा विधी सेवा समिती यांच्या मदतीने जन्माचे दाखले झाले. खेडकर सरांच्या मदतीने त्यांना कास्ट सर्टिफिकेट इश्यू झाल्या… गाव नमुना झालं ….सातबारा झाले आणि एक अखी वस्ती जी सा-या सोयीपासून वंचित होती त्या वस्तीमधील पोरं पाठीवर दप्तर घेऊन शाळेला निघाली कारण शिक्षणचं माणसाचे नशीब बदलू शकते ..माणसाची जीवनशैली बदलू शकते असा विश्वास त्यांच्या मनात सविता बेदरकर यांनी पेरला होता.

Advertisements

दरवर्षी दिवाळीच्या वेळेस या वस्तीत सविता बेदरकर जेवण आणि नाश्तापाणी देत असतात आणि स्वतःही त्यांच्यासोबत जेवण करतात.
आज या वस्तीतील या मुलांच्या चिमण्यां चोचीत दोन घास भरविण्यासाठी त्या वस्तीतल्या लोकांच्या जेवणात गरम जेवण आणि नाश्ता दिला गेला…
भीक मागून जगणाऱ्या लोकांची ही वस्ती.. या लोकांनी भीक मागणं सोडलं ..कचरा उचलण्याचं काम करतात रोडाच्या कामावर जातात.. कोणाच्या घरचे काम असलं तर ते काम करतात …आणि स्वाभिमानाने स्वतःचे जीवन फुलवतात.. त्यासाठी समाज कल्याण विभागाचे प्रचंड हातभार लागलेत.. त्यांनी स्वतःच्या पायावर उभे व्हावे त्यांनी रोजगार करावा म्हणून समाज कल्याण विभाग सतत पाठपुरावा करून राहिलेला आहे … आताचे विशेष समाज कल्याण अधिकारी श्री मोहतुरे सर यांच्या प्रयत्नातून घरकुल मंजूर झाले . आज विशेष समाज कल्याण विभागाच्या वतीने पाच पक्की घर बनलीत… जी लोकं पालावर राहत होती त्यांच्या घरावर छत आलीत.. आणि 25 घराचे बांधकाम पूर्णत्वाकडे पोहोचून राहिलेले आहे ..भटकंती करणारा हा समाज आज पक्क्या घरात राहून राहिलेला आहे सिमेंट काँक्रीटच्या घरात राहून राहिलेला आहे याचे संपूर्ण श्रेय समाज कल्याण विभागाला द्यावे लागेल.

या वस्तीतल्या मुलांच्या तोंडात जेवणाचे दोन गरम घास जावे आणि नाश्त्याचे गोडधोड जावे याच्यासाठी डॉक्टर परिमल डोंगरे, सुनीता भेलावे ,यशोधरा सोनवणे ,महेंद्र सोनवणे ,मंजू शिवनकर,प्रा. अनिल मेश्राम ,भगवान नंदा गवळी यांनी वस्तीला भेट देऊन सहकाऱ्यांचा आणि मदतीचा हात दिला…
‌… दिवे तर सारेच लावतात प्रश्न इतर सारेच करतात पण आजूबाजूला वस्तीत दोन घास फक्त आणि फक्त मानवता असलेले लोकच भरवतात.. स्वत:च्या मुलांच्या फटाक्यावर लाखो रुपये खर्च करणाऱ्या माझ्या बंधू आणि भगिनींनो कधी त्या वस्तीतही जा.. पिंजलेल्या गांजलेल्या लोकांना भेटा अरे फटाके नाही गोड तरी त्यांच्या वस्तीत द्या……
… मुलं तुमची काय त्यांची काय मुलं शेवटी समाजाचीच ना….. सहजच ना. धो .महानोर यांच्या कवितेच्या ओळी आठवल्या..

मोडलेल्या माणसांचे दुःख ओले झेलताना
त्यां अनाथांच्या उशाला दीप लावू झोपताना
कोणती ना जात ज्यांची
कोणता ना धर्म ज्यांना
दुःख भिजले दोन आसू माणसांचे
मानसांना…..
…. दिवा कुठेही लावा पण हृदयातला दिवा पेटल्याशिवाय आसमंत उजाडणार नाही.. साफसफाई कितीही करा पण मनाची साफसफाई आणि डागडुगी केल्याशिवाय इतर साफसफाई ला काय अर्थ….?

Advertisements

साभार -सविता बेदरकर फेसबुक