शासनाकडून शालेय विध्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे ‘चॉकलेट’
अमरावती – शासनाकडुन शालेय विध्यार्थ्यांना OBC अंतर्गत शिष्यवृत्ती देण्याकरीता नियोजन केले होते, त्याप्रमाणे सर्व पालकांनी सन 2019-2020, 2021 – 2022
पासुन शाळेत शिष्यवृत्ती अर्ज व सोबत इतर सर्व कागदपत्रे कठीन परीस्थितीतून जमा करून शाळेत दाखल केले आणी दर वर्षी शिष्यवृत्तीच्य नावाखाली प्रत्येक शाळेला विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्ती अर्ज भरण्याकरीता सुचना दिल्या जातात याचा पाठपुरावा करून विद्यार्थ्यांचे पालक विजय नांदेकर यांनी सिताबाई संगई शाळा व पंचायत समिती अंजनगाव सुर्जी तसेच समाज कल्याण विभाग जि. परिषद अमरावती यांना माहीती अधिकार अंतर्गत विचारणा केली असता ‘मॅट्रीक पूर्व शिष्यवृत्ती’ राज्य शासना कडुन व केंद्र शासनाकडुन कोणत्याही प्रकारचा निधी प्राप्त न झाल्यामुळे सदर शिष्यवृत्ती प्रलंबित आहे.
शिष्यवृत्ती बाबत निधी मागणी करण्यात आलेला आहे अशी लेखी माहीती ‘समाज कल्याण विभाग’ अमरावती कडुन देण्यात आलेली आहे. सदर धावपळीच्या जिवनात पालकांना व विध्यार्थ्यांना त्रास देण्याचे काम केंद्रशासन व राज्यशासन करीत आहे. सन 2019-2020, ते 2021-2022
पासुन शिष्यवृत्ती करीता दर वर्षी शिष्यवृत्ती अर्ज व बँकेचे खाते पुस्तक काढण्याकरीता शाळेला शासनाकडुन सांगीतले जातात- परंतु अद्याप पर्यंत विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये कोणत्याही प्रकारची शिष्यवृती जमा न करता विध्यार्थ्यांना शासना कडुन ‘शिष्यवृत्तीचे *चॉकलेट* देण्यात येत आहे’
केंद्रशासन व राज्यशासन या पुढे कोणती भूमिका घेतील याकडे विद्यार्थ्यांचे व पालकांचे लक्ष लागून आहे.