हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

१०२ रुग्णवाहिकेवरील कंत्राटी वाहनचालकांचा प्रश्न मार्गी लावणार : आमदार संतोष बांगर

spot_img

१०२ रुग्णवाहिकेवरील कंत्राटी वाहनचालकांचा प्रश्न मार्गी लावणार : आमदार संतोष बांगर

नागपूर (गोंडखैरी) : समान काम, समान वेतन या न्याय्य तत्त्वानुसार कंत्राटी वाहनचालकांचे मूळ वेतन १९ हजार ९०० असून, ते वाहनचालकांना लागू करण्याबाबत राज्याच्या आरोग्यमंत्र्यांशी चर्चा करून ते मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे आश्वासन हिंगोली जिल्हाच्या कळमनुरी निर्वाचन क्षेत्राचे संतोष बांगर यांनी लक्षवेधी सुचना क्रं १५९९, विधानसभेत ठराव ठेऊन आरोग्य विभागाच्या कंत्राटी वाहनचालकांचा प्रश्न मार्गी लावणार असे भेटीदरम्यान आश्वासन दिले.

जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयतील १०२ रुग्णवाहिकांवर राज्यात २००० कंत्राटी चालक गेली १६ वर्षे अखंडित सेवा देत आहेत. जिल्ह्यातील रुग्णवाहिकांवर नेमलेल्या या कंत्राटी चालकांना ठेकेदाराकडून १० ते १२ हजार रुपये इतके मानधन देण्यात येते. किमान वेतन कायद्यानुसार वेळोवेळी वाढ करण्यात येणाऱ्या भत्त्यानुसार चालकांना मानधन अदा करणे सेवापुरवठादाराला बंधनकारक होते. मात्र, या चालकांना किमान वेतनतत्त्वानुसार मानधन अदा करण्यात येत नाही.

Advertisements

किमान वेतनानुसार १९ हजार ९०० इतके मानधन मिळणे आवश्यक आहे. मानधन कमी देण्यात येत असून, तेही वेळेवर मिळत नसल्याने कंत्राटी वाहनचालकांचे हाल होत आहेत. सणासुदीलाही त्यांना मानधन मिळत नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांचे हाल होत आहेत. याबाबत अनेकदा मंत्रालयात, मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, जिल्हा परिषदेच्या सभांमध्ये जोरदार चर्चाही झाल्या आहेत. शिवाय कंत्राटदारालाही तशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. तरीही त्यांना वेळेवेर मानधन मिळत नाही. शिवाय शासनाच्या किमान वेतनानुसार ते देणे आवश्यक आहे. याबाबत हिंगोली जिल्हाच्या कळमनुरी निर्वाचन क्षेत्राचे संतोष बांगर यांनी लक्षवेधी सुचना क्रं १५९९, विधानसभेत ठराव ठेऊन आरोग्य विभागाच्या कंत्राटी वाहनचालकांचा प्रश्न मार्गी लावणार असे भेटीदरम्यान आश्वासन दिले.

यावेळी नागपूर विभाग शासकिय १०२ रुग्णवाहिका कंत्राटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष उमाकांत शेंडे, उपाध्यक्ष महेंद्र मेश्राम, कार्याध्यक्ष ब्रम्हानंद गोरडवार, कोषाध्यक्ष मनोज अगळे, महासचिव दिलीप ठाकरे, कैलास वानखेडे, संजय खंडाईत, नितीन काळे आदींच्या संख्येत वाहनचालक उपस्थित होते.

रुग्णांना तातडीने सेवा मिळावी याकरीता राज्य शासनाने १०२ राष्ट्रीय रुग्णवाहीका सुरु केल्या. राज्यात जवळपास २ हजार, १०२ रुग्णवाहिका चालक कार्यरत आहे. वाहनचालकांना शासनाकडून किमान वेतन १९ हजार ९०० रुपये मंजूर करण्यात आले आहे. संबंधित अधिकारी आपल्या सोयीचा कंत्राटदार नेमून त्यांना केवळ १० ते १२ हजार रुपये वेतनापोटी अदा करतात. मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री यांनी दखल घेऊन सरळसेवेत अथवा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ११-११ महिन्याचे नियुक्ती आदेश देण्यात यावे
-आमदार संतोष बांगर
हिंगोली जिल्हा, कळमनुरी निर्वाचन क्षेत्र

Advertisements

रुग्णवाहिका चालक आपल्या न्याय हक्कासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाने आम्हच्या बाजूने निकाल दिला. परंतु “समान काम समान वेत” लागू न झाल्याने आम्हच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. आम्हां १०२ रुग्णवाहिका वाहनचालकांना राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत ११-११ महिन्याचे नियुक्ती आदेश देण्यात यावे. आमदार संतोष बांगर यांंचे मार्फत नागपूर विधानसभेत लक्षवेधी सुचना क्रं १५९९ अधिवेशनात ठराव घेण्यात आला.
-उमाकांत शेंडे
अध्यक्ष, नागपूर विभाग वाहनचालक संघटना