हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

गोंडगोवारी जमातीचा निवडणुकीवर बहिष्कार कायम पत्रकार परिषदेत दिली माहीती

spot_img

गोंडगोवारी जमातीचा निवडणुकीवर बहिष्कार कायम
पत्रकार परिषदेत दिली माहीती
गोंदिया : संघर्ष कृती समितीने विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत गोंडगोवारी जमात मतदान करणार नाही. तर या निवडणुकीवर संपुर्ण बहिष्कार असेल असे जाहीर आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे मतदानावर महाराष्ट्रात बहिष्कार कायम आहे अशी माहिती गोंड गोवारी संघर्ष कृती समितीच्या वतीने शुक्रवार (ता. १५) गोरेगाव येथील गुरूकूपा लाॅन येथे आयोजित पत्रकार परिषदेतून देण्यात आली.

यावेळी विजयकुमार नेवारे,सुरेशकुमार नेवारे,अनिल राउत,राजेश सोनवाने,नरेंद्र भोंडे,कुंभकरण राउत,भिमराज सोनवाने, दिपा राउत,वैशाली राउत,अनिता नेवारे,नंदलाल सोनवाने उपस्थित होते. शासनाने गोंडगोवारी जमातीची २४ एप्रील १९८५ च्या शासन निर्णयातील असंविधानिक व चुकीची माहीती सर्वोच्च न्यायालयात दिली. त्यानुसार २०२० ला निकाल जाहीर करण्यात आला. पण गोंडगोवारी जमातीने संस्कृती प्रमाणे दुरुस्ती करण्याची मागणी शासनाला करण्यात आली. ती मागणी मान्य करण्यात आली नाही.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत गोंडगोवारी जमातीचा बहिष्कार असेल असी घोषणा समितीने केली. गोंदिया जिल्ह्य़ात दिड लाख गोंडगोवारी जमात आहे. महाराष्ट्रात गोंडगोवारी जमातीचा बहिष्कार ठाम आहे. त्यामुळे राजकीय पक्षांचे गणित बिघडणार आहेत. आदिवासी गोंडगोवारी जमात संवैधानिक हक्कासाठी लढाई लढत राहणार आहे. अशी माहिती पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आली.

Advertisements