शेअर मार्केट मध्ये इन्वेस्ट च्या नावावर केली करोड़ो रूपया ने फसवणूक
गुन्हा दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश
प्रेस क्लब नागपुर – शेअर मार्केट कंपनीमध्ये गुंतवणूक करण्याचा नावाखाली केली लाखोंची फसवणूक केल्याची घटना सामोर आली.
दिनांक 10.02.2023 रोजी माननीय कनिष्ठ न्यायालयचे न्यायाधीश मा . श्री एस . एस . जाधव यांनी आरोपी लोकेश अशोक देवतळे विरुद्ध गुन्हा नोंदविण्याचे आदेश बजाज नगर पोलीस स्टेशनला दिले .
आरोपी लोकेश अशोक देवतळे आपली कंपनी ‘ इमपेरियल ड्रीम वर्ल्ड ‘ याद्वारे शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्याच्या नावाखाली फिर्यादी कडून रक्कम उकळत असे व जास्त व्याजदराचा व पैसे डबल करण्याचा आमिष देत असे . पैसे मागितल्यास आरोपी हा गुंतवणूकदारांच्या मुद्दल मधून पैसे व्याज म्हणून त्यांना परत करत असे . असे करून आरोपीने फिर्यादी व इत्तरांकडून कडून लाखोंची रक्कम उकळून घेतली .
सोबतच फिर्यादीला असे पटवून दिले की आणखी लोकांना गुंतवणूक करायला आणल्यास त्याचा फायदा करवून देणार . मुद्दल रक्कम परत मागितल्यास आरोपी ने फिर्यादीची रक्कम परत तर केलीच नाही व टाळाटाळही करू लागला . या पद्धतीने आरोपीने अनेकांकडून जवळपास 71 लाख रुपये उकळल्याची माहिती आहे . आधीच्या पैशांची विचारणा केल्यास आणखी पैसे दिल्याशिवाय नुकसान भरून निघणार नाही असे सांगून आणखी 20 लाख रुपयांची मागणी केली आणि तेही पैशे उकळून फसवणूक केली .
सदर आरोपीवर समांतर गुन्ह्यात आधीच गुन्हा दाखल करण्यात आला आहे . आरोपी पैसे परत करत नसल्याने आणि वारंवार टाळत असल्याने , फिर्यादी कुंदन चंदेल यांनी पोलीस स्टेशन बजाज नगर नागपुर येथे आरोपीने फसवणूक केल्याची तक्रार दिली . पण बजाज नगर पोलिसांनी गुन्ह्याची दखल घेतली नाही सोबतच आरोपीला बोलवून घेऊन त्याचा कडून पैशे परत करण्याची हमी लिहून घेतली व त्यास गुन्हा दाखल केल्याशिवाय सोडून दिले .
म्हणून फिर्यादीने सदर तक्रार वरिष्ठ पोलीस उप अधीक्षक व पोलीस अधीक्षक यांना दिली . वरिष्ठांनी सदर गुन्बात कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही म्हणून फिर्यादी ने ऍड . अभियान बाराहाते द्वारे CRPC च्या कलम १५६ ( 3 ) अंतर्गत न्यायालयाकडे धाव घेतली . न्यायालयात फिर्यादींच्या वकिलाकडून सबळ पुरावे सादर करण्यात आले व फिर्यादीची फसवणूक झाली , सोबतच त्यांच्याशी आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट आढळले म्हणून न्यायालयाने बजाज नगर पोलीस स्टेशन ला सदर प्रकरणात आरोपींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देऊन पुढील चौकशी करून रिपोर्ट सादर करण्याचे आदेश दिले . पोलिसांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने फिर्यादीला न्यायालयाकडे धाव घ्यावी लागली व न्यायालयाकडून दिलासा मिळाला .
फिर्यादी तर्फे ऍड . अभियान बाराहाते यांनी बाजू मांडली . सदर संस्था नामे ‘ इमपेरियल ड्रीम वर्ल्ड ‘ ही बोगस असून फिर्यादीसह अन्य अनेक गुंतवणूकदारांची लाखोंची फसवणूक आरोपीने केल्याची बाब उघडकीस येत आहे . 405,406 , 409 , 415,417 , 420 IPC अंतर्गत गुन्हे दाखल करण्याचे आदेश कोर्टाने दिल्याची माहिती शुक्रवारी एड अभियान बाराहाते यांनी प्रेस क्लब नागपुर येथे आयोजित पत्रकार परिषद मध्ये दिली.