हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

चांदूर नगर परिषद प्रांगणात् बसणार डॉ.आंबेडकरांचा पूर्णकृती पुतळा -उत्तमराव गवई यांच्या प्रयत्नाल अखेर यश -कार्यक्रम नियोजनाची पार पडली बैठक -जिल्ह्यतून लाखो अनुयायी येतील चांदूर रेल्वेत…पुतळा उद्धघाटनाच्या प्रतिक्षेत,नप केव्हा करणार उद्घाटन ?

spot_img

चांदूर नगर परिषद प्रांगणात् बसणार डॉ.आंबेडकरांचा पूर्णकृती पुतळा
-उत्तमराव गवई यांच्या प्रयत्नाल अखेर यश
-कार्यक्रम नियोजनाची पार पडली बैठक
-जिल्ह्यतून लाखो अनुयायी येतील चांदूर रेल्वेत…पुतळा उद्धघाटनाच्या प्रतिक्षेत,नप केव्हा करणार उद्घाटन ?

चांदुर रेल्वे तालुका प्रतिनिधी
-नगर परिषद प्रांगणात् डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णकृति पुतळा बसवण्यासाठी मागील 17 वर्ष्या पासून समाजसेवी उत्तमराव गवई यांनी सरकार कड़े मागणी केली होती.या मागणी कड़े नगर परिषद प्रशासन लक्ष देत नसल्याने गवई यांनी तहसील कार्यालय पुढे अनेकदा उपोषण, आंदोलने केले.याची दखल घेत अखेर पुतळा उभारणी करिता नप ने प्रस्ताव मंजूर केला. महाराष्ट्र शासनाच्या पूर्ण परवानगी मिळाल्या अखेर उत्तमराव गवई यांच्या आन्दोलनाला यश आले.


नप प्रांगणात पुतळया करिता चबूतरा तयार करण्यात आला.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुणे येथे पुतळा तयार झाला असून आता फक्त वाट आहे फक्त उद्द्घाटनाची .नप केव्हा उद्दघाटन करणार ?
गुरुवारी मूलबंध कुटी विहारावर उत्तमराव गवई यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.बैठकीत युवका सह महिलांचा मोठा सहभाग होता.

Advertisements


बैठकीत पुतळा आगमन आयोजन,पुतळा उद्दघाटन व 14 एप्रिल भीम जयंती कार्यक्रम आयोजनावर चर्चा करण्यात आली.नगर परिषद प्रशासन पुतळा बसवत असल्याने उद्घाटन जबाबदारी नप ची  आहे.मात्र जिल्ह्यातील बौध्द उपासक उपासिका भीम सैनिकांनी सुद्धा कार्यक्रमाचे वेगळे नियोजन करतील व त्यात लाखोंच्या संख्येत नागरिक उपस्थित राहतील अशी माहिती डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती अध्यक्ष
उत्तमराव गवई यांनी दिली.


बैठकीत उत्तमराव गवई,नानासाहेब डोंगरे,माजी नगरसेवक बंडु आठवले,विजय खवसे,प्रकाश रंगारी,प्रेमचंद अंबादे,संदीप बगाडे, इंद्रपाल बनसोड, युवक वानखड़े ,मेश्राम यांनी आपले मत मांडले.
पुढील नियोजन व कार्यक्रम समित्याची नियुक्त 20 फेब्रुवरीच्या बैठकीत होणार असल्याची माहिती गवई यांनी दिली.