समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार
पत्रकार विजय खवसे व भीमराव लोणारे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित
कामठी – तेजस बहुउद्देशीय संस्था कामठी च्या 5 व्या वर्धापन दिनी रविवारी केंट एरिया कामठी येथे समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजसेवकांचा शाल व स्मृती चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.त्या मध्ये WH न्युज चे संपादक विजय खवसे,IBM TV9 चे संपादक भीमराव लोणारे यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
विशेष म्हणजे तेजस बहुउद्देशीय संस्थे चे अध्यक्ष चंद्रशेखर अरगुरवार यांनी आपल्या संस्थे मार्फत तृतियपंथी आंचल वर्मा यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले.या वेळे तब्बल 60 समाजसेवकांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाला माजी आमदार आशिष देशमुख,लॉयर विलास राऊत,विदर्भवादी सुनील चोखारे प्रामुख्याने उपस्थित होते.सत्कार समारोहाचे आयोजन चंद्रशेखर अरगुर्लेवार यांनी केले.सत्कार प्रसंगी पत्रकार विजय खवसे म्हणाले की पुरस्काराने प्रेरणा मिळते व प्रेरणेतून राष्ट्राची निर्मिती होते.
समाजात चांगले कार्य करणाऱ्या व्यक्तीचा सन्मान करणे आवश्यक आहे.सामजिक संस्था हे उपक्रम रावतात ही मोठी बाब आहे.सरकार ने सुद्धा गाव खेड्यात चांगले काम करणाऱ्यांचा सत्कार जिल्हाधिकारी मार्फत केला पाहिजे.समाजसेवक चंद्रशेखर अरगुर्लेवार सुद्धा सत्कारास पात्र आहे.कामठी सह जिल्ह्यात त्यांचे सामजिक कार्य मोठे आहे.आम्हाला दिलेला पुरस्कार हा त्यांच्या संस्थेला समर्पित करीत असल्याचे पत्रकार विजय खवसे व भीमराव लोणारे यांनी संगितले.