शृंखलच्या “द स्टेंडली चेंज”या इंग्रजी कवितासंग्रहाला नेल्सन मंडेला नॅशनल अवॉर्ड
चंद्रपुर /नागपुर – चंद्रपूर जिल्ह्यातील भिशी येथील शृंखल भोयर या बालकांच्या बहुचर्चित “द स्टेंडली चेंज”या बहुचर्चित काव्यसंग्रहाला यावर्षीचा नॅशनल नेल्सन मंडेला अवार्ड देण्यात आला.
हा कवितासंग्रह अवघ्या तेरा वर्षाच्या मुलाने लिहिला असून पुण्याच्या परिस प्रकाशन काढला आहे.
जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त देशातील साहित्यकृतीला हे पुरस्कार दिले जातात. शृंखलला हा पुरस्कार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस, यांच्या हस्ते व डॉ. के.पी वासनिक, दिल्ली, डॉ. महेश चौगुले बेळगाव, डॉ.जगन कराडे, कोल्हापूर, डॉ.शुंभागी भोयर,प्रा.दिपकुमार खोब्रागडे उपस्थित देण्यात आला.
या अगोदर शृंखलला मुस्लीम साहित्य परिषद यांनी सन्मानीत केले .वकृत्व, शैक्षणिक स्पर्धा, व इतर अनेक पुरस्कार मिळाले आहेत.तो नारायणा विद्यालयाचा वर्ग आठ चा विद्यार्थी आहे.
यासाठी त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे